पुणे, 23 जानेवारी 2024 – पूना केनेल कॉन्फेडरेशनने केनेल क्लब ऑफ इंडियाच्या सहकार्याने 124व्या, 125व्या आणि 126व्या ऑल ब्रीड चॅम्पियनशिप डॉग शोचे आणि सह्याद्री गोल्डन रिट्रीव्हर असोसिएशन (महाराष्ट्र चॅप्टर) द्वारे सेकेंड स्पेशालिटी शो आयोजन केले होते. हा प्रतिष्ठित कार्यक्रम 20 आणि 21 जानेवारी 2024 रोजी पोलीस ग्राउंड, शिवाजी नगर, पुणे येथे झाला.
या कार्यक्रमात 50 विविध जातींचे प्रतिनिधित्व करणारे 300 हून अधिक कुत्र्यांसह विलक्षण विविधता आणि कौशल्याचे प्रदर्शन दिसले. ऑस्ट्रेलियातील सुश्री ज्युडिथ अॅन ऑलिव्हर, तैवानचे श्री. लिउ चिंग-ली आणि श्री. चिंग यिन-ची आणि थायलंडचे श्री. चकाप्पन चंतारास्मी यांचा समावेश असलेल्या जागतिक स्तरावरील नामांकित पॅनेलद्वारे न्यायनिवाडा करण्यात आला, ज्यामुळे मूल्यमापन प्रक्रियेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. चॅम्पियनशिप फॉरमॅटची रचना अनोख्या पद्धतीने करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रत्येक जातीचा चॅम्पियन निवडला होता, ज्यामुळे तीन वेगवेगळ्या विंग्समध्ये एकूण 24 टॉप चॅम्पियन होते. प्रत्येक श्रेणीमध्ये सर्वोत्तम स्वरूप साजरे करताना, जाणूनबुजून जातीच्या मापदंडांपर्यंत पोहोचण्यासाठी, संवर्धित करण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारणा तसेच उच्च वंशावळ मानकांची देखभाल यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी डिझाइन केले होते.
या प्रसंगी, पूना केनेल कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष आणि समिती सदस्य संजय देसाई म्हणाले, “हा कार्यक्रम केवळ एक स्पर्धा नाही; हा कुत्र्यांच्या जातींमधील समृद्ध विविधता आणि अनुकरणीय मानकांचा उत्सव आहे. या भव्य प्राण्यांची वंशावळ प्रदर्शित करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी हि स्पर्धा समर्पित आहे.”


