~ बाळाच्या पहिल्या भेटीचे महत्त्व आणि त्यामागील भावना; एआय-आधारित गोष्टीच्या माध्यमातून हिमालया बेबीकेअरने केल्या जिवंत ~
राष्ट्रीय, १४ ऑगस्ट, २०२६: भारतातील सर्वात आघाडीच्या आणि विश्वासार्ह बेबी केअर ब्रँडपैकी एक असलेल्या ‘हिमालया बेबीकेअर’ने आपल्या नव्या ‘हिमालया बेबी प्युअर बिगिनिंग्स घी गिफ्ट पॅक’साठी एआयआधारित नवी जाहिरात लॉन्च केली आहे. संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणारी ही जाहिरात नवजात बाळांसाठीच्या गिफ्टिंग क्षेत्रात ब्रँडचे स्थान अधिक मजबूत करते. यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, सांस्कृतिक संदर्भ जोडत, गोष्टीच्या माध्यमातून या प्रीमियम उत्पादनाचे महत्त्व मांडण्यात आले आहे.
भारतीय कुटुंबांमध्ये नवजात बाळाला दिली जाणारी भेट ही केवळ एक वस्तू नसून, त्यामागे सांस्कृतिक महत्त्व आणि भावना असतात, याच विचारावर ही मोहीम आधारित आहे. या जाहिरातीद्वारे पारंपारिक गिफ्टिंगला आधुनिक दृष्टिकोनाची जोड देण्यात आली आहे. बाळासाठी खात्रीने वापरता येतील अशी, सौम्य आणि अर्थपूर्ण उत्पादने शोधणाऱ्या आधुनिक कुटुंबांसाठी ‘हिमालया बेबी प्युअर बिगिनिंग्स घी गिफ्ट पॅक’ हा एक प्रीमियम पर्याय म्हणून सादर करण्यात आला आहे. आजकालचे गिफ्टिंग ही केवळ गरज उरलेली नाही, ते काळजी आणि जागरूक पालकत्वाचे प्रतीक बनत आहे, हे या व्हिडिओतून दाखवले आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी हिमालया बेबीकेअरने एआय तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण कथाकथनाचा वापर केला आहे.
या जाहिरातीची सुरुवात एका सणासुदीच्या प्रसंगाने होते, जिथे ‘हिमालया बेबीकेअर प्युअर बिगिनिंग्स घी गिफ्ट पॅक’ दाखवला आहे. या बॉक्समध्ये बालरोगतज्ञांनी प्रमाणित केलेली बाळाच्या देखभालीसाठी वापरण्याची ५ अत्यावश्यक उत्पादने आहेत. यात गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेले बेबी बार, हेड टू टो बेबी वॉश, बेबी लोशन, बेबी क्रीम आणि बेबी रॅश रिलीफ क्रीम यांचा समावेश आहे. हिमालया बेबीकेअर हा ब्रँड बाळाच्या देखभालीसाठी सुरक्षित व विश्वासार्ह उत्पादने आणण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यानुसार ही सर्व उत्पादने त्वचेसाठी सुरक्षित असल्याचे डर्मेटोलॉजिस्टनी केलेल्या चाचणीत सिद्ध झाले असून, ती पॅराबेन्स आणि कृत्रिम रसायनांपासून मुक्त आहेत. बाळाला दिली जाणारी भेट म्हणजे फक्त वस्तू नसतात, तर बाळाच्या आयुष्याची सुरुवातच प्रेम, देखभाल आणि आराम यांनी व्हावी ही भावना त्यामध्ये असते, हा विचार या कथेमधून अधोरेखित करण्यात आला आहे.
या कॅम्पेनबद्दल बोलताना, हिमालया वेलनेस कंपनीच्या बेबीकेअर विभागाचे संचालक एन. व्ही. चक्रवर्ती म्हणाले, “हिमालया बेबीकेअरमध्ये आमचा असा विश्वास आहे की, बाळाला दिली जाणारी पहिली भेट ही विचारपूर्वक निवडलेली, शुद्ध आणि विशेष असावी; कारण त्यातून नवजात बाळाच्या आगमनाचा आनंद आणि बाळाविषयीची काळजी व्यक्त होते. ‘प्युअर बिगिनिंग्स घी गिफ्ट पॅक’च्या माध्यमातून आम्हाला एक वेगळा पर्याय बाजारात आणायचा होता, ज्यामध्ये प्रीमियम सादरीकरण, सांस्कृतिक महत्त्व असलेले घटक आणि विश्वासू उत्पादने एकत्र असतील. आजच्या डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या पालकांशी जोडले जाण्यासाठी या मोहिमेत एआयवर आधारित कथाकथनाचा वापर केला आहे. याद्वारे भावनिक विश्वासार्हता जपत नवनवीन सर्जनशील पर्याय शोधण्याचा आमचा प्रयत्न दिसून येतो.”
हे कॅम्पेन आजच्या ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडी देखील दर्शवते. आजकाल नवजात बाळाच्या स्वागतासाठी किंवा भेट देण्यासाठी विचारपूर्वक निवडलेली वस्तू, ती बनवण्यासाठी वापरलेले विश्वासार्ह घटक आणि भावनिकदृष्ट्या अर्थपूर्ण अनुभवांना अधिकाधिक महत्त्व दिले जात आहे.
बाळांसाठीच्या गिफ्टिंग क्षेत्रात ब्रँडबद्दल जागरूकता आणि विश्वास वाढवण्यासाठी, ही जाहिरात हिमालया बेबीकेअरच्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाईल. यासोबतच रिटेल स्टोअर्स आणि गिफ्टिंगसंबंधित उपक्रमांद्वारेही याला प्रसिद्धी दिली जाईल. तंत्रज्ञानावर आधारित कथाकथन आणि सांस्कृतिक परंपरांची योग्य सांगड घालत, या मोहिमेच्या माध्यमातून हिमालया बेबीकेअर बेबी गिफ्टिंग क्षेत्रातील आपले स्थान अधिक मजबूत करत आहे.


