Tuesday, September 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedविपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाईन पिक्चर्सने आयपीओसाठी डीआरएचीपी दाखल केले

विपुल अमृतलाल शाह यांच्या सनशाईन पिक्चर्सने आयपीओसाठी डीआरएचीपी दाखल केले

बीएसई लिंक

https://www.bseindia.com/corporates/download/361148/IPO%20Prior/DRHPSunshine_20250102213246.pdf

विपुल अमृतलाल शाह हे सिनेमे आणि टीव्ही शो बनवणारे प्रख्यात निर्माते आणि दिग्दर्शक असून, गेली अनेक दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रात आघाडीचे व्यक्तिमत्व म्हणून नावाजले जात आहेत, त्यांनी स्वतःची कंपनी सनशाईन पिक्चर्स लिमिटेडला ‘सार्वजनिक’ करण्याचे ठरवले आहे.

सनशाईन पिक्चर्स लिमिटेड हे एक प्रतिष्ठित प्रोडक्शन-हाऊस असून सिनेमे आणि वेब सीरिजची संकल्पना, निर्मिती, विकास, मार्केटिंग आणि वितरण या व्यवसायात कार्यरत असून त्यांनी आयपीओसाठी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केले आहे.

या डीआरएचपीमध्ये ८३.७५ लाख पर्यंत इक्विटी समभागांचा समावेश असून त्यामध्ये ५० लाखपर्यंत इक्विटी समभाग नव्याने जारी करण्यात आले आहेत तर ३३.७५ लाख पर्यंत इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आले आहेत. विपुल अमृतलाल शाह हे समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर म्हणून २३,६९,२०० पर्यंत इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत आहेत तर शेफाली विपुल शाह यांनी समभाग विक्री करू इच्छिणाऱ्या प्रमोटर म्हणून १०,०५,८०० पर्यंत इक्विटी समभाग विक्रीसाठी प्रस्तुत केले आहेत.

नव्याने जारी करण्यात आलेल्या समभागांच्या विक्रीतून उभ्या राहिलेल्या भांडवलाचा उपयोग पुढील प्रमाणे करण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे: १. खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करणे; आणि २. सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे. आपल्या कंपनीचे इक्विटी समभाग शेयर बाजारांमध्ये सूचिबद्ध करण्याचे लाभ मिळवण्याची आणि कंपनीची ओळख व ब्रँड इमेज वाढवण्याची तसेच भारतामध्ये इक्विटी समभागांसाठी सार्वजनिक बाजारपेठ निर्माण करण्याची कंपनीची अपेक्षा आहे.

कंपनीच्या दीर्घकालीन खेळत्या भांडवलाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी एकूण आयपीओच्या विक्रीतून येणाऱ्या रकमेपैकी ९४ कोटी रुपयांपर्यंत रक्कम वापरण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे. कंपनीच्या भविष्यातील वृद्धीशी संबंधित गरजा आणि इतर कॉर्पोरेट कामांसाठी कंपनीला अतिरिक्त दीर्घकालीन खेळत्या भांडवलाची गरज आहे. हे डीआरएचपी दाखल केलेल्या तारखेच्या आकडेवारीनुसार, या कंपनीने दहा कमर्शियल फिल्म्सची निर्मिती केली आहे, त्यांच्यापैकी सहा प्रतिष्ठित स्टुडिओजसोबत सह-निर्मित आहेत; दोन वेबसीरिज, दोन टीव्ही मालिका आणि एका शॉर्ट कमर्शियल फिल्मची देखील निर्मिती केली आहे. सध्याच्या घडीला ही कंपनी दोन कमर्शियल फिल्म्स प्रोजेक्ट्सची जिओ स्टुडिओजसोबत सहनिर्मिती करत आहे आणि प्रसार भारती, दूरदर्शनसाठी एक वेब सीरिजची स्वतः एकट्याने निर्मिती करत आहे. ही वेब सीरिज दूरदर्शन चॅनेल आणि त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जात आहे. पुढील काळात आठ फिल्म्स आणि दोन वेब सीरिजची निर्मिती करण्याची योजना कंपनीने बनवलेली आहे.

डीआरएचपी दाखल केलेल्या तारखेच्या माहितीनुसार, ही कंपनी जिओ स्टुडिओजसोबत दोन फिल्म प्रोजेक्ट्सची सह-निर्मिती करत आहे, त्यांच्यापैकी एक ‘हिसाब’ (अभिनेते शेफाली विपुल शाह, जयदीप अहलावात, अभिषेक बॅनर्जी आणि इतर) हा सिनेमा २०२५ च्या पहिल्या तिमाहीमध्ये प्रकाशित होणार आहे. ही कंपनी स्वतः एकट्याने दूरदर्शनसाठी एका वेब सीरिजची निर्मिती करत आहे, ही वेब सीरिज दूरदर्शन चॅनेल आणि त्यांच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जात आहे. त्यांच्या आगामी फिल्म प्रोजेक्ट्समध्ये गुड मॉर्निंग रिहा, गव्हर्नर, केरला स्टोरी २, बुलडोझर, समुक, कान्हा अँड भीम यांचा तर वेब सीरिज प्रोजेक्ट्समध्ये माया, नानावटी वर्सस नानावटी आणि व्हिसल ब्लोअर यांचा समावेश आहे.

गेली तीन आर्थिक वर्षे आणि आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ही कंपनी नफ्यामध्ये आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीने संचालनातून १३३.८ कोटी रुपये उत्पन्न नोंदवले होते, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ते २६.५१ कोटी रुपये होते तर आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ते ८७.१३ कोटी रुपये होते. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत संचालनातून मिळालेले उत्पन्न ३९.०२ कोटी रुपये होते. या काळातील ईबीआयटीडीए ७७.७५ कोटी रुपये होता, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तो ७३.०८ कोटी रुपये होता, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ४.४६ कोटी रुपये होता आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १५.२१ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत त्यांचा निव्वळ नफा ४५.६४ कोटी रुपये होता, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५२.४५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २.३१ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ११.२ कोटी रुपये होता.

सनशाईन पिक्चर्स कंपनीची सुरुवात २००७ साली करण्यात आली, हे प्रोडक्शन हाऊस सिनेमे, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजची संकल्पना शोधून, निर्मिती, विकास, मार्केटिंग आणि वितरण यामध्ये कार्यरत आहे. सुरुवातीपासून आजतागायत या कंपनीने आधुनिक भारतीय सिनेमामध्ये अनेक महत्वपूर्ण प्रोजेक्ट्स केले आहेत. स्वतःच्या बॅनरखाली त्यांची पहिली निर्मिती ‘फोर्स’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. तेव्हापासून या कंपनीने अनेक प्रमुख कमर्शियल आणि सामाजिकदृष्ट्या अनुरूप सिनेमे तयार व वितरित केले आहेत, यामध्ये ‘कमांडो – अ वन मॅन आर्मी’, ‘हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’, ‘फोर्स २’, ‘कमांडो २: द ब्लॅक मनी ट्रेल’, ‘द केरला स्टोरी’ इत्यादींचा समावेश आहे.

‘फोर्स’, ‘हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’, ‘ह्युमन (वेब सीरिज)’ आणि ‘द केरला स्टोरी’ आणि त्यांच्या कास्टने अनेक पुरस्कार मिळवले आहेत, यामध्ये फिल्मफेयर अवॉर्ड, इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडेमी अवॉर्ड, स्टारडस्ट अवॉर्ड्स, ग्लोबल फिल्म अवॉर्ड, अप्सरा फिल्म प्रोड्युसर्स गिल्ड अवॉर्ड्स, बिग स्टार एन्टरटेनमेन्ट अवॉर्ड्स, इंडिया, इंडियन टेली स्ट्रीमिंग अवॉर्ड्स, बॉलिवूड लाईफ अवॉर्ड्स, दादासाहेब फाळके फिल्म फाउंडेशन अवॉर्ड्स, आयकॉनिक गोल्ड अवॉर्ड्स, झी सिने अवॉर्ड्स इत्यादींचा समावेश आहे. ‘द केरला स्टोरी’ हा या कंपनीचा सिनेमा २०२३ मध्ये गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा देणारा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला. समीक्षकांकडून कौतुक आणि कमर्शियल फायदा यांचे संतुलन साधण्याची कंपनीची क्षमता यामधून दिसून येते. (स्रोत: डीअँडबी रिपोर्ट)

सनशाईन पिक्चर्स ही तंत्रज्ञान-चालित कन्टेन्ट क्रिएटर असून, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कमर्शियल फिल्म्स बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. आपल्या फिल्म्समधून गोष्टी सांगण्याची आणि निर्मितीची नवीन तंत्रे अवलंबिण्यावर त्यांनी कायम भर दिला आहे. (स्रोत: डीअँडबी रिपोर्ट)

सनशाईन पिक्चर्सने युट्युब, इन्स्टाग्राम, फेसबुक इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील आपले स्थान निर्माण केले आहे. युट्युबवर आजच्या घडीला त्यांचे १६२९६० सबस्क्रायबर्स असून त्यांच्या कन्टेन्टला एकूण ९१८८९८५४ पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचा एकूण फॉलोअर बेस १०४५०० चा आहे. अशा प्लॅटफॉर्म्सवर कन्टेन्टचे लघु प्रकार प्रसारित करत असल्याने कंपनीच्या उत्पन्नामध्ये भर पडत राहते.

सनशाईन पिक्चर्स ही कंपनी प्रमोटर आणि मॅनेजिंग डायरेक्टर विपुल अमृतलाल शाह यांच्या नेतृत्वाखाली चालवली जाते. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात गेल्या २४ वर्षांचा अनुभव गाठीशी असलेले विपुल अमृतलाल शाह हे एक आघाडीचे सिने निर्माता आणि चित्रपट, टीव्ही मालिका व वेब सीरिजचे दिग्दर्शक आहेत. २००२ सालातील एक ब्लॉकबस्टर ‘आँखें’ सिनेमातून हिंदी सिने जगतामध्ये दिग्दर्शक म्हणून त्यांची कारकीर्द सुरु झाली. त्यापाठोपाठ ‘वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम’, ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’ आणि ‘लंडन ड्रीम्स’ असे अनेक हिट सिनेमे त्यांनी दिले. विपुल अमृतलाल शाह यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी एक विश्वसनीय प्रोडक्शन हाऊस म्हणून नावारूपाला आली, दर्शकांचे आयुष्य समृद्ध करणारा कन्टेन्ट देऊन कथाकथनामध्ये नवे मानदंड निर्माण केले. प्रमोटर आणि व्हाईल टाइम डायरेक्टर शेफाली विपुल शाह या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री आहेत. गेली २५ हुन जास्त वर्षांपासून त्या भारतीय सिने उद्योगातील विविध शैली व प्रकारच्या फिल्म्स व वेब सीरिजमध्ये काम करत आहेत. ‘सत्या’, ‘मान्सून वेडिंग’, ‘गांधी, माय फादर’, ‘दिल धडकने दो’, ‘वन्स अगेन’ अशा अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे, यामध्ये फिल्मफेयर अवॉर्ड, स्टारडस्ट अवॉर्ड, टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अवॉर्ड आणि एशियन अकॅडेमी क्रिएटिव्ह अवॉर्ड यांचा समावेश आहे. ५५व्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये त्यांना सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘डार्लिंग्स’, ‘डॉक्टर जी’ आणि ‘दिल्ली क्राईम’ अशा अनेक सिनेमांमध्ये आणि सीरिजमध्ये त्यांनी कामे केली आहेत. ‘दिल्ली क्राईम’ या वेब शोमधील अभिनयासाठी ‘सर्वोत्तम अभिनेत्री’ विभागामध्ये त्यांना २०२३ च्या इंटरनॅशनल एमीज अवॉर्डसाठी नामांकन देण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments