Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकाँग्रेस का हात, भ्रष्टाचार के साथ*....धीरज साहू व काँग्रेस विरोधी घोषणांनी दुमदूमले...

काँग्रेस का हात, भ्रष्टाचार के साथ*….धीरज साहू व काँग्रेस विरोधी घोषणांनी दुमदूमले कोथरूड.

*

काँग्रेस चा अजून एक भ्रष्टाचार उघड झाला असून यावेळी तब्ब्ल 300 कोटी रुपये मोहब्बत च्या दुकानातून जप्त झाले असून आजवरच्या सर्व रेड मध्ये सापडलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे, यावरूनच काँग्रेस चा भ्रष्ट कारभार उघड होतं असून त्याविरुद्ध आज भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी च्या वतीने महिला मोर्चा अध्यक्षा कोथरूड दक्षिण मंडल कांचन रुपेश कुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली कोथरूड च्या कर्वे पुतळा चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी
पुनीत जोशी सरचिटणीस पुणे शहर , डॉ. संदीप बुटाला कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष , महिला मोर्चा अध्यक्षा कोथरूड दक्षिण मंडल कांचन रुपेश कुंबरे, कोथरूड च्या सरचिटणीस व महिला मोर्चा कोथरूड मंडल च्या प्रभारी सौ.मंजुश्री संदीप खर्डेकर,मा. नगरसेविका वासंतीताई जाधव , वृषालीताई चौधरी , मा. नगरसेवक जयंतजी भावे , कोथरूड महिला मोर्चा सरचिटणीस
केतकी कुलकर्णी , पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझिरे, विद्या टेमकर,
उपाध्यक्षा सुरेखा डाबी, गायत्री लांडे , रमा डांगे , चिटणीस जयश्री घाटे , पूनम चव्हाण, सारिका सणस, प्रियांका चव्हाण सुरेखा जगताप , निर्मला रायरीकर, अनिता तलाठी, जान्हवी जोशी , मनीषाताई बुटाला , वर्षा पाटील , प्राची बगाटे, कोथरूड मंडल सरचिटणीस दीपक पवार, गिरीश खत्री,कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, कोथरूड मंडल उपाध्यक्ष दिनेश माथवड, विशाल रामदासी,कुणाल तोंडे, सुहास साठे , नाना कुंबरे , अमोल डांगे, आशुतोष वैशंपायन , सुजित मगर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यावेळी पुनीत जोशी, डॉ. संदीप बुटाला, कांचन कुंबरे, मंजुश्री खर्डेकर, वृषाली चौधरी, ऍड. प्राची बगाटे आणि केतकी कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात काँग्रेस चे वाभाडे काढले.
जनतेला आता समजलं असेल की काँग्रेस ने एकीकडे गरीबी हटाव चा नारा दिला आणि दुसरीकडे स्वतःच्या तिजोऱ्या भरून घेतल्या.
अश्या निर्लज्ज, सत्तापिपासू, लोभी आणि पैशासाठी मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात निषेध केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments