पुणे दिनांक १८ जानेवारी
एचएसबीसी आणि टीसीएस ‘अ’ या संघांनी शारदा इरेक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडने पुरस्कृत केलेल्या आणि पुणे जिल्हा आंतर कचेरी क्रीडा संघटनेने आयोजित केलेल्या
पुणे जिल्हा आंतर कचेरी टेबल टेनिस स्पर्धेत अपराजित्व कायम राखले.
ही स्पर्धा शारदा स्पोर्ट्स सेंटर येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ टेबल टेनिस संघटक राजीव बोडस व प्रकाश तुळपुळे यांच्या हस्ते झाले. यावेळी अरविंद नातू आशिष बोडस उदय भालचंद्र मधुकर लोणारे डॉक्टर मोहन उजगावकर सुरेंद्र देशपांडे स्मिता बोडस आदी संघटक उपस्थित होते. ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे.
टीसीएस ‘अ’ संघाने बार्केलेज ‘क’ संघाचा असा ३-० असा दणदणीत पराभव केला. एचएसबीसी संघाने अटीतटीच्या लढतीनंतर इन्फोसिस संघावर ३-२ अशी मात केली. एच ई एम आर एल डी आर डी ओ संघाने जूने गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड संघाला ३ – ० असे पराभूत केले. एम्फसिस संघाने बार्कलेज ‘अ’ संघाचा ३-० असा पराभव केला.
सविस्तर निकाल
१.टीसीएस ‘अ’ वि.वि बार्केलेज ‘क’ (३-०)
नवीन नातू वि.वि.प्रथमेश नाफडे ( ११-३,११-०, ११-४) अभिषेक श्रीवास्तव वि.वि कौस्तुभ बुगे (११ – ५, ११ – ६, ११ – ६ ) नवीन नातू व अभिषेक श्रीवास्तव वि.वि प्रथमेश बुगे व कौस्तुभ बुगे (११-४,११-५,९-११,११-५)
२.एच ई एम आर एल डीआरडीओ वि.वि जूने गेमिंग प्रायव्हेट लिमिटेड (३ – ०) अक्रम एम वि.वि प्रथमेश भिडे (११-४,११-५,११-६)
संतोष मेदिकुंत वि.वि ऋषिकेश जैन (११-३, ११-७,११-२). एम. अक्रम व संतोष मेदिकुंत वि.वि.प्रथमेश भिडे/रुषिकेश जैन (८-११,११-८, ११-६,११-३)
३.एम्फसिस वि.वि बार्कलेज ‘अ’ (३-०)
गौरांग शर्मा वि.वि अमोल आहुजा (११-७, ११-९,४-११,८-११,११-६) विकास छेत्री वि.वि नितेश राज (११-६,११-२,११-२) विकास छेत्री व गौरांग शर्मा वि.वि अमोल आहुजा व नितेश राज (११-२,११-६,११-१)
४..एचएसबीसी वि.वि इन्फोसिस (३-२)
नविश मिश्रा वि.वि अश्विन भिडे (११-७, १०-१२,११-५,११-८) केदार अहिरवाडकर पराभूत वि.पार्थ सिंग (७-११,५-११,३-११)
नवीन मिश्रा व केदार अहिरवाडकर वि.वि अश्विन भिडे / पार्थ सिंग (११-९,११-५,११-५) नविश मिश्रा पराभूत वि.पार्थ सिंग (१२-१४,१०-१२, ५-११) केदार अहिरवाडकर वि.वि अश्विन भिडे (७-११,१०-१२,११-७,११-३,११-४


