Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedअहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी महिलांचे भव्य पथसंचलन विश्व...

अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी महिलांचे भव्य पथसंचलन विश्व हिंदू परिषद मातृशक्ती आणि दुर्गावाहिनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांच्या जयंतीनिमित्त आयोजन

पुणे: विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि राणी दुर्गावती यांना मानवंदना देण्यासाठी भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथून पथसंचलनाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती संयोजिका प्रिया रसाळ आणि सोनाली नाथ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी दुर्गावाहिनी शक्ती साधना प्रमुख समृद्धी सराफ यांच्या सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रिया रसाळ म्हणाल्या, भारतीय इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जन्माला तीनशे वर्षे पूर्ण होणार आहेत,त्यांनी आपल्या साठी केलेले कार्य आणि महिला म्हणून समाजकार्यात दिलेले योगदान, मंदिराची,घाटाची स्थापना त्यांनी केली यातून त्याची धर्माबाबत असणारे प्रेम,आणि त्याच्या हातात असणारे शिवलिंग हे सुध्दा आपल्याला त्यांची श्रध्दा दर्शवते.

यंदाच्याच वर्षी राणी दुर्गावती यांच्या जयंतीला पाचशे वर्षे पूर्ण होणार आहेत. राणी दुर्गावती या गोंडवाना क्षेत्राच्या राणी होत्या. राणी दुर्गादेवी यांचा इतिहास झाशीच्या राणी प्रमाणे आहे . त्या वीर रणांगना होत्या. त्यांनी अनेक वर्ष मुघलांबरोबर लढा दिला अशा या धर्मरक्षक ,शासक, धाडसी, आणि समाजसेवक विरांगना चा आदर्श समोर ठेवून त्याच्या कार्याला उजाळा देण्यासाठी तसेच ते संस्कार आपल्या भावी पिढीवर रुजवण्यासाठी आणि मुलींमध्ये शौर्य निर्माण करण्यासाठी मानवंदना पथसंचलन होणार आहे.

सोनाली नाथ म्हणाल्या, अश्याच प्रकारचे मानवंदना संचलन विश्व हिंदू परिषद दुर्गावाहिनी मातृशक्ती च्या माध्यमातून देश भरात होत आहे. पथसंचलनात सहभागी तरुणींसाठी पांढरा ड्रेस भगवी ओढणी तर महिलांसाठी भगवी साडी असा पोशाख ठरवण्यात आला आहे. राष्ट्रीयत्वाचा मान राखणारा तिरंगा आणि परमपवित्र भगवा ध्वज सोबत घेऊनच हे संचलन पार पडणार आहे. संचलन झाल्यानंतर राष्ट्रीय वक्ता ह.भ.प. कृतिका दीदी कदम ह्या मार्गदर्शन करणार आहेत.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह गंजपेठ-महात्मा फुले वाडा-मासे आळी-मिठगंज पोलीस चौकी-शितळादेवी चौक-जैन मंदिर चौक-सुभान शहा दर्गा चौक- रांका ज्वेलर्स-कस्तुरे चौक-श्रमदान मारुती मंडळ- क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे तालीम मार्गे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे समारोप असा मानवंदना संचलन मार्ग आहे.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण तसेच अन्य कार्यकारणी, दुर्गावाहिनीच्या दुर्गा, मातृशक्तीच्या मातृ, पुणे पश्चिम आणि पूर्व विभागाचे पदाधिकारी, तसेच शहरातील असंख्य कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. पुणे शहरामध्ये अशा प्रकारचे हे बहुधा पहिलेच संचालन आहे. त्यामुळे स्त्रीशक्तीचा जागर आणि प्रदर्शन अनुभवण्याकरता पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या संचलनात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments