Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedपूना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढती व्हॅस्कॉन द होली...

पूना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत अत्यंत चुरशीच्या लढती व्हॅस्कॉन द होली वन्स, मानव पारी, केके रॉयल्स, ऑटोमेक बेकर्स संघांची चमकदार कामगिरी हिलयॉस ईगल्स संघाची आघाडी कायम

पुणे, 24जानेवारी 2025: पूना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित पूना क्लब गोल्फ लीग स्पर्धेत आजच्या दिवसातील लढती अत्यांत चुरशीच्या व रोमांचकारी ठरल्या. क गटात व्हॅस्कॉन द होली वन्स आणि मानव पारी पिन सिकर्स यांनी प्रत्येकी 38.5गुणांसह संयुक्त आघाडी राखली आहे. तसेच, केके रॉयल्स संघाने अ गटात ऑटोमेक बेकर्स इतकेच 35 गुण मिळवून संयुक्त पहिले स्थान राखले आहे.

येरवडा येथील पूना क्लब गोल्फ येथे सुरू असलेल्या ड्यूकॅटी लीगसी मोटर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या इरिगेशन प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड, टोरो, कोलते पाटील डेव्हलपर्स यांचे सह प्रायोजकत्व लाभलेल्या या स्पर्धेत हिलयॉस ईगल्स संघाने 48.5गुणांसह संपूर्ण स्पर्धेतील आपल्या आघाडीचे स्थान कायम राखले आहे. ब गटातील शुबान सनरायजर्स संघाने 37.5 गुणांसह दुसरा क्रमांक राखला असून इव्हेंट डायनामिक पार टी टायगर्स संघाने 24 गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे.

हिलयॉस ईगल्स संघाने इव्हेंट डायनामिक पार टी टायगर्स संघाचा पराभव केला. रुद्रांश वर्धन सिंग, मोनिश ठाकूर, सुनील बदामी आणि अनिता पुनामिया यांनी उत्कृष्ट पटिंग करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments