पुणे, 24 जानेवारी : फर्ग्युसन महाविद्यालयात ‘मतदार जागृती दिन’ साजरा करण्यात आला.
लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. महाविद्यालयाच्या परिसरात जनजागृती करण्यासाठी प्रबोधन फेरी काढण्यात आली.
प्राचार्य डॉ. विजय तडके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबंधक चेतन अंकलकोटे, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर कुंभार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सुशीलकुमार धनमने यांनी संयोजन केले.


