स्वराज्याची आखिव रेखीव मांडणी श्रीशहाजीराजे भोसले यांनी केली. आणि स्वराज्याला प्रत्यक्षात उतरवण्याचे काम छत्रपती शिवरायांनी केले. शहाजीराजांनी स्वतः मधील सर्व गुणांचा वारसा छत्रपतींना दिल्यामुळे शिवराय घडले. असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते व इतिहास अभ्यासक श्री. विक्रम कदम, सातारा यांनी मांडले. उपस्थितांना इतिहासातील विविध दाखले सांगताना प्रत्यक्ष पुढे प्रसंग उभा राहील अशा स्पष्ट प्रभावी आवाजात श्री कदम यांनी मार्गदर्शन केले.
सुपे (ता). बारामती येथील जीवन साधना फाउंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी विद्यालयात स्वराज्य संकल्पक श्रीशहाजीराजे भोसले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात ‘स्वराज्य संकल्पक श्रीशहाजीराजे भोसले’ या विषयावर श्री. विक्रम कदम यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीशहाजीराजे भोसले, नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमापुजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ सुपा परगणा चे अध्यक्ष श्री. शहाजी चांदगुडे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ सुपा परगण्याचे संस्थापक श्री.सुभाष भाऊ चांदगुडे होते. बाजार समितीचे संचालक श्री. विशाल भोंडवे, श्री. कैलास जगताप, श्री. दत्तात्रय ठाकूर, आणि श्री. सागर भांगे, श्री. संजय पोमण, श्री. सुधाकर खैरे, श्री तावरे आप्पा तसेच सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते. नुकतीच पार पडलेली ‘प्राजक्ता’ व्याख्यानमाला तसेच आजच्या कार्यक्रमासाठी श्री. आनंद लोखंडे चेअरमन, विद्यानंद ऍग्रो बारामती, श्री. हनुमंतराव चांदगुडे, श्री. लक्ष्मीकांत भोसले, श्री. नामदेवराव चांदगुडे, श्री. सुभाष मेजर काळखैरे, श्री. शैलेंद्र ढमे, श्री. सचिन नगरे, श्री. अतुल ढम, श्री. गणेश खैरे, श्री. निलेश पानसरे, कुमारी पायल ढमे, चि. श्रेयस फुलपगार तसेच संस्थेचे सर्व सदस्य व विद्यालयाच्या सर्व कर्मचारी वृंद, विद्यार्थी या सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री अशोक बसाळे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. प्रकाशदादा चांदगुडे यांनी केले.
स्वराज्याची आखिव रेखीव मांडणी श्रीमंत शहाजीराजे भोसले यांनी केली
RELATED ARTICLES


