Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे निर्यात क्षमता वाढवण्यास आणखी मदत होईल- सौरभ...

शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांमुळे निर्यात क्षमता वाढवण्यास आणखी मदत होईल- सौरभ गाडगीळ

भारतात दागिने उद्योग आज एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे, ज्यात मजबूत वाढ, पारदर्शकता आणि संघटित व्यापाराकडे वाटचाल करताना दिसत आहे असे मत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले . आगामी अर्थसंकल्प २०२५ मध्ये सामान्य माणसासाठी विचारशील धोरणे आणि कर सुधारणेवर भर दिला तर या उद्योगाच्या मागणी आणि वापराला चालना मिळेल . तसेच आयात शुल्कात कपात करून, सोन्याच्या चलनीकरण योजनांना बळकटी देणाऱ्या उपक्रमांमुळे उद्योगाची कार्यक्षमता आणि मागणी वाढण्यास मदत होईल .

याव्यतिरिक्त, अलीकडच्या काळात दागिने उद्योगाने भांडवली बाजारात प्रवेश करून आयपीओच्या यशातून आपली मान्यता आणि विश्वासार्हता वाढवली आहे. ज्यामुळे या क्षेत्रातील लोकांना संघटित व्यापार पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळत आहे. भारताच्या एकूण निर्यातीत ५% योगदान देणाऱ्या दागिने उद्योगात, सोन्याच्या निर्यातीला अनुकूल बनवण्यासाठी आणि दागिन्यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणाऱ्या धोरणांचा अर्थसंकल्पात विचार केला गेला तर निर्यात क्षमता वाढवण्यास आणखी मदत होईल.

लक्ष्यित सुधारणांसाह, अर्थसंकल्प २०२५ मध्ये सरकार भारताच्या दागिने उद्योगाला एक नवीन दर्जा देऊन, आधुनिकतेसह परंपरा जपण्यास तसेच येणाऱ्या वर्षांत “जागतिक पॉवरहाऊस” म्हणून आपले स्थान मजबूत करण्यास मदत करू शकते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments