डॉर्फ-केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड ही संशोधन आणि नवकल्पनांवर भर देणारी जागतिक स्तरावरील विशेष रसायने तयार करणारी व पुरवठा करणारी कंपनी आहे. तेल व वायू, रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स यांसह हायड्रोकार्बन आणि औद्योगिक पुरवठा साखळींमध्ये ही कंपनी काम करते. औद्योगिक क्षेत्रातील विविध प्रकारच्या ग्राहकांच्या गरजांसाठी उत्पादने पुरविणाऱ्या या कंपनीने, बाजार नियंत्रक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे आपल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) सादर केला आहे.
या आयपीओमध्ये प्रत्येकी ₹5 दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे, ज्यामध्ये ₹1,500 कोटींपर्यंतच्या रकमेचे नवीन शेअर्स जारी केले जातील आणि ₹3,500 कोटींपर्यंत रकमेच्या विक्रीसाठीची ऑफर (OFS) समाविष्ट आहे. या IPO ची एकूण रक्कम ₹5,000 कोटी आहे, जी प्रत्येकी ₹5 दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सद्वारे उभारली जाणार आहे. विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर मेनन फॅमिली होल्डिंग्स ट्रस्टकडून ₹3,500 कोटींच्या रकमेच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
1992 साली स्थापन झालेली डॉर्फ-केटल केमिकल्स इंडिया लिमिटेड ही भारतातील विशेष रसायनांच्या विकास, व्यावसायिकीकरण आणि उपयोगाच्या क्षेत्रातील एक प्रमुख उत्पादक कंपनी आहे. कंपनी दोन मुख्य श्रेणींतील उत्पादने प्रदान करते – हायड्रोकार्बनसाठी विशेष रसायने आणि औद्योगिक विशेष रसायने. हायड्रोकार्बनसाठी विशेष रसायनांमध्ये तेल क्षेत्र, रिफायनरी रसायने, पेट्रोकेमिकल्स, इंधन ॲडिटिव्ह्ज आणि सुधारित आम्ल (मॉडिफाइड ॲसिड्स) यांचा समावेश होतो, तर औद्योगिक विशेष रसायनांमध्ये ऑर्गनोमेटॅलिक टायटनेट्स आणि झिरकोनेट्स, पॉलीविनाइल फॉर्मामाइड (PVF), OBA आणि ल्युब्रिकंट ॲडिटिव्ह्ज यांचा समावेश होतो. 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत कंपनीच्या प्रतिष्ठित ग्राहकांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रिज, पेट्रोनास, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, PPG इंडस्ट्रिज, क्लेरियंट, लिबर्टी एनर्जी, इटालियाना पेट्रोली आणि वेदांताचा समावेश होता. 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या सहा महिन्यांत कंपनीचे 1,322 ग्राहक होते.
2023 मध्ये डॉर्फ-केटल केमिकल्स इंडिया लिमिटेडने भारत आणि ब्राझीलमध्ये तेल क्षेत्र, रिफायनरी रसायने, पेट्रोकेमिकल्स आणि इंधन ॲडिटिव्ह्जच्या महसूल बाजारातील वाट्याच्या आधारे पहिला क्रमांक मिळविला, तसेच F&S अहवालानुसार, कंपनीने जागतिक स्तरावर सुधारित आम्ल (मॉडिफाइड ॲसिड्स), ऑर्गनोमेटॅलिक टायटनेट्स आणि झिरकोनेट्स, तसेच PVF यांच्या महसूल बाजारातील वाट्याच्या आधारे पहिला क्रमांक मिळविला. याशिवाय, इंधन ॲडिटिव्ह्जच्या श्रेणीत जागतिक स्तरावर पहिल्या पाच प्रमुख कंपन्यांमध्ये कंपनीचा समावेश होता.
31 ऑक्टोबर 2024 पर्यंत डॉर्फ-केटल केमिकल्स इंडिया लिमिटेडकडे चार देशांमध्ये एकूण 16 उत्पादन केंद्रे आहेत. यामध्ये भारतात आठ, ब्राझीलमध्ये दोन, युनायटेड स्टेट्समध्ये तीन आणि कॅनडामध्ये तीन उत्पादन केंद्रांचा समावेश आहे. 30 सप्टेंबर 2024 पर्यंत भारतातील आठ उत्पादन केंद्रांची एकत्रित स्थापित क्षमता 1,47,770 MTPA होती, तर ब्राझील, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडातील उत्पादन केंद्रांची एकत्रित स्थापित क्षमता 1,94,770 MTPA होती. गुजरातमधील मुंद्रा येथील उत्पादन केंद्र हे कंपनीचे सर्वात मोठे केंद्र असून, त्याची स्थापित उत्पादन क्षमता 98,900 MTPA आहे. हे केंद्र ऑर्गनोमेटॅलिक टायटनेट्सच्या उत्पादनासाठी जगातील सर्वात मोठ्या उत्पादन केंद्रांपैकी एक आहे. कंपनीची समर्पित संशोधन आणि विकास (R&D) केंद्रे भारत, सिंगापूर, कॅनडा व ब्राझीलमध्ये आहेत. कंपनीकडे भारताबाहेर 542 पेटंट नोंदण्या आहेत, ज्यामध्ये 99 यूएस पेटंट नोंदण्या आणि भारतातील 29 पेटंट नोंदण्या समाविष्ट आहेत. जागतिक स्तरावर ब्रँड ओळख असलेल्या भारत-आधारित काही मोजक्या रासायनिक कंपन्यांमध्ये डॉर्फ-केटलचा समावेश होतो.
कंपनीला व्यवसाय खरेदी आणि एकत्रीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरीचा मजबूत अनुभव आहे, ज्यामुळे उत्पादनांची श्रेणी व भौगोलिक उपस्थिती वाढविण्यास मदत झाली आहे. अलीकडील खरेदींमध्ये जून 2024 मध्ये टेक्सास-स्थित इम्पॅक्ट फ्लुइड सोल्युशन्स LP, जानेवारी 2023 मध्ये कॅनडाच्या फ्लुइड एनर्जी ग्रुपच्या जागतिक सुधारित आणि कृत्रिम आम्ल व्यवसायाचा अधिग्रहण, मार्च 2023 मध्ये क्लेरियंटच्या उत्तर अमेरिकन लँड ऑइल व्यवसायाचा अधिग्रहण व एप्रिल 2022 मध्ये ख्याती केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
FY22 ते FY24 दरम्यान, डॉर्फ-केटल केमिकल्स इंडिया लिमिटेडच्या ऑपरेशन्समधील महसूल 45.47% च्या CAGR (सालाना संमिश्र वाढ दर) ने वाढून ₹54,795 दशलक्ष झाला. EBITDA 60.54% च्या CAGR ने वाढून ₹9,504 दशलक्ष झाला, तर करानंतरचा पुनर्स्थित नफा (Restated PAT) 50.18% च्या CAGR ने वाढून ₹6,020 दशलक्ष झाला.
कंपनी विशेष रसायन क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज आहे. आपली बाजारपेठेतील अग्रणी भूमिका, जागतिक उत्पादन आणि वितरण नेटवर्क, संशोधन व विकास क्षमता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचा उपयोग करत, कंपनी वाढीसाठी प्रयत्नशील आहे.
या IPO साठी JM फायनान्शियल लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, J.P. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर्स लिमिटेड हे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
लिंक : https://www.bseindia.com/corporates/download/353104/IPO%20Prior/DraftRedHerringProspectusFilingVersion_20250124190520.pdf


