Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिन स्नेहा सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ....

ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांच्या शाळेत प्रजासत्ताक दिन स्नेहा सेवा संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राधा संगमनेरकर यांची उपस्थिती ; विशेष मुलांची कवायत

पुणे : धायरी येथील ज्ञानगंगोत्री प्रतिष्ठान संचलित ज्ञानगंगोत्री मतिमंद मुलांची निवासी शाळा येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहा सेवा संस्थेच्या अध्यक्षा व सदाशिव पेठेतील चिन्मय हॉस्पिटलच्या डॉ. राधा मुकुंद संगमनेरकर उपस्थित होत्या.

तसेच स्नेह सेवा संस्थेच्या सेक्रेटरी निला सरपोतदार, प्राचार्य श्याम भुर्के, ज्ञानगंगोत्री प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम रानबा कसबे, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना विक्रम कसबे यांसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष मुलांनी अतिशय छान प्रकारे कवायत प्रकार करून दाखविली. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शिवशक्ती ग्रुप ने आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली. तसेच शाळेला चिन्मय हॉस्पिटल तर्फे ३० गादया देण्यात आल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका भावना कसबे यांनी सूत्र संचालन केले व संस्थचे अध्यक्ष विक्रम कसबे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments