Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंगकडून बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी रेंज लाँच; श्रेणींमध्‍ये १९ मॉडेल्‍स सादर

सॅमसंगकडून बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी रेंज लाँच; श्रेणींमध्‍ये १९ मॉडेल्‍स सादर

गुरूग्राम, भारत – २९ जानेवारी २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज त्‍यांच्‍या बीस्‍पोक एआय विंडफ्री एअर कंडिशनर्सची २०२५ लाइनअप लाँच केली, ज्‍यांच्‍यामध्‍ये अत्‍याधुनिक एआय तंत्रज्ञान आणि प्रीमियम डिझाइनचे संयोजन आहे. इंटेलिजण्‍ट कूलिंग, ऊर्जा कार्यक्षमता आणि कनेक्‍टेड राहणीमानावर लक्ष केंद्रित करण्‍यासह १९ मॉडेल्‍सची नवीन श्रेणी भारतातील ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक मागण्‍यांची पूर्तता करते. हे एअर कंडिशनर्स आरामदायीपणा, सोयीसुविधा व नाविन्‍यता देण्‍यासोबत भारतातील प्रखर उन्‍हाळ्याच्‍या आव्‍हानांचे निराकरण करण्‍यासाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आले आहेत.

या श्रेणीमध्‍ये एआय-संचालित इनोव्‍हेशन्‍स आहेत, ज्‍यामुळे एअर कंडिशनर्स विविध हवामान स्थितींशी जुळून जातात, ज्‍यामधून सतत आरामदायीपणा आणि अधिकतम कार्यक्षमतेची खात्री मिळते. विंडफ्री कूलिंग तंत्रज्ञान अधिक थंडावा न देता २३,००० सूक्ष्‍म छिद्रांमधून सौम्‍यपणे कूलिंग देते, तर एआय फास्‍ट अँड कम्‍फर्ट कूलिंग वैशिष्‍ट्ये त्‍वरित लिव्हिंग स्‍पेसमध्‍ये थंडावा निर्माण करते आणि स्थिर आरामदायीपणासाठी ऊर्जा-कार्यक्षम सेटिंग्‍जमध्‍ये बदलते. आधुनिक जीवनशैलींना लक्षात घेऊन डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या श्रेणीमध्‍ये स्‍मार्टथिंग्‍ज कनेक्‍टीव्‍हीटी आहे, जे प्रगत वैशिष्‍ट्ये देते जसे दुरून देखरेखीसाठी मॅप व्‍ह्यू आणि प्रभावी नियंत्रणासाठी क्विक रिमोट.

घरातून काम करणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या जीवनात अधिक सोयीसुविधेची भर करत बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी वाय-फायचा वापर करत सॅमसंगच्‍या स्‍मार्टथिंग्‍ज अॅपशी देखील विनासायासपणे कनेक्‍ट होतात, ज्‍यामुळे तुम्‍ही बिक्‍स्‍बी वॉइस असिस्‍टण्‍ट, अॅलेक्‍सा आणि गुगल होमचा वापर करत एसींमधील सेटिंग्‍ज बदलू शकता किंवा एसी स्विच ऑन/ स्विचऑफ करू शकता. तुम्‍ही स्‍मार्ट एआय ऑटो कूलिंगसह देखील कूलिंग ऑप्टिमाइज करू शकता आणि जिओ-फेन्सिंग आधारित वेलकम कूलिंग वैशिष्‍ट्याच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍ती घरी पोहोचण्‍यापूर्वी रूममध्‍ये आपोआपपणे कूलिंग करू शकतात. नवीन ‘गुड स्‍लीप’ मोडसह हे एसी झोपेच्‍या टप्‍प्‍यांनुसार तापमान समायोजित करत रात्रभर पुरेशी व आल्‍हाददायक झोप मिळण्‍यास मदत करतात.

”आम्‍हाला २०२५ बीस्‍पोक एआय विंडफ्री™ एअर कंडिशनर्ससह होम कूलिंग अनुभवाला नव्‍या उंचीवर नेण्‍याचा, तसेच भारतातील उन्‍हाळ्यादरम्‍यानच्‍या अद्वितीय आव्‍हानांचे निराकरण करण्‍याचा आनंद होत आहे. या एअर कंडिशनर्समधून दैनंदिन राहणीमान उत्‍साहवर्धक करणाऱ्या नाविन्‍यतेप्रती सॅमसंगची कटिबद्धता दिसून येते. एआय-संचालित कूलिंग व ऊर्जा कार्यक्षमता, स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी आणि जीवनशैली उत्‍साहवर्धक करणाऱ्या वैशिष्‍ट्यांना एकत्र करत ही श्रेणी भारतातील ग्राहकांसाठी प्रबळ एआय टेक इनोव्‍हेशन सादर करते,” असे सॅमसंग इंडियाच्‍या डिजिटल अप्‍लायन्‍सेसचे वरिष्‍ठ संचालक गुफरान आलम म्‍हणाले.

सॅमसंगसाठी भारतातील एअर कंडिशनर बाजारपेठेत उत्तम कामगिरीचे वर्ष ठरले आहे, जेथे २०२५ मध्‍ये प्रबळ विक्री व उत्तम गती कायम आहे. बीस्‍पो एआय विंडफ्री लाइनअपच्‍या लाँचसह कंपनी एसी क्षेत्रातील एआय-संचालित क्रांतीचे नेतृत्‍व करण्‍यासाठी स्‍वत:ला सज्‍ज करत आहे. ऊर्जा वापर ऑप्टिमाइज करणारी आणि युजर अनुभव अधिक उत्साहित करणारी स्‍मार्ट एआय वैशिष्‍ट्ये एकीकृत करत ही नवीन श्रेणी बाजारपेठेत सॅमसंगची उपस्थिती अधिक दृढ करण्‍यास सज्‍ज आहे.

एआय-संचालित कूलिंग आणि ऊर्जा कार्यक्षमता

बीस्‍पोक एआय विंडफ्री एसी अत्‍याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा फायदा घेत कूलिंग कार्यक्षमतेला नव्‍या उंचीवर घेऊन जातात. एआय एनर्जी मोड इंटेलिजण्‍टली कूलिंग सेटिंग्‍ज समायोजित करते, ज्‍यामुळे जवळपास ३० टक्‍के वीज बचत होते. परिणामत: एअर कंडिशनर खरेदी करताना ग्राहकांसाठी प्रमुख खरेदी घटकाचे निराकरण होते आणि घटक म्‍हणजे आरामदायीपणाबाबत तडजोड न करता ऊर्जा-कार्यक्षम अप्‍लायन्‍सेससाठी मागणी.

एआय फास्‍ट अँड कम्‍फर्ट कूलिंग वैशिष्‍ट्य अधिकतम फॅन स्‍पीडसह रूम टेम्‍परेचर कमी करत त्‍वरित थंडावा देते. इच्छित तापमान ठेवल्‍यानंतर सिस्‍टम इंटेलिजण्‍टली विंडफ्री™ मोडमध्‍ये बदलते आणि सतत कूलिंग ठेवते, ज्‍यामधून झोप किंवा अतिथींचे मनोरंजन अशा क्रियाकलापांसाठी आरामदायी वातावरण मिळते.

एआय डिजिटल इन्‍व्‍हर्टर कंट्रोल बाहेरील तापमान ५८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्‍यानंतर देखील रूममध्‍ये विनाव्‍यत्‍यय कूलिंग देते, ज्‍यामुळे भारतातील प्रखर उन्‍हाळ्यामध्‍ये देखील कूलिंगची खात्री मिळते.

अद्वितीय स्‍मार्ट वैशिष्‍ट्यांसह स्‍मार्टथिंग्‍ज एकीकरण

नवीन लाइनअपमध्‍ये सॅमसंगचे स्‍मार्टथिंग्‍ज प्‍लॅटफॉर्म आहे, जो वापरकर्त्‍यांच्‍या एअर कंडिशनर्ससोबत संवाद साधण्‍याच्‍या पद्धतीला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. संशोधनामध्‍ये भारतातील ग्राहकांनी सोईस्‍कर कार्यसंचालनांना अधिक प्राधान्‍य दाखवले, जसे स्‍मार्ट अॅपच्‍या माध्‍यमातून सोपे रिमोट कंट्रोल पॉप अप फंक्‍शन. या एसीमध्‍ये क्विक रिमोट सारखी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये आहेत, ज्‍यामुळे वापरकर्ते त्‍यांच्‍या स्‍मार्टफोनमधून एसींची पॉवर, मोड, तापमान आणि एअर व्‍हॉल्‍यूमवर नियंत्रण ठेवू शकतात. यासह प्रत्‍यक्ष रिमोट शोधण्‍याचा त्रास दूर होतो आणि सहज सोयीसुविधेची खात्री मिळते.

मॅप व्‍ह्यू वैशिष्‍ट्य घराचे व्‍हर्च्‍युअल ३डी दृश्‍य देते, ज्‍यामुळे दुरून देखरेख ठेवण्‍यासोबत एसी नियंत्रण करता येतो. ग्राहक रूम टेम्‍परेचर, हवेचा दर्जा व वीजेचा वापर यांसारख्‍या महत्त्वपूर्ण पैलूंची तपासणी करू शकतात, ज्‍यामधून कनेक्‍टेड, स्‍मार्टर राहणीमानाचा अनुभव मिळतो. बिक्‍स्‍बी, अॅलेक्‍सा आणि गुगल असिस्‍टण्‍ट सोबतची सुसंगता वॉइस कंट्रोलची सुविधा देते, ज्‍यामुळे परस्‍परसंवाद विनासायास आणि सर्वोत्तम होतो.

वेलकम कूलिंग युजर घराजवळ पोहोचल्‍यानंतर आपोआपपणे एसी स्विच ऑन करत अधिक सोयीसुविधा देते, ज्‍यामुळे घरी आल्‍यानंतर आरामदायी वातावरणाचा आनंद मिळतो.

अद्वितीय आरामासाठी समर्पित विंडफ्री गुड स्‍लीप वैशिष्‍ट्य

विंडफ्री गूड स्‍लीप वैशिष्‍ट्य विशेषत: रात्रीच्‍या वेळी बेडरूममधील वातावरण ऑप्टिमाइज करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. काळजीपूर्वक तापमान व आर्द्रतेचे नियमन करत हे वैशिष्‍ट्य वीजेमध्‍ये अचानक होणाऱ्या चढ-उताराला प्रतिबंध करते, ज्‍यामुळे झोपमोड होऊ शकते. यामधून आरामदायी व विनाव्‍यत्‍यय झोपेची खात्री मिळते. हे वैशिष्‍ट्य दैनंदिन जीवनात आराम व विश्रांतीचा शोध घेत असलेल्‍या भारतातील ग्राहकांसाठी परिपूर्ण आहे.

अधिक आरामदायीपणा व स्‍वच्‍छता

समकालीन फिल्‍टर्सच्‍या तुलनेत कॉपर अॅण्‍टी-बॅक्‍टेरिअल फिल्‍ट एअर कंडिशनर मेन्‍टेनन्‍समधील सोयीसुविधा आणि कार्यक्षमतेला नव्‍या उंचीवर घेऊन जाते. बाहेरील बाजूने वरील बाजूस असलेला हा फिल्‍टर सहजपणे साफसफाई करण्‍याची सुविधा देतो, ज्‍यासाठी कोणतेही कव्‍हर्स किंवा बाहेरील भाग खुले करण्‍याची गरज भासत नाही. संपन्‍न मेशपासून डिझाइन करण्‍यात आलेला हा फिल्‍टर धूळ कॅप्‍चर करतो, ज्‍यामुळे हीट एक्‍स्‍चेंजर साफ राहण्‍याची आणि कार्यक्षमपणे कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. तसेच, फिल्‍टरमधील कॉपर-युक्‍त यार्न विशिष्‍ट हवानिर्मित जीवाणूंना जवळपास ९९ टक्‍क्‍यांपर्यंत* कमी करते, ज्‍यामुळे घरातील वातावरण शुद्ध व आरोग्‍यदायी राहण्‍यास मदत होते.

टिकाऊपणा आणि विश्‍वसनीयता

दीर्घकाळापर्यंत टिकण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेले बीस्‍पोक एआय विंडफ्री™ एसी ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी आणि एआय इन्‍व्‍हर्टर कम्‍प्रेसरवर १० वर्षांच्‍या वॉरंटीसह येतात. समाविष्‍ट करण्‍यात आलेले ड्युराफिन™ अल्‍ट्रा कोटिंग हीट एक्‍स्‍चेंजरचे गंजण्‍यापासून संरक्षण करते, ज्‍यामधून दीर्घकाळापर्यंत कार्यक्षमता व टिकाऊपणाची खात्री मिळते.

किंमत आणि उपलब्‍धता

३२,९९० रूपयांपासून किंमत असलेल्‍या बीस्‍पोक एआय एअर कंडिशनर्सची नवीन श्रेणी सर्व आघाडीच्‍या रिटेल आऊटलेट्समध्‍ये आणि ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍ससह फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि Samsung.com वर उपलब्‍ध आहे. Air Conditioners – Split AC | Samsung India***

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments