Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुरवांकराने पुण्याच्या केशवनगरमध्ये सुरू केला ऐतिहासिक निवासी प्रकल्प

पुरवांकराने पुण्याच्या केशवनगरमध्ये सुरू केला ऐतिहासिक निवासी प्रकल्प

पुणे, 30 जानेवारी 2025 : भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आदरणीय रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या पुरवांकरा लिमिटेडने (NSE: PURVA | BSE: 532891) पुण्यातील केशवनगर येथे आपला नवीन ऐतिहासिक प्रकल्प पुरवा अॅटमॉस्फियरचे उद्घाटन केले. 10 एकर क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प 70% खुली जागा राखून, सस्टेनेबल डिझाइन आणि आधुनिक सोईसुविधा यांचे सुंदर मिश्रण आहे. उत्तम लाइफस्टाईलसाठी उत्तम असा हा प्रकल्प असेल.

पुरवा अॅटमॉस्फियरमध्ये दोन 30 मजली टॉवर्स आहेत, ज्यात 2 BHK ची 240 आणि 3 BHK ची 180 विस्तृत अपार्टमेंट्स आहेत. नैसर्गिक प्रकाश, वेंटिलेशन आणि वास्तुशास्त्रानुसार डिझाइन केलेले हे रेसिडेन्सेस आराम व कार्यक्षमता यांचे योग्य मिश्रण प्रदान करतात.

पुरवा अॅटमॉस्फियरचे डिझाइन सस्टेनेबिलिटीला मध्यवर्ती ठेवून विचारपूर्वक करण्यात आले आहे. भारतीय ग्रीन बिल्डिंग काउन्सिल (IGBC) प्रमाणित हा प्रकल्प आहे. यामध्ये बालीच्या प्रसिद्ध टेरेसने प्रेरित एक अनोखी लँडस्केपिंग आहे, जी निसर्ग आणि आधुनिक जीवनशैलीला एकत्र आणते. ग्राउंड आणि पोडियमपर्यंत पसरलेली हिरवळ, तसेच प्रकल्पाचे डिझाइन रहिवाशांचे आरोग्य चांगले ठेवेल. प्रकल्पाच्या मध्यभागी एक एकर क्षेत्र असलेला सेंट्रल पोडियम लँडस्केप आहे, ज्यामध्ये क्लब हाउस आणि स्विमिंग पूल आहे.

लाँचवर भाष्य करताना पुरवांकरा लिमिटेडचे सीईओ – वेस्ट अँड कमर्शिअर अॅसेट्स राजत रस्तोगी म्हणाले, “पुणे आमच्या धोरणात्मक विस्तार योजनांमध्ये एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून राहिले आहे आणि पुरवा अॅटमॉस्फियर हा आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विचारपूर्वक डिझाइन केलेली लो-डेन्सिटी घरे, प्रति एकर फक्त 150 फ्लॅट्ससह हा प्रकल्प मोठ्या जागेची आणि प्रायव्हसीची हमी देतो. त्यामुळे हा प्रकल्प आरामदायक आणि सस्टेनेबल जीवनशैलीसाठी एक आदर्श ठिकाण आहे. आम्ही लोकांना त्यांचे स्वप्न जगण्यासाठी सस्टेनेबल जग तयार करण्याप्रती असलेली आमची वचनबद्धता या प्रकल्पातून अधोरेखीत होते. विस्तृत हिरव्या जागांपासून ते काळजीपूर्वक निवडक सुविधांपर्यंत, प्रत्येक गोष्ट आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे की, आम्ही केवळ चार भिंती नव्हे, तर लाइफस्टाईल प्रदान करू.”

50 पेक्षा जास्त विचारपूर्वक निवडक लाइफस्टाईल सुविधांनी युक्त असलेल्या पुरवा अॅटमॉस्फियरमध्ये योगा पॉड्स, सेंसरी गार्डन्स, ऑक्सिजनयुक्त जिम आणि 30,000 चौ. फूट क्लब हाउस यांसारख्या सुविधा आहेत, ज्या आधुनिक शहरी रहिवाशांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करतात. प्रकल्पात हाय-स्ट्रीट रिटेल आणि को-वर्किंग स्पेसही उपलब्ध असतील.

प्रकल्पाचे धोरणात्मक स्थान, प्रस्तावित खराडी ब्रिजजवळ असल्यामुळे, मगापट्टा, हडपसर, कळवणीनगर आणि इतर प्रमुख IT हब्सशी सहज कनेक्टिव्हिटी प्रदान करते.

“हा प्रकल्प केशव नगरच्या मध्यभागी आहे. या प्रकल्पाचे धोरणात्मक स्थान – खराडी आणि मगापट्टा IT पार्क्सच्या जवळ आहे, शिवाय जागतिक दर्जाच्या सोईसुविधा आणि सस्टेनेबल डिझाइन आहे. त्यामुळे पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये आपले स्थान हा प्रकल्प निर्माण करतो. आम्ही विश्वास ठेवतो की, हा प्रकल्प लक्झरी आणि समुदाय जीवनशैलीचे पुनःनिर्माण करेल,” असे रस्तोगी यांनी सांगितले.

खरेदीदार 2 BHK आणि 3 BHK घरांपैकी निवड करू शकतात, ज्याची किंमत 2 BHK साठी ₹95 लाख आणि 3 BHK साठी ₹1.49 कोटींपासून सुरू होते.

पुरवा अॅटमॉस्फियर हा प्रकल्प रेरा नोंदणीकृत आहे. (P52100078951 & P52100078943)

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments