Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedएयर इंडिया आणि केन्या यांच्यात कोडशेयर भागिदारी ·...

एयर इंडिया आणि केन्या यांच्यात कोडशेयर भागिदारी · एयर इंडिया आणि केन्या यांच्यातील कोडशेयर भागिदारी सद्य इंटरलाइन भागिदारीसाठी पूरक · ‘AI’ कोड केन्या एयरवेजवर आणि नैरोबी- मुंबई सेवेसाठी ‘KQ’ · केन्या ते साउथईस्ट एशिया आणि ऑस्ट्रेलिया द्वारे मुंबईच्या प्रवाशांसाठी वन- स्टॉप कनेक्टिव्हिटी

गुरुग्राम/नैरोबी, ३० जानेवारी २०२५ – एयर इंडिया ही भारतातील जागतिक आघाडीची कंपनी आणि केन्या एयरवेज या आघाडीच्या आफ्रिकन कंपनीने कोडशेयर भागिदारी करत भारत व आफ्रिका आणि त्यापलीकडे सुखद प्रवाससेवा उपलब्ध करून देण्याची बांधिलकी दर्शवली आहे. ही कोडशेअर भागिदारी दोन्ही कंपन्यांदरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या इंटरलाइन कराराशी सुसंगत आहे.

कोडशेयर आणि इंटरलाइन भागिदारी एकत्रितपणे दोन्ही कंपन्यांच्या प्रवाशांना विविध ठिकाणी सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देणार असून त्यामुळे त्यांना एकच तिकिट, बॅगेजच्या समान धोरणाचा लाभ होईल व सुरळीतपणे प्रवास करता येईल.

कोडशेयर कराराचा एक भाग म्हणून एयर इंडिया आपला ‘एआय’ डेझिग्नेटर कोड केन्या एयरवेजद्वारे चालवल्या जाणाऱ्या नैरोबी आणि मुंबईदरम्यान रोज दिवसातून दोनदा चालवल्या जाणाऱ्या विमानसेवेवर लावला जाईल. त्यामुळे मुंबईतून एयर इंडियाच्या बँकॉकला (थायलंड) जाणाऱ्या किंवा बँकॉकद्वारे मुंबईला येणाऱ्या, कोलंबो (श्रीलंका), ढाका (बांग्लादेश), माले (मालदीव्ज), मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) आणि सिंगापूरची विमानसेवा घेणाऱ्या प्रवाशांना सहजपणे कनेक्ट होता येईल. त्याशिवाय नैरोबीचे प्रवासी एयर इंडियाद्वारे नैरोबी ते दिल्ली प्रवास करताना भारतातील विविध ठिकाणी जाऊ शकतील.

नव्या करारामुळे केन्या एयरवेज एयर इंडियाद्वारे दिल्ली ते नैरोबीदरम्यान चालवल्या जाणाऱ्या विमानप्रवासावर ‘KQ’ कोड वापरला जाणार असून पर्यायाने केन्या एयरवेजच्या प्रवाशांना आफ्रिकेतून दिल्लीपर्यंत नैरोबीद्वारे प्रवास करता येईल.

‘केन्या एयरवेजसह करण्यात आलेली भागिदारी एयर इंडियाच्या जागतिक विस्तार करण्याच्या व महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये आपले स्थान बळकट करण्याच्या धोरणात्मक ध्येयाशी सुसंगत आहे,’ असे प्रमुख कमर्शियल अधिकारी निपुण अगरवाल म्हणाले. आमच्या कोडशेयर भागिदारीतून दोन्ही कंपन्यांच्या प्रवाशांना लक्षणीय लाभ होईल तसेच भारत व आफ्रिका यांच्यातील हवाई प्रवासाचा विकास होईल.

एयर इंडिया आणि केन्या एयरवेज यांच्यातील इंटरलाइन करारामुळे प्रवाशांना एकाच प्रवासी योजनेअंतर्गंत आफ्रिकेतील २८ ठिकाणी (उदा. अक्रा, अदिस अबाबा, दार एस सलाम, हरारे, जोहान्सबर्ग, केप टाउन, व्हिक्टोरिया फॉल्स, सेशेल्स, किलिमांजारो, मोम्बासा आणि झांझिबार) आणि भारतातील १५ ठिकाणी (उदा. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, गोवा, जयपूर, कोची, कोलकाता आणि हैदराबाद) प्रवास करता येईल.

‘एयर इंडियासह भागिदारीचा विकास करून प्रवाशांसाठी मोठी संधी खुली करताना आम्हाला आनंद होत आहे. या कोडशेयर करारामुळे आम्हाला दोन्ही कंपन्यांच्या नेटवर्क्सवर विविध ठिकाणी सहज कनेक्शन्स उपलब्ध करून देता येईल. यामुळे प्रवास सोपा आणि सोयीस्कर व्हायला मदत होईल,’ असे केन्या एयरवेजचे प्रमुख कमर्शियल आणि कस्टमर ऑफिसर, ज्युलियस थायरू म्हणाले.

एयर इंडिया आणि केन्या एयरवेजद्वारे त्यांचे नेटवर्क्स ते कोडशेयर करारामध्ये आणखी ठिकाणांचा समावेश केला जाणार आहे.

कोडशेयर फ्लाइट्स एयर इंडिया आणि केन्या एयरवेजची बुकिंग चॅनेल्स व ट्रॅव्हल एजंट्सद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments