Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्लिपकार्टकडून फ्लिपकार्ट पेवर क्रेडिट कार्ड बिल प्रदानाची सुविधा

फ्लिपकार्टकडून फ्लिपकार्ट पेवर क्रेडिट कार्ड बिल प्रदानाची सुविधा

● फ्लिपकार्ट लाखो ग्राहकांना सुलभ आणि विश्वासू प्रदान सुविधा देण्यासाठी आपल्या रिचार्ज आणि बिल प्रदान वैशिष्ट्यांचा विस्तार करत आहे.
● या नवीन वैशिष्ट्यामुळे भारत बिल पेमेंट सेवा (बीबीपीएस)द्वारे शून्य सुलभता शुल्कासह वाढत्या क्रेडिट कार्ड बिल प्रदान श्रेणीचा लाभ मिळणार.
बंगळुरू – ३० जानेवारी २०२५: फ्लिपकार्ट या भारताच्या देशांतर्गत ई वाणिज्य मार्केटप्लेसने फ्लिपकार्ट पेवर क्रेडिट कार्ड बिल प्रदानन वैशिष्ट्याच्या अनावरणाची घोषणा केली असून त्याद्वारे सर्व पेमेंटच्या गरजांसाठी हे एक वन स्टॉप सोल्यूशन ठरले आहे. ही नव्याने आलेली श्रेणी लाखो फ्लिपकार्ट ग्राहकांना सुलभ प्रदान करणे शक्य करते आणि त्याचबरोबर भारत बिल पेमेंट सर्व्हिसेसद्वारे (बीबीपीएस) फ्लिपकार्ट पेवर रिचार्ज आणि बिल प्रदान श्रेणीला चालना देते.
क्रेडिट कार्ड बिल प्रदान बीबीपीएससाठी एक महत्त्वाची आणि व्यवहाराच्या संदर्भात ती पाचव्या क्रमांकाची श्रेणी ठरली आहे. आरबीआयने जुलै महिन्यात क्रेडिट कार्ड बिल प्रदान भारत कनेक्टद्वारे करण्याची मंजुरी दिल्यानंतर क्रेडिट कार्ड बिल प्रदानांचा व्यवहार बीबीपीएस प्रदानांच्या ६२% वर पोहोचला. क्रेडिट कार्ड बिल प्रदान रिचार्ज आणि बिल पेमेंट प्लॅटफॉर्मवर समाविष्ट करून फ्लिपकार्ट ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार प्रदान उपाययोजना सुलभ बनवण्याचे काम करत आहे.
या अनावरणाबाबत बोलताना फ्लिपकार्टच्या पेमेंट्स आणि सुपरकॉइनचे उपाध्यक्ष गौरव अरोरा म्हणाले की, “फ्लिपकार्टमध्ये आम्ही सातत्याने आमच्या ग्राहकांसाठी एक सर्वांगीण आणि सुलभ प्रदान व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या रिचार्जेस आणि बिल पेमेंट्स प्लॅटफॉर्मवर क्रेडिट कार्ड बिल प्रदानांचा समावेश केल्यामुळे प्रदानांच्या सर्व गरजांसाठी प्राधान्याचे वन स्टॉप सोल्यूशन बनण्याची वचनबद्धता दिसून येते. या अनावरणासोबत आम्ही लाखो ग्राहकांसाठी बिल प्रदान सुलभ बनवण्याचे आणि बीबीपीएसवर ही महत्त्वाची श्रेणी वेगाने वाढवण्याचे ध्येय समोर ठेवत आहोत.”
फ्लिपकार्टने २०२३ मध्ये ‘भारत कनेक्ट’ उपक्रमाअंतर्गत आपल्या रिचार्जेस आणि बिल प्रदान सुविधा सुरू केल्या. यात भारत बिल पेमेंट सर्व्हिसेस (बीबीपीएस)अंतर्गत एजंट संस्था म्हणून तिची नोंदणी करण्यात आली असून त्यातून अंतिम वापरकर्त्यांना ऑनलाइन बिल प्रदान सुविधा देण्यात येत आहेत. रिचार्जेस आणि बिल प्रदान प्लॅटफॉर्म नऊ बिल प्रदान वर्गांना पाठबळ देतो. त्यात प्रीपेड, मोबाइल पोस्टपेड, वीजपुरवठा, ब्रॉडबॅन्ड पोस्टपेड, लँडलाइन पोस्टपेड, फास्टॅग, डीटीएच, एलपीजी सिलेंडर आणि गॅस यांचा समावेश आहे. आपल्या पेमेंट पर्यायांच्या वाढत्या श्रेणीसह रिचार्जेस आणि बिल प्रदान यांचे उद्दिष्ट फ्लिपकार्ट अॅपवर थेट आर्थिक व्यवहार सुनियोजित करण्याचे आहे.
फ्लिपकार्ट ग्रुपबाबत
फ्लिपकार्ट ग्रुप हा भारताच्या आघाडीच्या डिजिटल वाणिज्य आस्थापनांपैकी एक असून त्यांच्याकडे फ्लिपकार्ट, मिंत्रा, फ्लिपकार्ट होलसेल, क्लिअरट्रिप आणि सुपर.मनी अशा कंपन्यांचे जाळे आहे.
फ्लिपकार्टची स्थापना २००७ साली झाली. त्यांनी लाखो विक्रेते, व्यापारी आणि लघु उद्योगांना भारताच्या डिजिटल वाणिज्य क्रांतीत सहभागी होण्यासाठी सक्षम केले आहे. फ्लिपकार्टच्या मार्केटप्लेसवर ५०० दशलक्षपेक्षा अधिक नोंदणीकृत ग्राहक आहेत आणि ८०+ वर्गवारींमध्ये १५० दशलक्षपेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध आहेत. आज या प्लॅटफॉर्मवर शॉप्सी विक्रेत्यांसह १.४ दशलक्षपेक्षा जास्त विक्रेते आहेत. भारतीयांना तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णतेद्वारे मौल्यवान अनुभव देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा व आनंद देण्याचा वसा घेतलेल्या फ्लिपकार्टने उद्योजकांच्या तसेच एमएसएमईंच्या अनेक पिढ्यांचे सबलीकरण करून हजारो रोजगार निर्माण केले आहेत. फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरी, नो कॉस्ट ईएमआय, ईझी रिटर्न्स आणि यूपीआयसारख्या सेवा सुरू केल्या आहेत. या ग्राहककेंद्री नावीन्यपूर्ण गोष्टींमुळे सर्व ग्राहकांना डिजिटल पेमेंट उत्पादनांचा लाभ मिळतो आणि लाखो भारतीयांना ऑनलाइन खरेदी परवडणाऱ्या दरात सहजसाध्य होते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा media@flipkart.com

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments