Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात होणार कथक गुरू पंडिता रोहिणी भाटे ह्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य नृत्य महोत्सव 

पुण्यात होणार कथक गुरू पंडिता रोहिणी भाटे ह्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य नृत्य महोत्सव 

 

 

पुणे :

 

पुणे शहर हे सांस्कृतीक भूमी मानलं जातं.

इथे गल्लोगल्ली नृत्यवर्ग चालतात व इथल्या प्रत्येक सांस्कृतीक कार्यक्रमाला इथल्या जाणकार प्रेक्षकवर्गाचा पाठिंबा असतो.

अश्या ह्या पुणे शहराचे भूषण असलेल्या, कथक नृत्य गुरू पंडिता रोहिणी भाटे ह्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नृत्य महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

 

 

आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील ह्यांच्या प्रोत्साहनाने व श्री. पूनित जोशी आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था चे कार्यकर्ते ह्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा नृत्य महोत्सव साजरा होणार आहे.

ह्या पुण्यात होणाऱ्या गुरू पंडिता रोहिणी भाटे महोत्सवाचे हे पहिले वर्ष आहे. आणि तो पुढच्या प्रत्येक वर्षी पुढे चालू ठेवायचा आहे. ह्याच निमित्ताने सर्व नृत्य विद्यार्थिनी, मित्रपरिवार, नातेवाईक या सर्वांना आग्रहाचे आमंत्रण आहे.

 

ह्या नृत्य महोत्सवाची मूळ संकल्पना कथक गुरू विदुषी शमा भाटे ह्यांची असून अनेक वर्षांच्या पाठपुराव्याने ती आज फळाला येत आहे. ह्या महोत्सवाला शमा ताईंच्या बरोबरीने ज्येष्ठ नृत्यांगना आणि गुरू डॉ. श्रीमती सुचेता चापेकर आणि गुरू मनीषा साठे ह्यांचे ही बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे. ह्या कार्यक्रमाचे संयोजन श्री. अजय धोंगडे यांचे आहे.

 

हा महोत्सव येत्या शनिवारी, 27 जानेवारीला, शुभारंभ लॉन्स, D.P. रोड, पुणे येथे, संध्याकाळी 5.45 वाजता होणार आहे.

 

 

ह्या कार्यक्रमात रोहिणी ताईंना आदरांजली म्हणून त्यांची संस्था नृत्यभारतीच्या २० नृत्यांगना रोहिणी ताइंची संरचना असलेली प्रस्तुती सादर करतील, तसेच शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सभासद असलेल्या कथक व भरतनाट्यम नृत्यांगना त्यांची अर्घ्यम ही नृत्यप्रस्तुती सादर करतील.ह्याची संरचना श्रीमती शमा भाटे ह्यांची आहे. पुण्याबाहेरून विशेष आमंत्रित जगविख्यात कलाकारांमध्ये गुरू श्रीमती. रमा वैद्यनाथन आणि ग्रुप (भरतनाट्यम), गुरू श्रीमती. वास्वती मिश्रा(कथक) आणि ग्रुप आणि गुरू श्रीमती प्रीती पटेल आणि ग्रुप (मणिपुरी) ह्या नृत्यप्रस्तुती सादर करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments