Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedरेड एफएमने पुण्याच्या लाडक्या मुलाचे, आरजे बंड्याचे मॉर्निंग नंबर १ वर स्वागत...

रेड एफएमने पुण्याच्या लाडक्या मुलाचे, आरजे बंड्याचे मॉर्निंग नंबर १ वर स्वागत केले*

 

भारताचे आघाडीचे प्राइव्हेट रेडिओ आणि एंटरटेनमेंट नेटवर्क रेड एफ एम अत्यंत आनंदानं जाहीर करत आहे पुण्यातील श्रोत्यांसाठी आर. जे. बंड्याचे रेड एफएम वर दिमाखात आगमन. 15 वर्षांहून अधिक माध्यमांचा अनुभव असलेला आरजे बंड्या आज घरोघरी पुण्यातील सर्वोत्तम 3 आरजे पैकी एक म्हणून ओळखला जातो.

 

जानेवारी २ 2024 ला आरजे बंड्याने रेड एफएम पुणेच्या मॉर्निंग नंबर वन ह्या शोची सूत्रे हाती घेतली. हा शो दररोज सकाळी 7 ते 11 ह्या वेळेत प्रसारित केला जातो. पुण्यातील आघाडीचा आर जे असलेला आर जे बंड्याला रेडीओ इंडस्ट्रीतलाच अनुभव नव्हे तर टेलिव्हिजन वर प्रसारित होणारी लोकप्रिय मालिका स्वप्नांच्या पलीकड मध्ये अजिंक्य देव सोबत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

 

ह्याच्या व्यतिरिक्त, महेश टिळेकर निर्मिती हवा हवाई ह्या मराठी सिनेमात ही त्याने काम केले आहे. तसेच लाईव्ह शो मराठी बिग बॉस सीजन 3 मध्ये एका सेलिब्रिटी रेडिओ जॉकी ची भूमिका ही साकारली आहे. असा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला असलेला आरजे बंड्या, ज्याची आहे भाषेवर जबरदस्त पकड आणि स्थानिक लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध. आता सज्ज आहे पुणेकऱ्यांच्या ह्रुदयात एक आगळे वेगळे स्थान बनवण्यासाठी.

 

तर आरजे बंड्या चे पुनरागमन अविस्मरणीय करण्यासाठी, रेड एफ एम ने आयोजीली होती एक कोंपिटेशन ज्या मध्ये 2 लकी लिस्नर्स ना बंड्या सोबत  पॅरामोटरिंग करत “हवा में फिलिंग अनुभवण्याचा मिळाला एक चान्स” हे साहसी क्षण ब्रॉडकास्ट केला गेला ऑन एअर आणि रेड एफ एम च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस वर ज्यामुळे बंड्या आणि त्याच्या श्रोत्यांना मिळाला एक अभूतपूर्व अनुभव.

 

पुणेकर, आता तयार व्हा अश्याच भन्नाट रेडिओ एक्सपीरियंससाठी ट्यून इन करा मॉर्निंग नंबर वन सकाळी ७ ते ११ सोमवार ते शुक्रवार फक्त 93.5 रेड एफएम वर.

 

*रेड एफएम बद्दल:*

 

रेड एफ एम हे केवळ भारतातील सर्वात मोठे रेडिओ चॅनेलच नाही तर सर्वात मोठ्या मनोरंजन नेटवर्कपैकी एक आहे. आम्ही हायपर लोकल आणि हायपर व्होकल आहोत. सोबतच आमच्या ब्रँड फिलॉसॉफीने आणि ‘बजाते रहो!’ ह्या attitude ने आम्ही करोडो लोकांच्या हृदयाच्या केंद्रस्थानी आहोत. आमचा दोन दशके जुना वारसा आणि कौशल्याचा उपयोग करून, आम्ही ‘लार्जर देन लाइफ़’ चा अनुभव देतो, त्याचं बीज पेरतो.  देशभरातील 69 रेडिओ स्टेशन्सच्या माध्यमातून आम्ही आमच्या फुटप्रिंट उमटवत लिस्नर सोबत भावनिक संबंध जोडून प्रगती करत आहोत. आम्ही मूळ पॉडकास्ट, डिजिटल शो आणि ऑन-ग्राउंड इव्हेंट तयार प्लॅन करतो, ते execute करतो.  स्वतंत्र म्युजीक, पॅन इंडिया आमचा आवाज आणि आमचं सत्य संपूर्ण देश ऐकतो.  ‘स्टेशन ऑफ एक्सप्रेशन ‘ म्हणून Red FM ने BEST BRAND, BEST FM STATION आणि BEST RJ सह 567 हून अधिक पुरस्कार-विजेत्या मोहिमांचा गौरव केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments