बेंगळुरू, भारत, फेब्रुवारी ३, २०२५ – जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनने आज भारतातील बेंगळुरूमध्ये त्यांच्या नेक्स्ट इंजीनिअर्स कॉलेज सुसज्जता उपक्रमाच्या विस्तारीकरणाची घोषण केली, ज्यामागे तरूणांना इंजीनिअरिंगमध्ये करिअर घडवण्यास प्रेरित करण्याचा उपक्रमाचा उद्देश अधिक दृढ करण्याचा मनसुबा आहे.
नेक्स्ट इंजीनिअर्सचे विस्तारीकरण भारतातील प्रबळ इंजीनिअरिंग दर्जा निर्माण करण्यास मदत करेल. आज करण्यात आलेल्या घोषणेसह जीई ऐरोस्पेस फाऊंडेशन बेंगळुरू केंद्रामधील नेतृत्व व स्वयंसेवकांसोबत शैक्षणिक सहयोगीला शोधण्याच्या दिशेने वाटचाल करेल, ज्याची २०२५ च्या शेवटी घोषणा करण्यात येईल.
“भारतात जीई ऐरोस्पेसने २५ वर्षांहून अधिक काळापासून शैक्षणिक संस्थेसोबत सहयोग करत उद्योगासाठी नवीन तंत्रज्ञानांना पाठिंबा दिला आहे,’ असे जीई ऐरोस्पेसच्या इंडिया टेक्नॉलॉजी सेंटरमधील चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर अलोक नंदा म्हणाले. “स्थानिक पातळीवर नेक्स्ट इंजीनिअर्स उपक्रमाचे विस्तारीकरण इंजीनिअरिंगमध्ये करिअर घडवण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवेल.”
जीई ऐरोस्पेसच्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण, जीई ऐरोस्पेसच्या उत्पादनाची क्षमता व इंजीनिअरिंग उपस्थिती आणि उपक्रमामधील बहुप्रतिक्षित सहभाग अशा अनेक निकषांच्या आधारे बेंगळुरूची निवड करण्यात आली. भारतात जीई ऐरोस्पेस कंपनीचे इंजिन्स व उत्पादनांच्या संपूर्ण जीवनचक्राला पाठिंबा देते. कंपनीचा एसटीईएम शिक्षणसह स्थानिक समुदायामध्ये स्वयंसेवा करण्याचा प्रबळ इतिहास आहे.
“आम्हाला बेंगळुरूमध्ये आमच्या नेक्स्ट इंजीनिअर्स उपक्रमाची घोषणा करताना अत्यंत अभिमान वाटत आहे,” असे जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघन थर्लो म्हणाले. “जगभरातील जवळपास २२,००० विद्यार्थ्यांनी आमच्या उपक्रमाच्या माध्यमातून इंजीनिअरिंगची क्षमता व शक्यतेचा अनुभव घेतला आहे आणि जीई ऐरोस्पेस स्वेच्छेने त्यांना पाठिंबा देते. आम्ही भारतात विस्तारित होत असलेल्या या उपक्रमासह अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास उत्सुक आहोत.”
२०२४ मध्ये, जीई ऐरोस्पेस फाऊंडेशनने नेक्स्ट इंजीनिअर्सचा विस्तार करण्यासाठी २०३० पर्यंत २० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक माध्यमिक शाळा ते कॉलेजमधील इजीनिअरिंगमध्ये करिअर घडवण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तफावत दूर करण्यामध्ये मदत करेल. नेक्स्ट इंजीनिअर्स उपक्रम सध्या सिनसिनाटी, ओहायो, ग्रीनव्हिल, अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना, जोहान्सबर्ग (दक्षिण आफ्रिका), स्टॅफोर्डशायर (युनायटेड किंग्डम) आणि वॉर्सा (पोलंड) येथील विद्यार्थ्यांना सेवा देतो, ज्यामधून जीई ऐरोस्पेसची जागतिक पोहोच आणि जगभरातील समुदायांवर असलेला प्रभाव दिसून येतो.


