Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे सिटी मॅरेथॉन स्पर्धेत प्रधान किरुळकर, शितल तांबे, सचिन यादव, अश्विनी दरवाडे...

पुणे सिटी मॅरेथॉन स्पर्धेत प्रधान किरुळकर, शितल तांबे, सचिन यादव, अश्विनी दरवाडे यांना विजेतेपद

पुणे,4 फेब्रुवारी 2025: ‘द पूना क्लब लिमिडेट’ यांच्या संकल्पनेतून दोराबजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे एकझ्युट केलेल्या व सदर्न कमांड पुणे यांच्या सहकार्याने आयोजित पुणे सिटी मॅरेथॉन स्पर्धेत प्रधान किरुळकर, शितल तांबे, सचिन यादव, अश्विनी दरवाडे यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेत 15000धावपटूंनी आपला सहभाग नोंदवला होता. 21किमी(अर्ध मॅरेथॉन) मध्ये पुरूष गटात प्रधान किरुळकर याने 1:06:49सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, महिला गटात शितल तांबे हीने 1:22:17सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद पटकावले.

10 किमी मध्ये पुरुष गटात सचिन यादव याने 31:51सेकंद वेळ नोंदवत विजेतेपदाचा मान पटकावला. तर महिला गटात डॉ. अश्विनी दरवाडे हीने 36:57सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळविले.

स्पर्धकांना २१किमी साठी बंडगार्डन रस्त्यावरील पूना क्लब येथून सुरुवात झाली त्यानंतर सदर्न कमांड मार्गे, मनोज पांडे एनक्लेव्ह, लष्कर पोलीस स्टेशन रोड, हायलँड इव्ह, परेड ग्राउंड रोड, मिल्खा सिंग स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आर्मी कॅन्टीन, सदर्न कमांड सिंग्नल, घोरपडी बाजार पोस्ट ऑफिस, जेजे चेंबर्स, ए १ रोलर स्केटिंग रोड प्रॅक्टिस येथून पुन्हा पूना क्लब मैदान असा मार्ग पूर्ण करावयाचा होता.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक व सहभागींना पदक आणि प्रमाणपत्र, रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सदर्न कमांडचे मुख्य लेफ्टनंट जनरल एसपी सिंग, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, आयकर विभागाच्या प्रिंसीपल डायरेक्टर रीना झा त्रिपाठी, सीजीएसटीचे मुख्य आयुक्त मयंक कुमार, पुना क्लबचे अध्यक्ष गौरव गढोक, पुना क्लबचे उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले, दोराबजी चॅरिटेबल ट्रस्टचे जहांगीर दोराबजी, क्लबच्या समितीचे सदस्य व रेस डायरेक्टर शैलेश रांका यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदर्न कमांडचे मेजर जनरल विर्क, पुणे पोलीस सहआयुक्त रंजन शर्मा, कौस्तुभ राडकर, इंडियन रेल्वेचे डीआरएम राजेश कुमार वर्मा आणि बँक ऑफ महराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक निदु सक्सेना व क्लबचे समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

दोराबजी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी एकझ्युट केला होता. स्पर्धेला सदर्न कमांड हेड क्वार्टर, पुणे महानगरपालिका, इन्कम टॅक्स स्पोर्ट्स अॅण्ड रेक्रिशन क्लब, पुणे जीएसटी विभाग, पुणे पोलिस, कारागृह विभाग,.वायरलेस यांचा मॅरेथॉनला सहयोग लाभला होता.

निकाल:
21किमी(अर्ध मॅरेथॉन):
पुरुष: 1. प्रधान किरुळकर(1:06:49सेकंद);
महिला: 1. शितल तांबे(1:22:17सेकंद);

10 किमी गट:
पुरुष: 1. सचिन यादव(31:51सेकंद);
महिला: 1. डॉ. अश्विनी दरवाडे(36:57सेकंद).

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments