पिंपरी, दि. ४ फेब्रुवारी २०२५ :- पिंपरी चिंचवड शहरात प्रतिवर्षी १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येते. शहरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळे, विविध शैक्षणिक व इतर संस्था, ट्रस्ट, कामगार संघटना, व्यक्ती कार्यक्रमात सहभागी होतात,तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व आयोजित करण्यात येते.
यावर्षी बुधवार १९ फेब्रुवारी २०२५ रोजी जयंती व प्रबोधन पर्व साजरे करण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, पोलिस प्रशासन, महापालिका अधिकारी आदी सर्वांची एक समन्वय बैठक बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील दिवंगत माजी महापौर मधुकर पवळे सभागृह येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या बैठकीस संबंधित मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधन पर्वासाठी आढावा बैठकीचे उद्या दि.५ फेब्रुवारी रोजी आयोजन…
RELATED ARTICLES


