Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रसाद ओक, डॉ. सौरभ गाडगीळ यांना प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कार बीएमसीसी...

प्रसाद ओक, डॉ. सौरभ गाडगीळ यांना प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कार बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचा ४० वा वार्षिक मेळावा ; ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची उपस्थिती

पुणे : बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेच्या ४० व्या वार्षिक मेळाव्याच्या निमित्ताने प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयातील टाटा सभागृहात होणा-या कार्यक्रमात प्रख्यात अभिनेते प्रसाद ओक आणि पीएनजी ज्वेलर्सचे संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांना प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्काराने गौरविण्यात येईल, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी दिली.

संघटनेचे सचिव सुहास पटवर्धन म्हणाले, बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाला ८० वर्षे आणि माजी विद्यार्थी संघटनेला ४० वर्षे पूर्ण होत असल्याने या सोहळ्याला यंदा विशेष महत्व आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि राज्याचे जमाबंदी व भूमी अभिलेख आयुक्त डॉ. सुहास दिवसे हे उपस्थित राहणार आहेत.

मुख्य पुरस्कारांसोबतच अर्थशास्त्र विषयाच्या प्रमुख, सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या माजी संचालक व सध्या बीएमसीसी मधील डी.जी. कर्वे संशोधन अध्यासन केंद्राच्या प्रमुख डॉ.वसुधा गर्दे आणि माजी उपप्राचार्य वाणिज्य विषयाचे प्रमुख व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुप्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. संजय कंदलगावकर या दोन निवृत्त प्राध्यापकांचा बीएमसीसी गुरुवर्य पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. सन्मानचिन्ह आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

खजिनदार सुहास धारणे म्हणाले, याशिवाय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांना इतर पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. व्यावसायिक रायकुमार नहार यांना उद्योगभूषण पुरस्कार, निवृत्त व्हाईस एअर मार्शल जयंत इनामदार यांना शहीद मेजर कुणाल गोसावी शौर्य पुरस्कार, पत्रकार प्रसाद पानसे यांना वरुणराज भिडे पुरस्कार, अभिनेता अथर्व कर्वे याला सुहास कुलकर्णी नाटय पुरस्कार, गायिका अमृता खाडीलकर – नातू यांना बाळासाहेब सरपोतदार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

प्राचार्य डॉ. राजेश कुचेकर म्हणाले, टेनिसपटू वैष्णवी आडकर, रोलर स्केटींगपटू मृगनयनी शिंदे यांचा शिवराम फळणीकर पुरस्काराने या दोन आजी विद्यार्थीनींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या वेळी आजी विद्यार्थी कलाकार विविध गुणदर्शन कार्यक्रम देखील करणार आहेत. तरी आजी व माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघतनेतर्फे करण्यात आले आहे.

————————————————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments