हेक्सावेयर टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागांसाठी ६७४ ते ७०८ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे.
अँकर गुंतवणूकदारांना मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बोली लावता येईल.
बोली/ऑफर खुली होण्याची तारीख – बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५, आणि बंद होण्याची तारीख – शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५
कमीत कमी २१ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास २१ च्या पटीत बोली लावावी लागेल.
दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजीचे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस वाचण्यासाठी लिंक: https://hexaware.com/wp-content/uploads/2025/02/Red-Herring-Prospectus.pdf
राष्ट्रीय, ६ फेब्रुवारी २०२५: हेक्सावेयर टेक्नॉलॉजीज लिमिटेडने आपला प्रत्येकी १ रुपया दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागांचा आयपीओ बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. अँकर गुंतवणूकदारांना कामकाजाचा एक दिवस आधी म्हणजे मंगळवार, ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बोली लावता येईल. बोली/ऑफर शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५ रोजी बंद होईल.
या ऑफरसाठी प्रत्येक इक्विटी समभागासाठी ६७४ ते ७०८ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी २१ इक्विटी समभागांसाठी आणि त्यापेक्षा जास्त समभाग हवे असल्यास २१ च्या पटीत बोली लावावी लागेल.
आयपीओमध्ये सीए मॅग्नम होल्डिंग्स (समभाग विक्री करू इच्छिणारे प्रमोटर समभागधारक) यांच्याकडून ८७,५०० मिलियन रुपयांपर्यंतच्या इक्विटी समभागांच्या विक्रीसाठीच्या ऑफरचा समावेश आहे.
ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार, संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(1) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि सेबी आयसीडीआर नियम क्रमांक 32(1) ला अनुसरून या ऑफरमधील कमीत कमी 50% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील. यासाठी लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे किंवा प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्याचे इक्विटी समभाग अँकर गुंतवणूकदारांना ज्या किमतीला देण्यात आले त्यापेक्षा जास्त किमतीची बोली येणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले प्रत्येकी 1 रुपया दर्शनी मूल्य असलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी ऑफर किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे.
पण जर म्युच्युअल फंडांची एकूण मागणी नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल तर वाटपासाठी उपलब्ध असलेले उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील.
नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल. नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे.
सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 35% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे.
इक्विटी समभाग पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येतील, ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या बोली येणे आवश्यक आहे.
सर्व बिडर्स (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.
या कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.
या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जे.पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचएसबीसी सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (आधीची आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड) हे आहेत.


