Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमाला

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमाला

पुणे, ता. 9 फेब्रुवारी ः गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालयात (विद्यावर्धिनी शाळा) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेचे हे 35 वे वर्ष होते.
हुशार विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण संपादन करता यावेत आणि अनुत्तीर्ण होण्याची भिती वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी नेमका कसा अभ्यास करावा याचे मार्गदर्शन तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांनी केले.
प्रा. लक्ष्मण मालुसरे, प्रकाश माळी, जाई देशपांडे, शैलजा जगताप, प्रा. विजयकुमार भवारी या शिक्षकांची व्याख्याने झाली. मुख्याध्यापिका ज्योती देडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय माने, विशाल मोहिते, यशवंत नेटके, संजय आदवडे, नंदकुमार कदम यांनी संयोजन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments