Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedडी. एल. एड्. परीक्षेचा निकाल जाहीर

डी. एल. एड्. परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे, दि. 10 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या डी.एल.एड्. परीक्षेचा निकाल परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविली आहे.

मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 4 हजार 285 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 229 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. सर्व माध्यमातील एकूण 2 हजार 461 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित अध्यापक विद्यालयामार्फत यथावकाश हस्तपोच मिळणार असून उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत मागणीसाठी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करता येईल, असेही श्रीमती ओक यांनी कळविले आहे.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments