पुणे, दि. 10 : आगामी इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना अभ्यास व परीक्षेविषयी समस्या निर्माण झाल्यास त्यांना मार्गदर्शन करणे व तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे विभागीय मंडळाच्या कक्षेतील पुणे, अहिल्यानगर व सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव औदुंबर उकिरडे यांनी कळविली आहे.
विद्यार्थी व पालकांना परीक्षेसंदर्भात काही समस्या असल्यास खाली दिलेल्या भ्रमणध्वनीवर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत समुपदेशकांशी संपर्क साधता येईल. समुपदेशकांची नाव व भ्रमणध्वनी क्रमांक असे : पुणे- स्नेहा सडविलकर (9011302997) पूनम पाटील (8263876896), संध्या फळसणकर (8767753069), बारामती- गायत्री वाणी (7387400970), सोलापूर- वृषाली आठवले (9834084593), मीनाक्षी हिरेमठ (8329230022), संगीता सपकाळ (9552982115).
परीक्षा कालावधीत सकाळी 8 ते रात्री 8 यावेळेत इयत्ता 10 वी साठी भ्रमणध्वनी क्रमांक 9423042627 व इयत्ता 11 वी साठी 7038752972 हे हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध असल्याचेही श्री. उकिरडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
****


