या उपक्रमाचा हर्बलाइफच्या व्यापक नाविन्यता व शाश्वतता ध्येयांशी संलग्न राहत वनस्पती-आधारित न्यूट्रास्युटिकल्स, फायटोस्युटिकल्स आणि फायटोफार्मोस्युटिकल्समधील मागणी व पुरववठ्यातील तफावत दूर करण्याचा मनसुबा आहे
राष्ट्रीय, १० फेब्रुवारी २०२५: हर्बलाइफ या प्रमुख आरोग्य व वेलनेस कंपनी, समुदाय आणि प्लॅटफॉर्मने हर्बलाइफ सीएसआर उपक्रमांतर्गत हर्बलाइफ-आयआयटीएम प्लांट सेल फर्मेन्टेशन टेक्नॉलॉजी लॅब स्थापित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्राससोबत करारावर स्वाक्षरी केली. आयआयटी मद्रास येथे करारावर स्वाक्षरी करण्याचा समारोह आयोजित करण्यात आला. याप्रसंगी हर्बलाइफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अजय खन्ना व आयआयटी मद्रासचे डीन – माजी विद्यार्थी व कॉर्पोरेट रिलेशन्स प्रा. अश्विन महालिंगम आणि आयआयटीएमचे प्रतिनिधीत्व करणारे इतर सदस्य उपस्थित होते.
हा सहयोग भारत सरकारच्या बायो-ई३ धोरणाशी संलग्न आहे. या सहयोगाचा भारताला जैव-उत्पादनासाठी जागतिक हब बनवण्याचा आणि माननीय पंतप्रधानांचा दृष्टिकोन ‘आत्मनिर्भर भारत’ला प्रगत करण्याचा मनसुबा आहे. ही लॅब वेलनेस क्षेत्रातील नाविन्यता, क्षमता निर्माण व उद्योग सहयोगासाठी उत्प्रेरक म्हणून सेवा देईल, तसेच उद्योजकतेला चालना देखील देईल.
सेंटर ऑफ एक्सलन्स – हर्बलाइफ प्लांट सेल फर्मेन्टेशन टेक्नॉलॉजी लॅबचा उच्च दर्जाचा हर्बल कच्चा माल आणि फायटोकेमिकल्ससाठी शाश्वत सोल्यूशन्समध्ये अग्रस्थानी राहण्यावर लक्ष केंद्रित आहे. ही लॅब प्लांट सेल फर्मेन्टेशन टेक्नॉलॉजीचा वापर करत शाश्वत हर्बल कच्चा माल उत्पादित करण्याचे केंद्र असेल. उच्च दर्जाच्या फायटोकेमिकल्सची खात्री देण्यासोबत हे केंद्र न्यूट्रास्युटिकल्स, कॉस्मस्युटिकल्स व आयुष सुत्रीकरणांमधील नाविन्यतेला चालना देईल, ज्यामुळे प्रत्यक्षरित्या यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (एसडीजी३ – उत्तम आरोग्य व स्वास्थ्य) प्रती योगदान देईल.
या सहयोगात्मक प्रयत्नामुळे प्लांट सेल टेक्नॉलॉजीचा वापर करत नियंत्रित परिस्थितीत औषधी वनस्पतींची विट्रो लागवड शक्य होईल, ज्यामुळे वर्षभर उपलब्धता, शुद्धता आणि जैवक्रिय सुसंगतेची खात्री मिळेल. व्यतिरिक्त, प्रगत बायोरिएक्टर-आधारित स्केलिंगमुळे कमीत-कमी जागेत मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येईल, कमी जमिनक्षेत्र व पारंपारिक शेतीशी संबंधित लांब कापणी चक्रांवर मात होईल आणि हरित निष्कर्षण तंत्रज्ञानामुळे जैवक्रिय संयुग उत्पादनात शाश्वतता येईल.
प्लांट सेल फर्मेन्टेशन टेक्नॉलॉजी लॅबमध्ये प्रामुख्याने ४ प्रमुख फोकस क्षेत्रे आहेत – आरअँडडी, ट्रान्सलेशनल रिसर्च व ब्ल्यू-स्काय प्रकल्पांची हाताळणी करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधन; औषधी अर्कांकरिता मोठ्या प्रमाणात प्लांट सेल फर्मेन्टेशनची हाताळणी करण्यासाठी शाश्वत जैवउत्पादन; फायटोकेमिकल शोध व पुनर्वापरासाठी सिलिको तपासणीमधील तंत्रज्ञान-संचालित सोल्यूशन्स; लुप्त औषधी प्रजातींच्या शेतात लागवडीसाठी सोमॅटिक एम्ब्रायोज आणि वनस्पती सामग्रीच्या उत्पादनात संवर्धन प्रयत्न; आणि नाविन्यतेला चालना देण्यासाठी हॅकेथॉन तसेच प्रवेगक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी इकोसिस्टम एंगेजमेंट.
हर्बलाइफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अजय खन्ना म्हणाले, “हर्बलाइफ शाश्वततेप्रती योगदान देणाऱ्या नाविन्यतेला चालना देण्याप्रती कटिबद्ध आहे. पुन्हा एकदा यावर्षी आयआयटी मद्रासोबतचा आमचा सहयोग न्यूट्रास्युटिकल व वेलनेस क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने प्रयत्न आहे. आयआयटी मद्रासमध्ये हर्बलाइफ प्लांट सेल फर्मेन्टेशन टेक्नॉलॉजी लॅब वेलनेस क्षेत्रात नाविन्यता, क्षमता निर्माण आणि उद्योग सहयोग वाढवण्यासाठी उत्प्रेरक असेल. भारताच्या बायो-ई३ पॉलिसी (२०२४) आणि नॅशनल बायोटेक्नॉलॉजी डेव्हलमेंट स्ट्रॅटेजी (२०२२-२५) शी संलग्न असलेला हा उपक्रम भारताला जैवउत्पादनामधील लीडर म्हणून स्थापित करेल, तसेच माननीय पंतप्रधानांचा दृष्टिकोन ‘आत्मनिर्भर भारत’प्रती योगदान देखील देईल.”
आयआयटी मद्रासच्या भूपत अँड ज्योती मेहता स्कूल ऑफ बायोसायन्सेसच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रा. स्मिता श्रीवास्तव म्हणाल्या, “हर्बलाइफ-आयआयटीएम प्लांट सेल फर्मेन्टेशन टेक्नॉलॉजी लॅब शाश्वत नाविन्यतेमधील मोठे पाऊल आहे. हे अत्याधुनिक केंद्र अग्रगण्य संशाधेनाला चालना देईल, शैक्षणिक प्रशिक्षणाला गती देईल आणि उद्योगामधील उपयोजनांसाठी प्रभावी तंत्रज्ञान विकास सक्षम करेल. मी हर्बलाइफचे या उपक्रमावर विश्वास दाखवण्यासोबत पाठिंबा देण्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. सहयोगाने, आम्ही प्लांट सेल फर्मेन्टेशनच्या लँडस्केपमध्ये परिवर्तन करण्यासाठी, तसेच विज्ञान, उद्योग व समाजाकरिता अर्थपूर्ण निष्पत्ती घडवून आणण्यासाठी सज्ज आहोत.”
आयआयटी मद्रासचे डीन – माजी विद्यार्थी व कॉर्पोरेट रिलेशन्स प्रा. अश्विन महालिंगम म्हणाले, “आयआयटीएम व हर्बलाइफ यांच्यामधील सहयोगाला एका यशस्वी टप्प्याकडून दुसऱ्या यशस्वी टप्प्याकडे वाटचाल करताना पाहण्याचा आनंद होत आहे. प्लांट सेल फर्मेन्टेशन टेक्नॉलॉजी लॅबच्या स्थापनेसाठी पाठिंबा देत हर्बलाइफ उच्च दर्जाचा हर्बल कच्चा माल व फायटोकेमिक्ल्ससाठी शाश्वत सोल्यूशन्सच्या क्षेत्रातील लीडर ठरली आहे. हा सहयोग अगदी योग्य वेळी करण्यात आला आहे, जो आयआयटीएम व हर्बलाइफसोबत उज्ज्वल, शाश्वत भविष्याच्या दिशेने आपल्या देशाच्या ध्येयांसाठी देखील महत्त्वाचा आहे.”
हर्बलाइफ इंटरनॅशनल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बाबत
हर्बलाइफ (एनवायएसई: एचएलएफ) प्रमुख आरोग्य व वेलनेस कंपनी, समुदाय आणि प्लॅटफॉर्म आहे, जे १९८० पासून उत्तम पौष्टिक उत्पादनांसह व्यक्तींच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे, तसेच त्यांच्या स्वावलंबी


