Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग गॅलॅक्सी एस२५ सीरिजला भारतात भरघोस प्रतिसाद; डिलिव्हरी घेण्यासाठी दुकानांत ग्राहकांच्या रांगा

सॅमसंग गॅलॅक्सी एस२५ सीरिजला भारतात भरघोस प्रतिसाद; डिलिव्हरी घेण्यासाठी दुकानांत ग्राहकांच्या रांगा

गुरूग्राम, भारत– ७ फेब्रुवारी २०२५: सॅमसंग या भारताच्या सर्वांत मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आज घोषणा केली की, आपल्या मालकीच्या गॅलॅक्सी एस२५ सीरिजला भारतात विक्रमी प्रतिसाद मिळाला असून ४३०,००० पेक्षा अधिक प्री ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. गॅलॅक्सी एस२५ सीरिजला आलेल्या प्री ऑर्डर्स भारतातील गॅलॅक्सी एस२४ सीरिजपेक्षा २० टक्के जास्त आहेत.

“गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा, गॅलॅक्सी एस२५+ आणि गॅलॅक्सी एस२५ स्मार्टफोन्स सॅमसंगच्या आतापर्यंतच्या सर्वात नैसर्गिक आणि संदर्भाशी निगडित मोबाइल अनुभवासोबत खऱ्या अर्थाने एआय जोडीदार म्हणून नवीन मानके स्थापित करत आहेत. तरूण टेक्नोसॅव्ही ग्राहकांमध्ये गॅलॅक्सी एस२५ मालिकेला मोठी मागणी दिसून येत असून ते गॅलॅक्सी एआय वापरात आघाडीवर आहेत. या वर्षी आम्ही आमचे नेटवर्क १७,००० आऊटलेट्समध्ये विस्तारित केले आहे. त्यामुळे लहान शहरांमधील मागणीही पूर्ण करण्यात आम्हाला मदत मिळाली आहे,” असे मत सॅमसंग इंडियाच्या एमएक्स विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन यांनी व्यक्त केले.

गॅलॅक्सी एस२५ सीरिजला मिळालेले यश ग्राहक पुढील काळात आपल्या रोजच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या सुलभ आणि अंदाजात्मक एआय उपाययोजनांचा जास्तीत-जास्त वापर करतील या सॅमसंगच्या विश्वासाला बळकटी देणारे आहे. भारतातील गॅलॅक्सी एस२५ ग्राहकांसाठी गुगलचे जेमिनी लाइव्ह सुरूवातीपासूनच हिंदीत उपलब्ध असेल आणि सॅमसंगसाठी भारताचे महत्त्व अधोरेखित करेल.

७ फेब्रुवारीपासून गॅलॅक्सी एस२५ सीरिज सर्व रिटेल स्टोअर्स तसेच Samsung.com व इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असेल. गॅलॅक्सी एस२५ अल्ट्रा टायटॅनियम सिल्व्हरब्लू, टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम व्हाइटसिल्व्हर आणि टायटॅनियम ग्रे रंगात उपलब्ध असेल. गॅलॅक्सी एस२५ आणि गॅलॅक्सी एस२५+ नेव्ही, सिल्व्हर शॅडो, आयसीब्लू आणि मिंट रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments