Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणेबाबत प्रेस नोट

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणेबाबत प्रेस नोट

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. आता निवृत्त कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षी महापालिकेच्या कार्यालयात येऊन हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) देण्याची आवश्यकता नाही. ज्या कर्मचा-यांनी गतवर्षी KYC केलेले आहे, अशा कर्मचा-यांना आता मोबाईल अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून घरबसल्या आपले जीवन प्रमाणपत्र तयार करून सादर करता येईल. या प्रक्रियेसाठी महापालिकेने ‘पीसीएमसी जीवन प्रमाण’ अॅपमध्ये नवीन अद्ययावतीकरण (update) केलेले आहे, ज्याद्वारे सेवानिवृत्त कर्मचारी १७ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घरुन जीवन प्रमाणपत्र कार्यालयास सादर करू शकतात.

महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक( वित्त) श्री. प्रविण जैन यांनी सांगितले की, या नव्या प्रणालीमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेची आणि श्रमाची बचत होईल. यापूर्वी सेवानिवृत्त कर्मचा-यांना दरवर्षी महापालिकेत हजर होऊन जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, परंतु आता ते सोयीस्करपणे अॅप आणि वेबसाइटच्या माध्यमातून सदर प्रमाणपत्र सादर करू शकतील.

या अॅपच्या माध्यमातून, सेवानिवृत्त कर्मचारी प्रत्येक वर्षी आपले जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करू शकतात. जीवन प्रमाणपत्रासाठी निवृत्त वेतन प्रदान आदेश (पीपीओ) क्रमांक आणि आधार कार्ड संबंधित कागदपत्रांच्या मदतीने प्रमाणपत्र तयार केले जाईल.

महत्त्वाची सूचना:
जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन तयार करण्यासाठी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. जर मोबाईल क्रमांक आधारशी जोडलेला नसेल, तर जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन तो लिंक करून घ्यावा.

या नवीन प्रक्रियेमुळे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कार्यालयात भेट देण्याची आवश्यकता नाही. त्यांना या प्रक्रियेद्वारे त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे विविध महत्त्वाची माहिती प्राप्त होईल, तसेच जीवन प्रमाणपत्र डिजीटल पद्धतीने जमा करता येईल.

मागील वर्षी बहुतेक सर्व सेवानिवृत्त कर्मचा-यांची हयातीचे दाखल्यासाठी KYC प्रक्रीया पुर्ण केली आहे, परंतु ज्या सेवानिवृत्त कर्मचा-यांची KYC प्रक्रिया पुर्ण झालेली नाही, त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लेखा विभागात संपर्क साधून KYC प्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी. मागील वर्षी KYC प्रक्रिया पुर्ण झालेल्या कर्मचा-यांनी पुन्हा KYC करण्याची आवश्यकता नाही.
महत्त्वाच्या तारखा:
• प्रारंभ: १७ फेब्रुवारी २०२५
• समाप्ती: ३१ मार्च २०२५

महापालिकेने दिलेल्या या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्ले स्टोअरमधून ‘पीसीएमसी जीवन प्रमाण’ अॅप डाऊनलोड करणे अथवा www.pcmcpensioner.in या वेबसाईटवर लॉगिन करणे आवश्यक राहील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments