पुणे, 11 फेब्रुवारी, 2025 भारत फोर्ज लिमिटेडची (NYSE: BFL) उपकंपनी कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड (KSSL) आणि L3Harris टेक्नोलॉजीज (NYSE: LHX) यांनी भारतातील प्रगत संरक्षण आणि सुरक्षा साधनांना पाठबळ देण्यासाठी व्यापक सहकार्य करण्याकरता सामंजस्य करारावर (MOU) स्वाक्षरी केली आहे.
दोन वर्षांच्या या कराराअंतर्गत, दोन्ही कंपन्या Command, Control, Communications, Intelligence, Surveillance आणि Reconnaissance (C4ISR) (कमांड, नियंत्रण, संज्ञापन, गुप्तवार्ता, देखरेख आणि पाहणी/शोध मोहीम) तंत्रज्ञानासाठी परस्पर संमतीने ठरवलेल्या संधींसाठी एकत्रितपणे उपायसुविधा देण्यासाठी कार्य करतील. हा सामंजस्य करार L3Harris ला भारतात टॅक्टिकल कम्युनिकेशन नेटवर्क विकसीत करण्यासाठी पाठबळ म्हणून मजबूत स्थानिक भागीदार पुरवतो. त्यायोगे त्यांचा यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स आणि त्यांचे सहयोगी यांच्याकडे आधीपासूनच १ दशलक्षाहून अधिक रेडिओंच्या जोडणीतून जागतिक ठसा आणखी विस्तारेल.
“हा सामंजस्य करार भविष्यातील भागीदारी आणि संधींसाठी एक मजबूत पाया तयार करत असून L3Harris आणि KSSL यांची एकत्रित ताकद भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला बळकट करण्यासाठी योगदान देऊ शकते,” असे L3Harris चे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डेव जॉन्सन यांनी सांगितले. “आम्ही या भागीदारीला पुढे नेण्यास आणि भारतीय सैन्यासाठी प्रगत टॅक्टिकल रेडिओ आणि उपकरणांची जलद वितरण क्षमता वाढवण्यास उत्सुक आहोत,” असेही ते म्हणाले.
अमेरिका-भारत संरक्षण औद्योगिक सहकार्य दोन्ही पक्षांना प्रगत संरक्षण तंत्रज्ञान, क्षमता आणि साधनांच्या पाठबळासाठी प्रोत्साहित करते. हा सामंजस्य करार L3Harris आणि KSSL या दोघांनाही फायदा होईल अशा नाविन्यपूर्णतेच्या चौकटीसह संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याला चालना देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
“हा सहयोग नवीन धोरणात्मक क्षमता खुल्या करेल आणि भारतीय सैन्यासाठी अत्याधुनिक संरक्षण उत्पादने जलदगतीने वितरीत करण्याच्या नव्या संधी निर्माण करेल,” असे KSSL चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश तुंगार म्हणाले. “विकसित होत असलेली लष्करी धोरणे आणि युद्धाच्या नव्या संकल्पनांशी सुसंगत राहून, KSSL आणि L3Harris यांच्यातील हे सहकार्य भविष्यातील धोरणात्मक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने आहे. संयुक्त आणि एकात्मिक ISR क्षमता वाढवणे यांचाही यात समावेश आहे.”
भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करत असताना जागतिक दायित्वे पूर्ण करण्यासाठी हे सहकार्य भारताबाहेर मजबूत आणि लवचिक पुरवठा साखळी निर्माण करण्यावर देखील भर देईल.
L3Harris भारतात 21 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून नवी दिल्ली आणि बंगळुरू येथे त्यांची सुविधाकेंद्रे आहेत. भारतीय सैन्यास प्रगत टॅक्टिकल रेडिओ आणि मानवी नियंत्रित हवाई इलेक्ट्रो-ऑप्टिक/इन्फ्रारेड प्रणाली पुरवण्याव्यतिरिक्त, कंपनी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया सोबत भागीदारीत भारतातील सर्व विमानतळांसाठी भविष्यकालीन दूरसंचार पायाभूत सुविधा (Futuristic Telecommunications Infrastructure) उपलब्ध करून देते.


