Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedकोका-कोलाकडून चौथी तिमाही आणि संपूर्ण वर्ष २०२४ निकालांची घोषणा

कोका-कोलाकडून चौथी तिमाही आणि संपूर्ण वर्ष २०२४ निकालांची घोषणा

नवी दिल्‍ली, फेब्रुवारी १२, २०२५: कोका-कोला कंपनीने आपल्‍या चौथी तिमाही व संपूर्ण वर्ष २०२४ निकालांमध्‍ये विकास संधी असलेल्‍या उद्योगामधील सातत्‍यपूर्ण गती निदर्शनास आणली. ”आमचे ऑल-वेदर धोरण कार्यरत आहे आणि आम्‍ही डायनॅमिक बाह्य वातावरणांच्‍या माध्‍यमातून नेतृत्‍व करण्‍याची आमची क्षमता दाखवत आहोत,” असे कोका-कोला कंपनीचे अध्‍यक्ष व मुख्‍य कार्यकारी अधिकारी जेम्‍स क्विन्‍सी म्‍हणाले. ते पुढे म्‍हणाले, ”आमची जागतिक स्‍तरावरील पोहोच, तसेच स्‍थानिक बाजारपेठेतील कौशल्‍य आणि आमच्‍या कर्मचाऱ्यांची अविरत समर्पितता व आमची सिस्‍टम आम्‍हाला आगामी व्‍यापक संधींचा फायदा घेण्‍यास अद्वितीयरित्‍या सज्ज करतात.”

भारतातील कामगिरीची वैशिष्‍ट्ये:

· जानेवारी, फेब्रुवारी व डिसेंबर २०२४ मध्‍ये कंपनीने भारतातील विशिष्‍ट प्रदेशांमध्‍ये आपल्‍या बॉटलिंग कार्यसंचालनांना पुन्‍हा सुरूवात केली.

· भारतातील विशिष्‍ट प्रदेशांमध्‍ये आमच्‍या बॉटलिंग कार्यसंचालनांना पुन्‍हा सुरूवात झाल्‍याने ३१ डिसेंबर २०२४ रोजी समाप्‍त झालेली तिमाही आणि वर्षादरम्‍यान कंपनीने अनुक्रमे १३ दशलक्ष डॉलर्स व ३०३ दशलक्ष डॉलर्स निव्‍वळ नफ्याची नोंद केली.

· भारतातील विशिष्‍ट प्रदेशांमध्‍ये आमच्‍या बॉटलिंग कार्यसंचालनांना पुन्‍हा सुरूवात झाल्‍याने ३१ डिसेंबर २०२४ रोजी समाप्‍त झालेल्‍या वर्षादरम्‍यान कंपनीला ७ दशलक्ष डॉलर्स व्‍यवहार खर्च आला.

· संपूर्ण वर्षासाठी, युनिट केस आकारमान १ टक्‍क्‍याने वाढले, ज्‍यामध्‍ये ब्राझील, भारत आणि मेक्सिको अग्रस्‍थानी होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments