पुणे : पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या **Aaryans World Tech & Innovation Summit (एडबल्यूटीआयएस)**च्या तारखेत बदल करण्यात आला असून, ही परिषद आता ८, ९ आणि १० ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यापूर्वी ही परिषद १८, १९ आणि २० सप्टेंबर २०२६ रोजी होणार होती.
‘एडबल्यूटीआयएस’मध्ये भारत सरकारचे केंद्रीय मंत्री, विविध देशांच्या दूतावासांतील वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील मंत्री तसेच देशातील प्रमुख शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. संबंधित मान्यवरांची उपलब्धता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार परिषदेदरम्यान आर्यन्स समूहासोबत होणाऱ्या विविध सरकारी करारांची तसेच महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सर्व मान्यवरांचा सहभाग सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने परिषदेच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, ‘एडबल्यूटीआयएस’मध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण घडामोडी तसेच विविध क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी लवकरच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेत परिषदेसंदर्भातील सविस्तर माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणार आहे.
परिषदेच्या तिन्ही दिवशी विविध विषयांवरील तज्ज्ञांची व्याख्याने, परिसंवाद आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, संशोधक, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, नवउद्योजक आणि तंत्रज्ञानप्रेमींसाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
मागील घोषणेनुसार १८ ते २० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या परिषदेसाठी आतापर्यंत ७२२ जणांनी नोंदणी केली आहे. या सर्व नोंदणीकर्त्यांनी परिषदेच्या बदललेल्या तारखांची नोंद घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नवीन तारीख : ८, ९ आणि १० ऑक्टोबर २०२६
स्थळ : पुणे
अधिक माहितीसाठी : संजय गायकवाड – ९६०४७६४२२८


