पुणे,१३ फेब्रुवारी २०२५: होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (एचएमएसआय)ने आज प्रवाशांच्या राइडिंग अनुभवाला अधिक उत्साहित करण्यासाठी नवीन रंग आणि प्रगत वैशिष्ट्यांसह अपडेट करण्यात आलेली ओबीडी२बी-प्रमाणित शाइन १२५ च्या लाँचची घोषणा केली. २०२५ होंडा शाइन १२५ ची किंमत ८४,४९३ रूपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते.
ओबीडी२बी शाइन १२५ लाँच करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. त्सुत्सुमु ओटनी म्हणाले, “आम्हाला ओबीडी२बी-प्रमाणित शाइन १२५ च्या लाँचची घोषणा करताना आनंद होत आहे. २००६ मध्ये लाँच झाल्यापासून शाइन तिच्या श्रेणीमधील सर्वात लोकप्रिय मोटरसायकल राहिली आहे, जेथे लाखो भारतीय ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. वर्षानुवर्षे या मोटरसायकलने कार्यक्षमता, आरामदायीपणा आणि विश्वसनीयतेसाठी सतत नवीन मापदंड स्थापित केले आहेत. आम्हाला अपग्रेडेड वैशिष्ट्ये असलेली नवीन शाइन १२५ लाँच करण्याचा आनंद होत आहे. ही वैशिष्ट्ये मोटरसायकलची व्यावहारिकता आणि अपीलमध्ये वाढ करतात, तसेच आजच्या राइडर्सच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करतात.”
या घोषणेबाबत मत व्यक्त करत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री व विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथूर म्हणाले, “आम्हाला नवीन शाइन १२५ लाँच करण्याचा आनंद होत आहे. ही मोटरसायकल १२५ सीसी प्रवासी विभागामध्ये नवीन मापदंड स्थापित करत आहे. नवीन ओबीडी२बी प्रमाणित इंजिन आणि फुली डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, इडलिंग स्टॉप सिस्टम व यूएसबी सी-टाइप चार्जिंग पॉइण्ट अशा नवीन वैशिष्ट्यांसह नवीन शाइन १२५ भारतातील ग्राहकांसाठी सोयीसुविधा आणि व्यावहारिकतेमध्ये वाढ करते. आम्हाला विश्वास आहे की, नये इंडिया की अमेझिंग शाइन निश्चितच ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल आणि बाजारपेठेतील मोटरसायकलचा वारसा अधिक दृढ करेल.”
नवीन शाइन १२५: वैविध्यपूर्ण डिझाइन आणि हाय-टेक वैशिष्ट्ये
शाइन १२५ च्या डिझाइनमधील आकर्षकता व स्टायलिश अपील कायम ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये नवीन आकर्षक लुकसाठी पूरक नवीन कलर स्किम आहे. ही मोटरसायकल सहा रंगांच्या पर्यायांमध्ये येते – पर्ल इग्निअस ब्लॅक, जेनी ग्रे मेटलिक, मॅटे अॅक्सिस ग्रे मेटालिक, रिबेल रेड मेटलिक, डिसेंट ब्ल्यू मेटलिक आणि पर्ल सिरेन ब्ल्यू. तसेच या मोटरसायकलमध्ये आता ९० मिमी व्यापक रिअर टायर आहे, जे व्हिज्युअल अपील आणि रस्त्यावरील स्थिरतेमध्ये वाढ करते.
नवीन शाइन १२५ मध्ये फुली डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आहे, ज्यामधून रिअल-टाइम मायलेज, रेंज (डिस्टन्स टू एम्प्टी), सर्विस ड्यू इंडीकेटर, गिअर पोझिशन इंडिकेटर आणि इको इंडिकेटर अशी अनेक माहिती मिळते. तसेच, या मोटरसायकलमध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पॉइण्ट आहे, ज्यामधून राइडर्सना राइड करताना त्यांचे डिवाईसेस चार्ज करण्याची सुविधा मिळते.
शाइन १२५ ची खासियत आहे १२३.९ सीसी, सिंगल-सिलिंडर पीजीएम-एफआय इंजिन, जे आता ओबीडी२बी प्रमाणित आहे आणि ७५०० आरपीएममध्ये ७.९३ केडब्ल्यू शक्ती व ६००० आरपीएममध्ये ११ एनएम सर्वोच्च टॉर्क देते. तसेच, या मोटरसायकलमध्ये इडलिंग स्टॉप सिस्टम देखील आहे, जी होंडाच्या शाश्वतता तत्त्वाशी बांधील राहत इंधन कार्यक्षमता वाढवते.
नवीन शाइन १२५: किंमत आणि उपलब्धता
नवीन २०२५ होंडा शाइन १२५ ची किंमत ८४,४९३ रूपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) सुरू होते. ही मोटरसायकल ड्रम व डिस्क या दोन व्हेरिएण्ट्समध्ये येते आणि आता भारतभरातील एचएमएसआय डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.
मॉडेल
व्हेरिएण्ट
किंमत (एक्स-शोरूम दिल्ली)
शाइन १२५
ड्रम
८४,४९३ रूपये
डिस्क
८९,२४५ रूपये


