Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedभगवा झेंडा हाती घेत बालगोपाळ 'राम रंंगी रगले' - शिक्षण प्रसारक मंडळी,...

भगवा झेंडा हाती घेत बालगोपाळ ‘राम रंंगी रगले’ – शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे व नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने ‘भजनी राम हृदयी राम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : नाटकातून सादर केलेल्या रामायणातील कथा… वानररुपी चिमुकल्यांनी नृत्य प्रस्तुती तून साकारलेला रामसेतू… प्रभू श्रीरामांच्या गीत शृंखलेतून राममय झालेले वातावरण… नृत्य, संगीत आणि नाटकातून विविध कलागुणांचे सादरीकरण करीत बालचमूंनी हातात भगवा झेंडा घेत राम नामाचा जयघोष केला. ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा…’ असे म्हणत बालगोपाळांनी जल्लोषात प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापनेचे स्वागत केले.

 

शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे आणि नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशालेत ‘भजनी राम हृदयी राम’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नियामक मंडळ अध्यक्ष ॲड. सोहनलाल जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, नू. म. वि. प्रशाला शाला समिती अध्यक्ष पराग ठाकूर, नियामक मंडळ सदस्य सतीश पवार, ॲड. मिहिर प्रभुदेसाई, राजेंद्र पटवर्धन, सुधीर काळकर, शि. प्र. मंडळीच्या चिटणीस डॉ. राधिका इनामदार, आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर ग. दि. माडगूळकर यांच्या प्रतिभावंत शब्द शैलीतून साकारलेल्या गीतरामायणातून विद्यार्थ्यांनी श्रीरामांचा जीवन प्रवास उलगडला. सेतू बांधा रे सागरी… या गीतामधून बालरूपी वानरसेनेनी बांधलेला रामसेतू आणि जय श्रीरामाच्या जय घोषाने उपस्थित पुणेकर रामरंगी रंगून गेले.

 

ठुमक चलत रामचंद्र… राम का गुणगान करिये… या शास्त्रीय संगीतातून सादर केलेल्या रचनांनी उपस्थित भारावून गेले. तर, भारत का बच्चा बच्चा, जय श्रीराम बोलेगा… एक ही नारा, एक ही नाम जय श्रीराम जय श्रीराम… अशा गीतांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या माध्यमातून उपस्थितांनी बालगोपाळांचे कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments