पुणे दि. 18 : शिव जयंती निमित्त ‘पिंक ई-रिक्षा’ योजनेअंतर्गत ‘पिंक-ई रिक्षा’ मंजूर झालेल्या लाभार्थी महिलांनी 19 फेब्रुवारी रोजी बुकिंग केल्यास रक्कम 12 हजार 300 रुपये माफ करण्यात आली आहे, या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनीषा बिरारीस यांनी केले आहे.
या संधीचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी नजीकच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, बालविकास प्रकल्प अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय, पुणे महानगरपालिका हद्दीतील शॉप न.१ ऋतुजा अपार्टमेंट माऊली गार्डन जवळ बाणेर रोड, बाणेर (संपर्क क्र.- 9960355888) व पिंपरी महानगरपालिका हद्दीतील लाभार्थ्यांनी जय मातादी ग्रीन (कायनेटिक ग्रीन हॉटेल डबल ट्री हिल्टन समोर, मोहन नगर कमान जवळ, नेशनल सायकल शॉप, टेल्को रोड चिंचवड (संपर्क क्रं 8554052052/09607915454) येथे संपर्क साधावा, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यलयाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
000


