Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedTReDS प्‍लॅटफॉर्म M1xchange चे झपाट्याने विकासावर लक्ष

TReDS प्‍लॅटफॉर्म M1xchange चे झपाट्याने विकासावर लक्ष

पुणे, फेब्रुवारी १८, २०२५: एमएसएमई मंत्रालयाने दिनांक ७ नोव्‍हेंबर २०२४ चा संदर्भच्‍या माध्‍यमातून २५० कोटी रूपये किंवा त्‍यापेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्‍या कंपन्‍यांसाठी ट्रेड रिसीव्‍हेबल्‍स डिस्‍काऊंटिंग सिस्‍टमवर अनिवार्य नोंदणीची अंतिम मुदत म्‍हणून ‘३१ मार्च २०२५’ तारखेची घोषणा केली आहे. यासह M1xchange हा भारतातील आघाडीचा RBI-परवानाकृत TReDS प्‍लॅटफॉर्म पुण्‍यामधून प्रबळ विकासाची अपेक्षा करत आहे. महाराष्‍ट्रातील महत्त्वपूर्ण औद्योगिक व आर्थिक हब असलेल्या पुणे शहरामध्‍ये अनेक सक्रिय कंपन्‍या आहेत, ज्‍या राज्‍याच्‍या आर्थिक विकासामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

महाराष्ट्रातील आर्थिक विकासात पुणे हे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे योगदान देणारे राज्य आहे, या प्रांताच्या विकासाला चालना देणाऱ्या ४६,००० हून अधिक नोंदणीकृत कंपन्या आहेत. पुणे शहर भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल हब म्हणून ओळखले जाते, जेथे ३६८ हून अधिक ऑटोमोबाईल कंपन्या, १,१०० ऑटो कंपोनंट उत्पादक, ४,००० उत्पादन व सहाय्यक युनिट्स आणि ३२२ आयटी कंपन्या आहेत. पुण्यातील वैविध्यपूर्ण औद्योगिक परिसंस्था ऑटो स्पेअर पार्ट्स, हार्डवेअर, फार्मास्युटिकल्स, स्टील, संरक्षण उत्पादन आणि लॉजिस्टिक्स सेवा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये पसरलेली आहे, जी देशांतर्गत आणि आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांना सेवा देते.

M1xchange सुधारित रोखप्रवाह व्‍यवस्‍थापन आणि विक्रेत्‍यांसोबत प्रबळ संबंधांच्‍या माध्‍यमातून या संस्‍थांच्‍या विकासाला पाठिंबा देण्‍यास उत्तमरित्‍या सुसज्‍ज आहे, जेथे पुरवठादारांना त्‍वरित पेमेंट्स आणि कमी निधी खर्चांची सुविधा देत आहे.

M1xchange चे प्रमोटर व संचालक संदीप मोहिंद्रू म्‍हणाले, “वार्षिक उलाढाल २५० कोटी रूपयांपेक्षा जास्‍त असलेल्‍या कंपन्‍यांनी TReDS वर नोंदणी करण्‍याचा सरकारचा निर्णय, तसेच अनिवार्य थ्रेशहोल्‍ड कमी केल्‍यामुळे प्‍लॅटफॉर्मवर ७,००० कंपन्‍या आणि २२ सेंट्रल पब्लिक सेक्‍टर एंटरप्राइजेजची भर होईल. यामुळे अधिक प्रमाणात अवलंबनाला गती मिळेल आणि आवश्‍यक खेळते भांडवल सोल्‍यूशन्‍स उत्तमरित्‍या उपलब्‍ध करून देत क्रेडिट तफावत दूर करण्‍यास मदत होईल. M1xchange विनासायास सांपर्श्विक-मुक्‍त फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देत कॉर्पारेट्स आणि त्‍यांच्‍या एमएसएमई विक्रेत्‍यांना सक्षम करण्‍याप्रती कटिबद्ध आहे. हे सोल्‍यूशन्‍स खेळते भांडवल प्रवाह प्रबळ करतात आणि शाश्‍वत विकासाला चालना देतात.”

ते पुढे म्‍हणाले, “कॉर्पोरेट्स विक्रेत्‍यांसोबतचे संबंध प्रबळ करण्‍यासाठी एण्‍ड-टू-एण्‍ड डिजिटल इन्‍वॉईस डिस्‍काऊंटिंग प्‍लॅटफॉर्मच्‍या फायदा घेत त्‍यांच्‍या पुरवठा साखळींना डिजिटाइज करू शकतात, ज्‍यामधून वेळेवर पेमेंट्सच्‍या माध्‍यमातून अनुपालनाची खात्री मिळेल आणि खरेदी खर्च कमी होईल.”

संपूर्ण भारतात उपस्थिती असण्‍यासह M1xchange ने आतापर्यंत ६५ हून अधिक बँका आणि NBFCs, २,००० हून अधिक कॉर्पोरेट्स आणि ४५,००० हून अधिक एमएसएमईंसह सहयोग केला आहे. TReDS प्‍लॅटफॉर्मने १.५ लाख कोटी रूपयांहून अधिक चलनांवर सूट मिळण्‍याची सेवा उपलब्‍ध करून दिली आहे. तसेच, M1xchange रेग्‍युलेटरी सँडबॉक्‍स (आरएस) अंतर्गत आरबीआयच्‍या थर्ड कोहर्टमध्‍ये चाचणी करण्‍यात आलेल्‍या त्‍यांच्‍या नाविन्‍यपूर्ण स्‍मॉल-टू-स्‍मॉल फायनान्सिंग उपक्रमासह TReDS ची व्‍याप्‍ती वाढवणारा पहिला प्‍लॅटफॉर्म आहे. या उपक्रमाने द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या एमएसएमईंना यशस्‍वीपणे औपचारिक क्रेडिट सिस्‍टममध्‍ये आणले आहे, तसेच त्‍यांना स्‍पर्धात्‍मक दरांमध्‍ये लवकर पेमेंट्सचा फायदा मिळवण्‍यास सक्षम केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments