सुगंध, चहा, दागिने, घरगुती वस्त्रोद्योग आणि सजावटीच्या वस्तूंपासून भारतीय ब्रँड्स आणि उत्पादक वॉलमार्ट मार्केटप्लेस, वॉलमार्ट स्टोअर्स आणि सॅम्स क्लबच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत.
नवी दिल्ली, भारत आणि बेन्टोनविल, आर्क., 26 नोव्हेंबर २०२६— अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडातील ग्राहक सुट्टीच्या सीझनची तयारी करत असताना भारतीय ब्रँड्स आणि उत्पादक वॉलमार्टच्या भेटवस्तू, मनोरंजन आणि दैनंदिन उत्सवांसाठीच्या उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये योगदान देत आहेत. सुगंधी द्रव्ये, चहा आणि दागिन्यांपासून ते घरगुती वस्त्रोद्योग, चामड्याच्या वस्तू आणि सजावटीपर्यंत ही उत्पादने भारताच्या ग्राहक ब्रँड्स, कारागिरी आणि उत्पादन क्षमतेची विविधता दर्शवतात.
ही उत्पादने वॉलमार्टच्या विविध माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतात. त्यात Walmart.com वॉलमार्ट स्टोअर्स आणि सॅम्स क्लब यांचा समावेश आहे.
“वॉलमार्टच्या जागतिक पुरवठा साखळीसाठी भारत प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि नावीन्यपूर्णतेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. गृहोपयोगी साहित्य आणि कपड्यांपासून ते खाद्यपदार्थ, आरोग्य आणि किरकोळ वस्तूंपर्यंतच्या सर्व श्रेणींमध्ये आम्हाला ही ताकद दिसून येते,” असे वॉलमार्ट आणि सॅम्स क्लबचे जनरल मर्चंडाईज आणि फॅशन सोर्सिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अवनीश गुप्ता म्हणाले. “सुट्ट्यांच्या हंगामात आम्हाला ग्राहकांच्या अपेक्षेनुसार गुणवत्ता, मूल्य आणि उत्पादनांची वैविध्यपूर्णता देण्यात मदत करतात, तसेच भारतातील भागीदारांसोबतचे आमचे दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करतात.”
भारतीय ब्रँड्स सणासुदीच्या भेटवस्तूंसाठी नवीन पर्याय सादर करत आहेत
वॉलमार्ट मार्केटप्लेसच्या माध्यमातून (Walmart.com) विक्री करणारे भारतीय ब्रँड्स भेटवस्तू आणि जीवनशैलीच्या विविध श्रेणींमध्ये आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे खरेदीदारांना भारतातील व्यवसायांची उत्पादने शोधण्याचे अतिरिक्त मार्ग मिळत आहेत.
सुगंध आणि वैयक्तिक काळजी (पर्सनल केअर) श्रेणींमध्ये भेटवस्तू शोधणाऱ्या ग्राहकांसाठी, नवी दिल्लीतील बेलाविटा लक्झरी पुरुष आणि महिलांसाठी सुगंधित उत्पादने सादर करते, तर बंगळूरुमधील मॅजेस्टिक प्युअर आणि बोटॅनिक हार्थ इसेन्शियल ऑइल्स, केसांची निगा आणि शरीराची निगा राखणारी उत्पादने देतात. या संग्रहांमध्ये सणासुदीच्या काळात स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि दैनंदिन दिनचर्यांसाठी विविध पर्यायांचा समावेश आहे.
नवी दिल्लीतील ‘वहदम’ हा चहाचा ब्रँड टी बॅग्ज आणि सुट्ट्या चहापत्तीसह विविध प्रकारचे चहा, तसेच सणासुदीचे गिफ्ट सेट्स आणि हंगामी चहाचे प्रकार सादर करतो. सुट्ट्यांच्या काळात भेटवस्तू शोधणाऱ्या किंवा नवीन चवींचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना त्यांची उत्पादने विविध पर्याय उपलब्ध करून देतात.
दागिने विशेष प्रसंग साजरे करण्याचा आणखी एक मार्ग देतात. जयपूरस्थित ‘रोसेक ज्वेल्स’ हा ब्रँड प्रयोगशाळेत तयार केलेल्या हिऱ्यांच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या अंगठ्या, वधूसाठीचे सेट आणि भेटवस्तूंचे सेट सादर करतो. आग्रा येथील ‘लेकॅला’ ९२५ स्टर्लिंग सिल्व्हरच्या इअररिंग्स आणतो. त्यामुळे Walmart.com कडून ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या दागिन्यांच्या श्रेणीत भर पडते. नवी दिल्लीतील ‘सोलिटेअर ज्वेल्स’ हिऱ्यांच्या लग्नाच्या अंगठ्यांची श्रेणी आणत असून त्यामुळे ग्राहकांना विचारपूर्वक भेटवस्तूंचे सेट तयार करता येतात.
स्टाइल आणि वापर या दोन्ही गोष्टी एकत्र आणणाऱ्या भेटवस्तूंसाठी कोमल्स पॅशन लेदर हा उदयपूरचा एक्सेसरीज ब्रँड क्रॉसबॉडी बॅग्स, लॅपटॉप बॅग्स, मेसेंजर बॅग्स आणि डफल बॅग्स आणतो.
एकूणात हे भारतीय ब्रँड्स विविध प्रकारच्या श्रेणी आणतात. त्यातून ग्राहकांना Walmart.com च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचणे शक्य होते.
“भारतीय विक्रेते उत्पादनांमधील वैविध्यपूर्णता, कलाकुसर आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंतींना प्रतिसाद देण्याची क्षमता यांचे एक आकर्षक मिश्रण सादर करतात. वॉलमार्ट मार्केटप्लेस त्यांना त्यांचे ब्रँड्स आणि कौशल्य मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास सक्षम करते”, असे वॉलमार्ट मार्केटप्लेसचे आंतरसीमा व्यापार विभागाचे भारत प्रमुख आशिम मॅथ्यू म्हणाले. “सुट्ट्यांच्या हंगामात, ही पोहोच त्यांना भेटवस्तू आणि जीवनशैलीच्या गरजांच्या विस्तृत श्रेणीतील खरेदीदारांशी जोडले जाण्यास मदत करते.”
भारतीय उत्पादक सणासुदीच्या काळात घरे सजवून उत्सव साजरे करण्यास मदत करतात.
दिवाळी, थँक्सगिव्हिंग आणि ख्रिसमसचा सणांचा हंगाम हा पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी किंवा सणाचा उत्साह वाढवण्यासाठी राहण्याच्या जागांना नवीन रूप देण्याची एक संधीदेखील आहे. भारतीय उत्पादक वॉलमार्ट आणि सॅम्स क्लबमधील दीर्घकालीन सोर्सिंग संबंध आणि प्रायव्हेट-लेबल कार्यक्रमांद्वारे वॉलमार्टच्या उत्पादनांच्या श्रेणीत योगदान देतात.
मुरादाबादमधील हस्तकला साहित्याचे पुरवठादार श्री कृष्णा इम्पेक्स सजावटीच्या धातूच्या वस्तू आणि गृहसजावटीच्या वस्तू विकते. त्यात वॉलमार्टच्या हंगामी श्रेणीसाठी विकसित केलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. त्यांची उत्पादने भारतातील गृह आणि हस्तकला क्षेत्रातील कौशल्ये आणि उत्पादन कौशल्य दर्शवतात आणि समकालीन अमेरिकन ग्राहकांच्या गरजांसाठी या क्षेत्राची प्रासंगिकता सिद्ध करतात.
भारतीय घरगुती वस्त्रोद्योग उत्पादकही वॉलमार्टच्या उत्पादनांच्या श्रेणीत प्रतिनिधित्व करतात. अनुक्रमे गुजरात, बुधनी आणि कोल्हापूर येथे स्थित वेल्सपन, ट्रायडेंट आणि इंडो काउंट हे ब्रँड्स वॉलमार्ट, सॅम्स क्लब आणि Walmart.com वर प्रायव्हेट-लेबल कार्यक्रमांद्वारे बेडशीट आणि टॉवेलसह विविध उत्पादने पुरवतात. ही उत्पादने दैनंदिन घरगुती गरजा आणि सुट्टीच्या हंगामातील मागणी पूर्ण करणाऱ्या श्रेणींमध्ये भारतीय वस्त्र उत्पादन कौशल्य आणतात.
वॉलमार्ट मार्केटप्लेसवर मुंबईचे कासा प्लॅटिनो, इरोडचे थ्रेड स्प्रेड, नोएडाचे ॲडॉर्नटेक्स एक्सपोर्ट आणि करूरचे युनिक इम्पेक्स असे विक्रेते बेडशीट, बाथ टॉवेल, उशा, टेबल लिनन आणि किचन टेक्सटाईल अशी घरगुती उत्पादने देतात. ही व्यावहारिक, बहुपयोगी उत्पादने सणासुदीच्या काळात कुटुंबे एकमेकांना भेटायला जातात तेव्हा भेटवस्तू म्हणूनही उपयोगी पडू शकतात.
सणासुदीचा काळ कुटुंबे आणि समाजाला एकत्र आणत असल्यामुळे या व्यवसायांद्वारे सादर केली जाणारी उत्पादने ग्राहकांच्या सण साजरे करण्याच्या आणि भेटवस्तू देण्याच्या विविध पद्धती दर्शवतात. त्यात सुगंधी द्रव्ये आणि दागिन्यांपासून ते घरासाठी आवश्यक वस्तू, सजावट आणि खाद्यपदार्थांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे.


