Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्‍या ‘आर्ट फॉर होप - सीझन ४'ने भारतभराील ५०...

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्‍या ‘आर्ट फॉर होप – सीझन ४’ने भारतभराील ५० प्रतिभावान आर्टिस्‍ट्सना सक्षम केले; सामाजिक परिवर्तनासाठी आर्टचे साजरीकरण

नवी दिल्‍ली । फेब्रुवारी 28, २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्‍या सीएसआर शाखेने आपला प्रमुख आर्ट उपक्रम ‘आर्ट फॉर होप’चा चौथा सीझन लाँच केला. हा तीन-दिवसीय कला व संस्‍कृती महोत्‍सव भारतातील १५ राज्‍यांमधील ५० अनुदान-प्राप्‍त आर्टिस्‍ट्स आणि कला संग्रहांना एकूण ६० लाख रूपयांच्‍या अनुदानासह प्रशंसित करतो. कलात्‍मक अभिव्‍यक्‍तींना प्रशंसित करत ‘आर्ट फॉर होप’ उपक्रमामधून भारताच्‍या संपन्‍न सांस्‍कृतिक वारसाचे जतन करणाऱ्या आणि सर्जनशीलता सामाजिक प्रगतीला चालना देणारे भविष्‍य घडवणाऱ्या कलात्‍मक टॅलेंटना निपुण करण्‍याप्रती एचएमआयएफची कटिबद्धता दिसून येते. अनुदानप्राप्‍तकर्त्‍यांमध्‍ये ४० वैयक्तिक आटिस्‍ट्ससह विकलांग व्‍यक्‍तींसाठी ५ अनुदान आणि १० कला संग्रहांचा समावेश आहे.

नवी दिल्‍लीमधील ट्रॅव्‍हनकोअर पॅलेस येथे भारत सरकारचे केंद्रीय सांस्‍कृतिक व पर्यटन पंत्री श्री. गजेंद्र सिंग शेखावत यांच्‍या हस्‍ते ‘आर्ट फॉर होप’च्‍या चौथ्‍या सीझनचे उद्घाटन करण्‍यात आले. याप्रसंगी एचएमआयएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री. उन्सू किम, एचएमआयएफचे विश्वस्त श्री. गोपालकृष्णन सीएस, एचएमआयएलचे कॉर्पोरेट अफेयर्सचे फंक्शन हेड श्री. जेओंगिक ली आणि एचएमआयएलचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड सोशलचे व्हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद उपस्थित होते.

‘आर्ट फॉर होप’च्‍या महत्त्वाबाबत मत व्‍यक्‍त करत भारत सरकारचे केंद्रीय सांस्‍कृतिक व पर्यटन पंत्री श्री. गजेंद्र सिंग शेखावत म्‍हणाले, “आर्टमध्ये संस्कृती आणि समुदायांना प्रेरणा देण्याची, शिक्षित करण्याची आणि एकत्र आणण्याची क्षमता आहे. ‘आर्ट फॉर होप’ हा ह्युंदाई मोटर इंडिया फाउंडेशनचा प्रशंसनीय उपक्रम आहे, जो आर्टिस्‍ट्सना पाठिंबा देण्‍यासोबत भारताच्या विविध सांस्कृतिक अभिव्यक्‍तींचे जतन करतो आणि त्‍यांना चालना देखील देतो. उदयोन्मुख आणि कमी प्रतिनिधीत्व असलेल्या आर्टिस्ट्सना सक्षम बनवून हा उपक्रम पारंपारिक आणि समकालीन कला सतत भरभराटीला येत राहतील, याची खात्री घेतो. कलेचे संवर्धन करण्याप्रती ह्युंदाई मोटर इंडियाच्‍या समर्पितेमधून राष्‍ट्र-निर्मितीप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते.”

‘आर्ट फॉर होप – सीझन ४’च्‍या उद्घाटन समारोहाप्रसंगी मत व्‍यक्‍त करत एचएमआयएलचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. उन्‍सू किम म्‍हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्‍ये आमचा ‘प्रोग्रेस फॉर ह्युमॅनिटी’ला चालना देण्‍याचा दृष्टिकोन आम्‍ही करणाऱ्या प्रत्‍येक प्रयत्‍नामधून दिसून येतो. आम्‍ही कार्सचे उत्‍पादन करण्‍यासोबत भारतासाठी उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवण्‍याप्रती देखील कटिबद्ध आहोत. आर्ट फॉर होप उपकमामधून विविध परंपरा आणि व्‍यक्‍तींची असाधारण क्षमता असलेल्‍या भारताप्रती आमची दृढ कटिबद्धता दिसून येते. या उपक्रमाच्‍या सीझन ४ सह आम्‍ही सर्जनशीलतेला निपुण करणे, वैविध्‍यता व सर्वसमावेशकतेला साजरे करणे याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. आमचे यश आम्‍ही सेवा देणाऱ्या समुदायांच्‍या प्रगतीवर अवलंबून आहे आणि आर्ट फॉर होप सारखे उपक्रम या दिशेने अत्‍यंत महत्त्वाचे आहेत.”

आर्ट फॉर होप – सीझन ४ ची ठळक वैशिष्‍ट्ये:

§ मथुरा येथील सांझी पेपरकट कला, गुजरातमधील लिप्पन कला आणि आंध्र प्रदेशातील कलमकारी कला यांसारख्या पारंपारिक प्रकारांवर कला कार्यशाळा.

§ नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील कलाकारांचे नाट्यप्रदर्शन, तसेच लावणी, ओट्टन थुल्लाल, थेय्यम व यक्षगान यांचा समावेश असलेले नृत्य आणि माहितीपट प्रदर्शन.

§ विकलांग असलेल्या प्रतिभावान आर्टिस्‍ट्सच्‍या बँडकडून विशेष संगीत सादरीकरण.

§ आर्टिस्‍टन फेस्‍ट: १५ पर्यावरणपूरक कला व हस्तकला स्वयंसेवी संस्था आणि लघु उद्योगांना पाठिंबा देणारे स्टॉल.

§ ‘आर्ट फ्रॉम वेस्‍ट’ व ‘इंडसिव्हिटी इन डिझाइन अँड द आर्ट्स’ यांसारख्या विषयांवर वक्‍ते सत्रे आणि गोलमेज चर्चा.

§ हे प्रदर्शन गतिशीलता समस्या, श्रवणदोष व दृष्टीदोष असलेल्या अभ्यागतांसाठी स्पर्श कलाकृती, दृकश्राव्य सांकेतिक भाषेतील दौरे आणि ब्रेल वर्णनांद्वारे उपलब्ध आहे.

‘आर्ट फॉर होप’च्‍या माध्‍यमातून अनुदान प्राप्‍तकर्त्‍यांना आर्थिक साह्य मिळते, तसेच सामाजिक व व्‍यावसायिक मान्‍यतेसह भावनिक पाठिंबा देखील मिळतो, ज्‍यामुळे त्‍यांना त्‍यांच्‍या संबंधित कलाप्रकारांमध्‍ये शाश्‍वत करिअर घडवण्‍यास मदत होते. गेल्‍या चार सीझन्‍समध्‍ये एचएमआयएफने एकूण १.६५ कोटी रूपयांचे प्रत्‍यक्ष आर्थिक साह्य करत १५० आर्टिस्ट्स आणि कला संग्रहांना सक्षम केले आहे. या प्रयत्‍नांनी २५,००० हून अधिक आर्टिस्‍ट्सच्‍या जीवनामध्‍ये आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, ज्‍यामुळे भावी पिढ्यांसाठी भारताचा कलात्‍मक वारसाचे जतन करण्‍याप्रती एचएमआयएफची दीर्घकालीन कटिबद्धता अधिक दृढ होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments