Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedविनापरवाना बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाबाबत भिगवण पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल..*

विनापरवाना बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाबाबत भिगवण पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल..*

*”विनापरवाना गौण खनिज उत्खनन प्रकरणी माजी उपसरपंच हनुमंत बबन काजळे व विद्यमान सरपंच सुरेश तानाजी खाडे, किरण सातव, गोपाळ सुर्यवंशी सह १४ जनांवर गुन्हे दाखल.!,,*

*”इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गौण खनिज उत्खलनाचा सुळसुळाट, विठ्ठल राजे पवार यांचे कडून भिगवण पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल, प्रशासन मुग गिळून गप्प का.? पाटबंधारे, जलसंपदा फॉरेस्ट तसेच पर्यावरण, जिल्हा गौण खनिज उत्खनन विभाग, संबंधित शेतकरी, यांचे कडून कोणतीही परवानगी न घेता, गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून बेकायदेशीर विनापरवाना कोट्यावधी रुपयाचे गौण खनिज उत्खनन व चोरी संबंधितांनी केल्याचा तक्रारदार विठ्ठल राजे पवार यांचा आरोप.,,*

*इंदापूर भिगवन..*
*दिनांक 28 फेब्रवारी २०२५*
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये बोर ब्लास्टिंग द्वारे होत असलेल्या खाणी उत्खननामुळे शेतकरी व नागरिक अत्यंत त्रस्त असून गेल्या एक-दोन वर्षांपासून निरगुडे शेटफळगडे लाकडी म्हसोबावाडी पिंपळे या इंदापूर तालुक्यातील पश्चिम परिसरामध्ये खाणी मधील उत्खलनामुळे हवामान व वन्य प्राण्यांवर प्रचंड परिणाम झालेला असून शेकडो शेतकरी व नागरिकांनी केलेल्या तक्रारीची जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांपासून तहसीलदार तलाठी पोलीस ग्रामपंचायती राज्य सरकार गौण खनिज उत्खनन मंत्रालय यांनी कोणाचीही कुठलीही दखल घेतली गेलेली नाही मात्र १५ फेब्रुवारी २०२५ रोजी शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी निरगुडे परिसरात त्यांच्याच सामाईक व पोट खराब क्षेत्रात अतिक्रमण करून मध्यरात्री होत असलेल्या गौण खनिज उत्खननाच्या संदर्भात ऑनलाइन केलेल्या तक्रारीनंतर भिगवण पोलीस स्टेशनमध्ये साधारण १३ ते १४ जणांवर बेकायदेशीर व विनापरवाना बोअर ब्लास्टिंग करून गौण खनिज उत्खनन चोरी केल्याबाबत गुन्हा दाखल झालेला असून त्यामध्ये हनुमंत बबन काजळे राहणार निरगुडे गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच तसेच रेडनी गावचे विद्यमान सरपंच सुरेश तानाजी खाडे रा. रेडणी, तालुका इंदापूर, किरण उर्फ संग्राम सातव कसबा बारामती, गोपाळराव आनंदराव सूर्यवंशी मुंबई, समावेश आहे, भिगवन पोलीस ठाण्यामध्ये एफ आय आर क्रमांक ००६६/२०२५, ने एफ आय आर दाखल झाल्याची माहिती फिर्यादर खुद्द विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
याबाबत हकीकत असे की विठ्ठल राजे पवार व त्यांच्या कुटुंबियाची मौजे निरगुडे गावामध्ये शेत जमीन व फार्म हाऊस आहे त्याचे जमिनीमध्ये २१ गुंठ्याचा पोट खराब तर विठ्ठल राजे पवार यांचा फार्म हाऊस आहे, या शेत जागेवर अतिक्रमण करून गौण खनिज उत्खनन होत असल्याची माहिती त्यांच्या मुलाने त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग येथून ऑनलाइन फिर्याद तक्रार अर्ज दाखल केला, त्याप्रमाणे सॅटॅलाइटवरून रात्री होत असलेल्या उत्खननाचे छायाचित्रण मिळवले आणि ते पुण्याचे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, तहसीलदार इंदापूर यांच्याशी संपर्क करून भिगवण पोलीस स्टेशन व ११२ क्रमांकावर तक्रार नोंदवून त्या ठिकाणी होत असलेले विनापरवाना बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन मशिनरीसह त्या ठिकाणी बोर ब्लास्टिंग मशीन एक पोकलेन तीन डंपर आणि साधारण दहा ते पंधरा जणांचा त्या ठिकाणी असलेला कडा पहारा याची माहिती पोलिसांना दिल्याच्या नंतर पोलिसांनी ऑन दी स्पॉट जागेवरती सर्व वाहने पकडलेली आहेत. सदर वाहने पकडून जप्त करून त्यांच्यावर चोरीचा व दरोड्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विठ्ठल राजे पवार यांनी तक्रार अर्ज द्वारे केलेली होती त्यानुसार संबंधितांवर भारतीय न्याय दंड संहिता बी एन एस २०२३ अन्वये ३२९ (३), २८८, ३ (५), खाण, आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम १९५७, चे २१ नुसार गुन्हे दाखल झालेले आहेत.
सदर प्रकरणी विठ्ठल राजे पवार व श्रीमती संध्याराणी विश्वजीत राजे पवार कुटुंबीयांनी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच गौण खनिज महसूल मंत्री यांच्याकडे तसेच पुणे जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, पुणे जिल्हा गौणखणीत उत्खनन अधिकारी, तसेच इंदापूर तालुक्याचे तहसीलदार बनसोडे व भिगवन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, तलाठी व ग्रामसेवक निरगुडे तसेच मंडळ अधिकारी भिगवन यांच्याकडे सामायिक क्षेत्र शेत जमीन व पोट खराब क्षेत्र बळकवणे, सामायिक क्षेत्रामध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांच्या संगणमताने बेकायदेशीर नोंदी, वाटणी पत्र तयार करून नोंदवणे, बळकवलेल्या क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर, विनापरवाना बोर ब्लास्टिंग पोकलेन जेसीबी मशीनच्या साह्याने उत्खनन करणे, श्रीमती संध्याराणी विश्वजीत राजे पवार यांच्या पोट खराबा क्षेत्रामध्ये बेकायदेशीरपणे शेड बांधले, विहिरीला कडे बांधणे, तसेच गौण खनिज उत्खननासाठी बोर ब्लास्टिंग करताना केवळ तीन मीटर अंतरावर, पाटबंधारे जलसंपदा विभागाने बांधलेल्या बंधाऱ्याला व शेती फार्म हाऊसला नुकसान पोहोचवणे, फार्म हाऊसला व शेतकऱ्यांच्या घराला नुकसान पोहोचवणे च्या हेतूने केलेले कृत्य हे गंभीर स्वरूपाचे अजामीन पत्र, व कठोर दंडनीय असल्याने, अतिक्रमण करून गौण खनिज चोरी करणे म्हणजेच दरोडा, संगमत, गोणखणीज चोरी बाबतचे आणखीन गुन्हे कलमे एफ आय आर मध्ये नोंद लावावी अशी मागणी विठ्ठल राजे पवार यांनी केलेली आहे. तसेच गोणखणीज उत्खननाचे ठिकाणी असलेले पाट बंधारे विभागाने बांधलेला दोन सिमेंट बंधारे व एक के टी बंधारे, विठ्ठल राजे पवार यांचे फार्म हाऊस, अनेक शेतकऱ्यांची पक्की घरे असताना, जिल्हाधिकारी कार्यालय गौण खनिज अधिकारी, जिल्हाधिकारी (एसडीओ) बारामती प्रांत, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सरपंच ग्रामपंचायत संबंधित सदस्य माजी उपसरपंच निरगुडे तालुका इंदापूर, निरगुडे तलाठी, भिगवन मंडळ अधिकारी, तहसीलदार कार्यालय इंदापूर व पोलीस विभाग इंदापूर या संबंधितांनी गौण खनिज उत्खननासाठी परवानगी कोणत्या आधारे दिलेली आहे किंवा कसे याबाबतची तक्रार विठ्ठल राजे पवार यांनी भिगवण पोलिसांकडे केलेल्या तक्रारी चौकशी प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विनोद महागडे साहेब यांच्यासमोर गोपाळराव सूर्यवंशी, किरण उर्फ संग्राम सातव, हनुमंत बबन काजळे, सुरेश तानाजी खाडे यांनी सदर बाबत कोणतीही परवानगी घेतलेली नाही, तसी कोणतीही कागदपत्रे दाखवता आलेली नाहीत.? म्हणून भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी विनोद महांगडे साहेब यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात कारवाई केली आहे, याप्रकरणीचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय खाडे हे करत असून त्यांनी केलेल्या पंचनाम्यात सदर ठिकाणची पोकलेन मशीन बोर ब्लास्टिंग करणारी मशीन डंपर ही मशनरी आढळून आलेली नसल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी पकडलेली वाहने तात्काळ जप्त करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदार विठ्ठल राजे पवार यांनी केलेली आहे. सदर तक्रार प्रकरणातील ऑनलाइन तक्रारीनंतर पोलिसांनी गौण खनिज उत्खनन करत असताना जागेवर पकडलेल्या एक पोकलेन, दोन हाय प्रेशर ब्लास्टिंग मशीन, दोन हायवा डंपर, एक ट्रक, पंधरा ते २० लोकांच्या साह्याने बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन करत असताना पकडलेले आहे, व गौण खनिज उत्खनन व चोरी प्रकरणाचा तपास भिगवन पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी विजय खाडे करत आहेत.

*[ मुख्यमंत्री गृहमंत्री साहेब इकडे पण लक्ष द्या, इंदापुरात परळी पॅटर्न पेक्षा भयंकर घटना घडताहेत,! तत्कालीन तहसीलदारावर प्राण घातक हल्ला हे त्याचं प्रतीक आहे, विठ्ठल राजे पवार यांचा शासन प्रशासन महसूल विभागावर गंभीर आरोप… इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये निरगुडे लाकडी म्हसोबाची वाडी शेटफळगडे पिंपळे हद्दीमध्ये होत असलेले बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाबाबत वारंवार तक्रारी करून देखील त्या ठिकाणी जिल्हा गौण खनिज कार्यालयाकडून कोणतीही कारवाई होत नाही ! गेल्या वर्षभरामध्ये गौण खनिज उत्खननांमध्ये चार शेतकऱ्यांना जीव गमावा लागलेला आहे, तर चार मजूरांना गंभीर दुखापतीसह कायमस्वरूपीचा अपंगत्व आलेला आहे या सर्व प्रकारची माहिती या भागातील सर्व यंत्रणेला माहित असताना देखील त्यावर कारवाई होत नाही त्याचे कारण इंदापूर तालुक्यामध्ये परळी सारखी दहशत राजकीय गुंडांकडून होत आहे, याचे उदाहरण मंजे इंदापूर तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला हे एवढे उदाहरणे पुणे जिल्हाधिकारी गौणखणीत उत्खनन महसूल विभागाला पुरेशा नाही का .? इंदापूर तालुक्यात होत असलेली राजकर्त्यांची दहशत, त्यांचे आका.! तसेच इंदापूर तालुक्यामध्ये दहशत माजवण्याचा प्रकार काही राजकीय नेत्यांकडून होत असल्याचा आरोप शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य (भारत.) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी केलेला आहे.]*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments