Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedएमपीएससी लिपिक आणि कर सहाय्यक भरतीसाठी निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा*...

एमपीएससी लिपिक आणि कर सहाय्यक भरतीसाठी निवड यादी जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा* * *निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सत्कार करत मानले आमदार हेमंत रासने यांचे आभार*

पुणे (दि १): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) जानेवारी 2023 मध्ये संयुक्त गट ब आणि गट क भरतीसाठी 8169 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. या भरती अंतर्गत लिपिक/टंकलेखक 7007 आणि कर सहाय्यक 468 पदे भरण्यात येणार होती. मात्र, सर्व परीक्षा पूर्ण होऊनही तब्बल ६ महिने निवड यादी जाहीर झाली नव्हती. भरती प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे ७००० विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात सापडले होते. मॅट कोर्टात दाखल याचिकेमुळे भरती रखडल्याने उमेदवारांमध्ये चिंता निर्माण झाली होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आमदार हेमंत रासने यांची भेट घेत आपली व्यथा मांडली होती.

विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन आमदार हेमंत रासने यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करून या प्रक्रियेस गती देण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आवश्यक निर्देश दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेत गती आल्याने अखेर निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. आज निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी हेमंत रासने यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच राज्य सरकारचे आभार मानले.

*आमदार हेमंत रासने यांची प्रतिक्रिया*
“स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. परंतु संपूर्ण परीक्षा पार पडून देखील भरती रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता होती. हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर निवड यादी जाहीर झाली आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. यापुढेही विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी मी कायम आग्रही राहीन”.

*निवड झालेला विद्यार्थी ज्ञानेश्वर गोरे यांची प्रतिक्रिया*
“या निर्णयामुळे आम्हा विद्यार्थांना दिलासा मिळाला असून भरती प्रक्रियेतील अत्यंत विलंबामुळे आमची मेहनत वाया जाण्याची भीती होती, परंतु आमदार हेमंत रासने यांची तत्परता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तातडीचे आदेश देऊन न्याय मिळवण्यात मदत केल्याने आमचा विश्वास पुन्हा जागृत झाला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या विलंबांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, याची काळजी सरकारने घ्यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments