सीआयआय पुणेने शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी हॉटेल रिट्झ कार्लटन, पुणे येथे २५ वी वार्षिक बैठक आयोजित केली. वार्षिक बैठकीनंतर, झोनल कौन्सिलने आरएसबी ट्रान्समिशन (इंडिया ) लिमिटेडचे कार्यकारी संचालक श्री रजनीकांत बेहरा यांची २०२५-२६ या वर्षासाठी सीआयआय पुणे झोन कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून घोषणा केली.
श्री रजनीकांत बेहरा हे या कंपनीमध्ये कार्यकारी संचालक – ग्रुप फायनान्स म्हणून कार्यरत आहेत , त्यांना उद्योग क्षेत्रात कामकाजाचा समृद्ध अनुभव आहे . त्यांनी यूकेमधील लीड्स युनिव्हर्सिटी बिझनेस स्कूलमधून मास्टर्स पदवी प्राप्त केली आहे आणि अमेरिकेतील इलिनॉईस येथील अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी असोसिएट सिक्स सिग्मा इन्स्टिट्यूटमधून ग्रीन बेल्ट इन सिक्स सिग्मा प्रमाणन मिळाले आहे .
या समूहाशी जवळजवळ दोन दशकांपासून समर्पित संबंध असलेले रजनीकांत हे सीमापार विलीनीकरण आणि अधिग्रहण (एम अँड ए) प्रक्रियांसह विविध भांडवल उभारणी व्यवहारांचे नेतृत्व करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या सध्याच्या कामकाजामध्ये , ते वित्त नेतृत्व संघांशी जवळून सहकार्य करतात, धोरणात्मक अंतर्दृष्टी प्रदान करतात , प्रशासन आणि कायदेशीर अनुपालनांवर देखरेख करतात आणि आर्थिक नियोजन आणि विश्लेषणात नेतृत्व प्रदान करतात.
टाटा ब्लूस्कोप स्टील प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनुप कुमार त्रिवेदी यांना २०२५-२६ या वर्षासाठी सीआयआय पुणे झोनल कौन्सिलचे उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे.
श्री. अनुप कुमार त्रिवेदी हे आयआयटी-बीएचयूचे माजी विद्यार्थी आणि अनुभवी धातूशास्त्रज्ञ आहेत, त्यांच्याकडे स्टील उद्योगात उत्पादन आणि तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या क्षेत्रात जवळजवळ तीन दशकांचा समृद्ध अनुभव आहे. जानेवारी २०२३ पासून त्यांच्या नेतृत्वाखाली, कंपनीने आर्थिक वर्ष २०२४ मध्ये विक्रमी ४६% वाढ साध्य केली.लोकविकास आणि सीएसआरसाठी त्यांच्या वचनबद्धतेमुळे टाटा ब्लूस्कोप स्टीलला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, ज्यामुळे उद्योगातील कंपनीचे आघाडीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.
—


