Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedरोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे श्री विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांना...

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे श्री विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांना व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार

पुणे, ३ मार्च २०२५ : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे श्री विद्यानिधी उर्फ प्रसाद वनारसे यांना यावर्षीचा व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा नुकताच ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो अध्यक्षा अमिता नेने, रोटेरियन अंजली सहस्त्रबुद्धे, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगीताई दामले,विश्वास सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर उपस्थित होते. श्री प्रसाद वनारसे हे गेली तीन दशके नाट्य क्षेत्रात अनेक प्रकारे कार्यरत आहेत. कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगीताई दामले यांनी श्री वनारसे यांच्याशी संवाद साधला, त्यातून प्रेक्षकांना वनारसे यांचे नाटक क्षेत्रातील प्रचंड योगदान उलगडून सांगितले.

श्री वनारसे यांनी आपल्या भाषणात आई श्यामलाताई आणि वडील सुधीर यांच्याकडून नाटक,अभिनय याचे प्रोत्साहन मिळाल्याचे आवर्जून सांगितले. पुरुषोत्तम करंडक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा येथील प्रशिक्षण , देशोदेशी चे नाट्य महोत्सव, फ्लेम विद्यापीठ आणि सध्या नाट्य प्रशिक्षणावर त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेत सुरू असणारे काम या सगळ्यावर कार्यक्रमादरम्यान सखोल चर्चा झाली.

श्री प्रसाद वनारसे यांना मिळालेला पुरस्कार हा त्या काळातल्या पालकत्वाचा सन्मान आहे असे सतीश आळेकर म्हणाले. स्वतःच्या सर्जनशीलतेपेक्षाही दुसऱ्यांमधली सर्जनशीलता विकसित करण्याकडे श्री वनारसे यांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे आजचे पारितोषिक त्यांना मिळाले हे फार योग्य झाले असेही ते म्हणाले.

मानपत्राचे लेखन आणि वाचन विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी केले. डॉक्टर माधवी मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. रोटेरियन मकरंद फडके यांनी आभार मानले.

प्रेक्षागृहात माननीय माधुरी सहस्त्रबुद्धे तसेच एन एस डी चे माजी संचालक रामगोपाल बजाज, शामलाताई वनारसे, मृणालिनी वनारसे आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments