Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिंहगड सिटी स्कूल, कोंढवा या शाळेवरील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव* ...

सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा या शाळेवरील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव* -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई,दि. ११ : सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा बुद्रुक, पुणे या शाळेने बेकायदेशीर स्थलांतर, बांधकाम केले असल्याने मान्यता रद्द करण्याबाबत किंवा कायम ठेवण्याबाबत निर्णय व कार्यवाही होण्यासाठी शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्य योगेश टिळेकर यांनी सिंहगड सिटी स्कूल कोंढवा बुद्रुक पुणे ही शाळा इमारतीचा विना भोगवटा प्रमाणपत्र वापर सुरू असल्याबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या, शाळेत २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सीबीएसई बोर्डाची आहे, आणि त्याच्यामुळे ह्या शाळेची मान्यता रद्द करावी किंवा योग्य ती कार्यवाही करावी, याबाबत शिक्षण उपसंचालकांना पत्र देण्यात आलेले आहे. महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे. २१०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांचे फेर नियोजन करणे गरजेचे आहे. ही आपली सामाजिक बांधीलकी आहे. तथापि, अनधिकृत बांधकाम आणि शाळेवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

००००००००
[11/03, 8:10 pm] Mandar Ranjekar: *आरएनए लिबर्टी गृह संकुलातील इमारतींच्या वाणिज्य वापराविषयी चौकशी समिती नेमणार*
– *राज्यमंत्री माधुरी मिसाळ*
मुंबई, दि. 11 – मिरा – भाईंदर महानगरपालिकेंतर्गत आरएनए लिबर्टी गृह संकुलातील इमारतींचा विनापरवानगी वाणिज्य वापर होत असल्याबाबत चौकशी समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली.
सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री मिसाळ बोलत होत्या. यावेळी सदस्य भाई जगताप यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.
आरएनए लिबर्डी गृह संकुलामध्ये 2002 नंतर एकही विक्री व्यवहार झाला नसल्याचे सांगून राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, सदस्यांनी मांडलेल्या सूचना महत्त्वाच्या असून, त्याचा विचार केला जाईल. मी नाव घोषित करू शकत नाही, मात्र सभागृहात देण्यात आलेल्या छापील उत्तरातील विसंगती लक्षात घेऊन योग्य ती चौकशी केली जाणार आहे. विकसक सापडत नसल्याची परिस्थिती आहे. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments