Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड पोलिस व महापालिका अभियंते सुरक्षित रस्ते डिझाईनसाठी एकत्रित कार्यरत

पिंपरी चिंचवड पोलिस व महापालिका अभियंते सुरक्षित रस्ते डिझाईनसाठी एकत्रित कार्यरत

पिंपरी, ११ मार्च २०२५ – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अभियंते आणि पिंपरी-चिंचवड पोलिस अधिकाऱ्यांनी शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्याच्या उ‌द्देशाने आयोजित ‘फंडामेंटल्स ऑफ सेफर स्ट्रीट्स’ या दिवसभराच्या कार्यशाळेत भाग घेतला. या कार्यशाळे‌द्वारे अधिकाऱ्यांना सुरक्षित रस्ते डिझाइनविषयी मूलभूत ज्ञान मिळविण्यास मदत झाली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (Bloomberg Philanthropies Initiative for Global Road Safety) अंतर्गत भागीदार असलेल्या ग्लोबल डिझाइनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (Global Designing Cities Initiative) यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उ‌द्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. महापालिका आणि GDCI यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील धोकादायक चौकांचे पुनर्रचना प्रकल्प आणि निगडी येथील सुरक्षित शाळा क्षेत्र प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
ऑटो क्लस्टर प्रशिक्षण सभागृह, चिंचवड येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत महापालिका अभियंते, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस अधिकारी, महामेट्रो अधिकारी आणि सल्लागारांसह एकूण ७३ लोक सहभागी झाले होते. यामध्ये महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, आणि वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त बापू बांगर यांनी सहभाग घेतला.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्ते सर्वांसाठी अधिक सुरक्षित आणि प्रवासयोग्य करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. अशा कार्यशाळांमुळे तांत्रिक बाबीचा अभ्यास करून पादचारी, सायकलस्वार, बस प्रवासी, मेट्रो प्रवासी आणि मोटारसायकलस्वार यांना प्राधान्य देत रस्ते आराखड्यांबाबत नवीन दृष्टिकोन मिळतो, असे शेखर सिंह यांनी सांगितले.
स्थानीय संदर्भ लक्षात घेऊन, या कार्यशाळेदवारे अभियंते व पोलिस अधिकाऱ्यांना जागतिक सर्वोत्तम पद्धतींची माहिती देण्यात आली. पादचारी, सायकलस्वार मोटारसायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापकर्ते यांच्या दृष्टीकोनातून उपस्थित अधिकाऱ्यांनी शहरातील रस्त्यांचे मूल्यमापन केले. त्यासाठी लहान मुलांच्या उंचीच्या (सुमारे ३.२ फूट) कोनातून रस्त्यांचे निरीक्षण करणारे उपकरण वापरण्यात आले. काही अधिकाऱ्यांनी व्हीलचेअरचा वापर केला आणि डोळ्यांवर पट्टी बांधून अपंग व्यक्तींच्या दृष्टीकोनातून देखील रस्त्यांचे मूल्यमापन केले.
“या कार्यशाळेत पादचारी, सायकलस्वार आणि मोटारसायकलस्वारांच्या सुरक्षिततेवर होणाऱ्या वेगाच्या परिणामावर भर देण्यात आला, सातत्यपूर्ण कारवाई आणि अभियांत्रिकी उपाय वापरून वेग कमी करणे हे रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यासाठी आम्ही महानगरपालिकेसोबत समन्वय साधत अभियांत्रिकी मानकांचा अवलंब करून योग्य अंमलबजावणी करू,” असे बापू बांगर यांनी सांगितले.
GDCI चे प्रोग्राम मॅनेजर जसवंत तेज कासला यांनी सांगितले, “या प्रशिक्षणा‌द्वारे अभियंते सुरक्षित रस्ते डिझाइनद्वारे अधिक प्रभावी भूमिका बजावू शकतील. या प्रशिक्षणात जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धती, ग्लोबल स्ट्रीट डिझाइन मार्गदर्शिकेतील तत्त्वे व नवीन साधने यांचा समावेश होता.
महापालिका आणि BIGRS पुढील काही महिन्यांत शहरातील आठ प्रशासकीय विभागांतील अभियंत्यांसाठी ही कार्यशाळा विस्तारित स्वरूपात राबविणार आहे. येत्या काही वर्षात, या कार्यशाळांचा उपयोग शहरातील रस्ते आणि परिसर अधिक सुरक्षित व सुधारित करण्यासाठी केला जाणार आहे, जेणेकरून नागरिकांचे जीवनमान उंचावले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क साधाः
स्वप्नील रावल, संचार अधिकारी, पुणे जिल्हा
ब्लूमबर्ग फिलंथ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS)
मोबाईल: +91 98190 13648
ई-मेल: swapnil@bigrs.org

माहिती पत्रक
ग्लोबल डिझाईनिंग सिटीज इनिशिएटिव्ह बद्दल
ग्लोबल डिझाईनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (GDCI) चे ध्येय जगभरातील रस्त्यांचे रूपांतर करणे आहे. आम्ही नेते, अभ्यासक आणि समुदायांना प्रेरित करून, रस्त्यांचे लोककेंद्री डिझाईन कसे असावे याविषयी मार्गदर्शन करतो. आमच्या ग्लोबल स्ट्रीट डिझाईन गाईड मधील धोरणे आणि सर्वोत्तम पद्धती आमच्या कार्याचा मुख्य आधार आहेत. या तत्त्वांचा उपयोग विविध शहरांमध्ये धोरणे सुधारण्यासाठी, स्थानिक क्षमतावृद्धीसाठी, प्रकल्पांची अंमलबजावणी व मूल्यमापन करण्यासाठी केला जातो. २०२२ मध्ये GDCI रॉकफेलर फिलंथ्रॉपी अडव्हायझर्स चा एक प्रकल्प बनला.

चौकट – ब्लूमबर्ग फिलंथ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी बद्दल थोडक्यात..
ब्लूमबर्ग फिलंथ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी (BIGRS) हा जगभरातील प्रमुख रस्ता सुरक्षा संस्थांसोबत भागीदारी करून रस्ता सुरक्षा उपाययोजना राबविणारा उपक्रम आहे. BIGRS विविध देशातील सरकारी आणि बिगर-सरकारी संस्थांशी समन्वय साधून रस्ता सुरक्षा सुधारणांसाठी कार्य करतो. हा उपक्रम उच्च-गुणवत्तेच्या निरीक्षण आणि मूल्यमापन तंत्रांचा वापर करून प्रगतीचे सतत मूल्यमापन करण्यावर भर देतो.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://www.bloomberg.org/program/public-health/road-safety/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments