पुणे, ता. १२ – (प्रतिनिधी)
केशव माधव विश्वस्त निधी तर्फे येत्या रविवार, १६ मार्च २५ रोजी मणिपूर आणि ईशान्य भारतात चार दशके प्रत्यक्ष कार्य केलेले वक्ते जयवंत कोंडविलकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
पटवर्धन बाग,एरंडवणे स्थित “सेवा भवन”च्या सभागृहात रविवारी, १६ मार्च रोजी सकाळी दहा ते साडे बारा या वेळेत हे व्याख्यान होणार आहे. संगणक तज्ञ डॉ दीपक शिकारपूर हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत .
यावेळी जयवंत कोंडविलकर हे दृकश्राव्य (PPT- पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन) द्वारे मणिपूर येथे त्यांनी जे कार्य गेल्या ४/५ दशकात केले त्याची माहिती उपस्थितांना देणार आहेत .
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन “केशव माधव विश्वस्त निधी”चे सचिव अरविंद देशपांडे यांनी केले आहे.
..


