Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedफ्लिपकार्ट सुरू करणार ऑर्डरच्याच दिवशी डिलिव्हरीची सुविधा - २० शहरांतील लक्षावधी...

फ्लिपकार्ट सुरू करणार ऑर्डरच्याच दिवशी डिलिव्हरीची सुविधा – २० शहरांतील लक्षावधी ग्राहकांना ज्या दिवशी ऑर्डर केली, त्याच दिवशी उत्पादने घरपोच मिळणार 

महानगरे व महानगरांशिवाय अन्य काही शहरांमधील लक्षावधी ग्राहकांना लाभदायी ठरणारी एक सुविधा देण्यासाठी फ्लिपकार्ट सज्ज होत आहे. अनेकविध प्रवर्गांतील उत्पादने ज्या दिवशी ऑर्डर केली जातील, त्याच दिवशी त्यांची डिलिव्हरी देण्याची सुविधा फ्लिपकार्ट सुरू करत आहे. अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, कोइंबतूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, हैदराबाद, इंदोर, जयपूर, कोलकाता, लुधियाना, लखनौ, मुंबई, नागपूर, पुणे, पटना, रायपूर, सिलिगुडी आणि विजयवाडा ह्या शहरांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे. ह्या शहरांतील ग्राहकांनी दुपारी १ वाजता ऑर्डर प्लेस केली, तर त्यांना ऑर्डर केलेली उत्पादने मध्यरात्री १२ वाजेपूर्वी मिळतील.

हा उपक्रम फेब्रुवारी महिन्यापासून सुरू होत आहे आणि पुढील काही महिन्यात त्याचा आवाका देशभरातील अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

ग्राहकांचे आवडते उत्पादन प्रवर्ग:

अत्यावश्यक वस्तू, मोबाइल फोन्स, फॅशन, सौंदर्यप्रसाधने, जीवनशैली, पुस्तके, गृहोपयोगी उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्स ह्या प्रवर्गांतील उत्पादने ज्या दिवशी ऑर्डर केली गेली त्याच दिवशी डिलिव्हर करण्याच्या फ्लिपकार्टच्या उपक्रमामुळे ग्राहकांना मदत होणार आहे. ग्राहकांसाठी अत्यावश्यक अशा वस्तू त्यांना ऑर्डर केल्या दिवशीच मिळणार आहेत.

पुरवठा साखळी आणि तांत्रिक कणा:

फ्लिपकार्ट दर महिन्याला १२ कोटींहून अधिक पॅकेजेस डिलिव्हर करते. दमदार पुरवठा साखळी उभी करून त्याद्वारे अगदी देशभरातील अगदी दुर्गम भागातील पिनकोड्सपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. ऑर्डरच्याच दिवशी डिलिव्हरी करणे शक्य व्हावे म्हणून फ्लिपकार्टने गेल्या एक वर्षात अनेक फुलफिलमेंट सेंटर्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचप्रमाणे वर्गीकरण अधिक चांगल्या प्रकारे व्हावे आणि फुलफिलमेंट सेंटर्समधून अधिक उत्पादनांवर प्रक्रिया व्हावी ह्या दृष्टीने तांत्रिक क्षमता वाढवण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे डिलिव्हरीची यंत्रणा अधिक मजबूत होईल आणि लक्षावधी ग्राहकांना समाधान मिळेल.

मार्गांचे काटेकोर नियोजन, डिलिव्हरी मार्गांचे अधिकाधिक उपयोजन, माल उचलण्यासाठी लागणाऱ्या वेळामधील बचत, उत्पादनांचे अधिक वेगाने वर्गीकरण ह्यांमध्ये सहाय्य करतील अशा एमएल (मशिन लर्निंग) मॉडेल्सवर व तंत्रज्ञानांवर फ्लिपकार्टची टीम काम करत आहे, जेणेकरून, उत्पादने कमाल कार्यक्षमतेने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतील.

ऑर्डर्सची पूर्तता सर्वांत नजीकच्या फुलफिलमेंट सेंटरमधून (एफसी) केली जाईल, प्रवासाचा वेळ कमीतकमी राहील आणि ग्राहकाला उत्तम अनुभव देण्यासाठी डिलिव्हरी प्रक्रियेची कार्यक्षमता अधिक चांगली होईल ह्याची खात्री करण्यासाठी अनेक महिन्यांपासून नियोजन केले जात आहे.

फ्लिपकार्ट देते ग्राहकांना सर्वोच्च प्राधान्य:

 

विविध शहरांमध्ये ज्या दिवशी ऑर्डर केली जाईल, त्याच दिवशी डिलिव्हरी देण्याच्या दृष्टीने फ्लिपकार्टने पायाभूत सुविधा आणि वाहतुकीमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे. फुलफिलमेंट सेंटर्सचे जाळेही वाढवले जात आहे.

 

फ्लिपकार्ट समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच पुरवठा साखळी, ग्राहक अनुभव व रिकॉमर्स बिझनेस प्रमुख हेमंत बद्री स्पष्ट करतात, “२०२४ सालामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच, देशातील लक्षावधी ग्राहकांना, त्यांनी ऑर्डर केलेली उत्पादने त्याच दिवशी मिळाल्यामुळे, मोठा आनंद होणार आहे. केवळ महानगरांतीलच नव्हे, तर महानगरांशिवाय अन्य शहरांतील ग्राहकांनाही फ्लिपकार्टवर खरेदी करण्यास खूप आवडते हे लक्षात घेऊन, आम्ही २० शहरांमध्ये त्याच दिवशी डिलिव्हरीचा उपक्रम राबवण्यासाठी काम करत आहोत. ग्राहकांना समाधान देण्यात अग्रेसर राहण्याची आमची बांधिलकी ह्यातून पुन्हा एकदा दिसून आली आहे. येत्या काही महिन्यात आम्ही ह्या सुविधेची व्याप्ती आणखी वाढवू, आणखी काही शहरांचा व उत्पादन प्रवर्गांचा समावेश ह्यात केला जाईल. मोठ्या उपकरणांसाठीही ही सुविधा दिली जाईल. त्यामुळे ग्राहकांचा आनंद नक्कीच वाढेल.”

 

“आमच्या विक्रेत्यांसाठी तसेच ग्राहकांसाठी दररोज लक्षावधी ऑर्डर्सवर अखंडितपणे प्रक्रिया करण्यासाठी पुरवठा साखळी जाळे सातत्याने शिस्तबद्ध करत राहण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. महानगरांत तसेच महानगरांशिवाय अन्य शहरांत डिलिव्हरीची कार्यक्षमता समान राखण्याचेही आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये गुंतवणूक करतो, डेटा अॅनालिटिक्सचा लाभ घेतो तसेच ग्राहकांच्या मागण्यांबाबत अंदाज बांधण्यासाठी व त्याच दिवशी त्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही मागण्यांच्या नमुन्यांबाबत सखोल माहितीही मिळवली आहे. आमच्या टीम्सने ह्यासाठी केलेल्या परिश्रमांचा व त्यांच्या समर्पणाचा उल्लेख मला केलाच पाहिजे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी अविश्रांत काम योगदान दिले आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments