Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे    सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन   ...

स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे    सावरकर स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन   गुरूवार, १ फेब्रुवारी पासून आयोजन ; चार दिवस चालणार व्याख्यानमाला

 

 

पुणे दि. ३१ – स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे आयोजित सावरकर स्मृति व्याख्यानमाला उद्या, गुरुवार, १ फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता व्याख्यानमालेचे उ्दघाटन सुप्रसिद्ध अधिवक्ता आणि शिक्षण प्रसारक मंडळी, पुणे यांच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड एस. के जैन यांच्या हस्ते होणार आहे. व्याख्यानमालेचे हे तेरावे वर्ष आहे.

 

उदघाटन समारभं आणि ही सर्व व्याख्याने आनंदक्षण शाळा, पोलिस स्टेशनसमोर, सनसिटी रस्ता, आनंदनगर सिंहगड रस्ता पुणे येथे सायंकाळी ७ वाजता होतील.

 

चार दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत एक फेब्रुवारीला जागतिक नेमबाजी स्पर्धा विजेत्या तेजस्विनी सावंत यांची ‘क्रीडाविश्वातील महिलांचे योगदान’ या विषयावर मुलाखत होईल. २ फेब्रुवारीला अभिजित जोग यांचे ‘जगाला पोखऱणारी वैचारिक वाळवी’ या विषयावर, ३ फेब्रुवारीला गीता उपासनी यांचे ‘गुणसागर सावरकर’ या विषयावर तर यंदाच्या व्याख्यानमालेचा समारोप ४ फेब्रुवारीला प्रशांत पोळ यांचया ‘बदलता भारत’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे, असे स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान व्याख्यानमाला संयोजन समितीने कळवले आहे.

 

कोरोना काळातील दोन वर्षे वगळता व्याख्यानमाला ही सातत्याने अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आयोजित केली जाते आहे. यंदा देखील श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा अशी माहिती रवींद्र शिंगणापूरकर व व्याख्यानमाला समिती प्रमुख सारिका वाघ यांनी दिली.

..

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments