गुरूग्राम, भारत – मार्च १५, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज लोकप्रिय गॅलॅक्सी एफ सिरीज पोर्टफोलिओ विस्तारित करत गॅलॅक्सी एफ१६ ५जी च्या लाँचची घोषणा केली. गॅलॅक्सी एफ१६ ५जी ने गॅलॅक्सी एफ सिरीजचा वारसा कायम ठेवला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये आकर्षक सुपर एएमओएलईडी डिस्प्ले, ५० मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा यांसारखी सेगमेंट-लीडिंग वैशिष्ट्ये आणि अँड्रॉईड अपग्रेड्सचे सहा जनरेशन्स व सहा वर्ष सिक्युरिटी अपडेट्स आहे.
”गॅलॅक्सी एफ१६ ५जी च्या लाँचमधून अर्थपूर्ण नाविन्यतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, जेथे वापरकर्ते त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यास सक्षम होतात. गॅलॅक्सी एफ१६ ५जी जनरेशन झेडच्या गतीशील जीवनशैलीसाठी डिझाइन करण्यात आला आहे आणि अपवादात्मक युजर अनुभवासाठी कार्यक्षमता, टिकाऊपणा व मनोरंजन यांचे उत्तम संयोजन आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे संचालक अक्षय एस. राव म्हणाले.
नवीन डिझाइन आणि सेगमेंट लीडिंग डिस्प्ले
आकर्षक नवीन डिझाइनसह रिप्पल ग्लो फिनिश आणि फक्त ७.९ मिमी जाडी असलेला गॅलॅक्सी एफ१६ ५जी स्टाइल व आरामदायीपणासाठी डिझाइन करण्यात आला आहे. गॅलॅक्सी एफ१६ ५जी मध्ये सेगमेंट-लीडिेंग ६.७ इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्प्ले असेल, जे आकर्षक व्हिज्युअल्ससह वैविध्यपूर्ण रंगसंगती व सखोल कॉन्ट्रास्ट्स देईल.
सेगमेंट लीडिंग कॅमेरा
स्टायलिश, लिनियर-ग्रुप्ड कॅमेरा डिझाइन असलेल्या गॅलॅक्सी एफ१६ ५जी मधील सेगमेंट-लीडिंग ५० मेगापिक्सल ट्रिपल-कॅमेरा सेटअप वापरकर्त्याला आकर्षक फोटो व व्हिडिओज कॅप्चर करण्यास मदत करते. गॅलॅक्सी एफ१६ ५जी मध्ये आकर्षक सेल्फीज कॅप्चर करण्यासाठी १३ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा देखील आहे.
शक्तिशाली कार्यक्षमता
मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० प्रोसेसरची शक्ती असलेला गॅलॅक्सी एफ१६ ५जी सुलभ मल्टीटास्किंग आणि विना-व्यत्यय गेमिंगचा आनंद देतो. गॅलॅक्सी एफ१६ ५जी मध्ये ५००० एमएएच बॅटरीसह २५ वॅट फास्ट चार्जिंग आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना दिवसभर स्मार्टफोन कार्यरत राहण्याची खात्री मिळते.
गॅलॅक्सी फाऊंडेशन
नवीन उद्योग मापदंड स्थापित करत गॅलॅक्सी एफ१६ ५जी सेगमेंटमधील सर्वोत्तम अँड्रॉईड अपग्रेड्सचे ६ जनरेशन्स आणि ६ वर्ष सिक्युरिटी अपडेट्स देईल, ज्यामधून भविष्यासाठी सुसज्ज अनुभवाची खात्री मिळेल.
सॅमसंग गॅलॅक्सी एफ१६ ५जी सह या सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच सॅमसंग वॉलेटसह नाविन्यपूर्ण टॅप अँड पे वैशिष्ट्य लाँच करत आहे, ज्यामुळे ग्राहकांना कार्यक्षमपणे व सुरक्षितपणे पेमेंट्स करता येतील.
गॅलॅक्सी एफ१६ ५जी विबिंग ब्ल्यू, ग्लॅम ग्रीन व ब्लिंग ब्लॅक या तीन आकर्षक रंगांमध्ये येईल आणि फ्लिपकार्ट, Samsung.com व निवडक रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल.
उत्पादन
व्हेरिएण्ट
सुरूवातीची किंमत
ऑफर्स
गॅलॅक्सी एफ१६ ५जी
४ जीबी + १२८ जीबी
११४९९ रूपये
१००० रूपये बँक कॅशबॅक समाविष्ट
६ जीबी + १२८ जीबी
१२९९९ रूपये
८ जीबी + १२८ जीबी
१४४९९ रूपय


