Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड'द्वारे ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड' मोहिमेच्‍या २०२५ एडिशनची घोषणा

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड’द्वारे ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड’ मोहिमेच्‍या २०२५ एडिशनची घोषणा

गुरूग्राम । मार्च २०, २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) या भारतातील आघाडीच्‍या प्रीमियम व स्‍मार्ट मोबिलिटी सोल्‍यूशन्‍स प्रदाता कंपनीने आज ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड’ मोहिमेच्‍या २०२५ एडिशनची घोषणा केली. ही मोहिम विद्यमान ग्राहकांना त्‍यांच्‍या ह्युंदाई वेईकल्‍सची मोफत तपासणी आणि सर्विससाठी डिस्‍काऊंट कूपन्‍सचा लाभ घेण्‍याची सुविधा देते. या ग्राहक-केंद्रित उपक्रमाचा मनसुबा हा एकूण मालकीहक्‍क अनुभव उत्‍साहित करण्‍याचा आणि पहिल्‍यांदाच वेईकल खरेदी करणाऱ्या ग्राहकांशी किंवा त्‍यांच्‍या विद्यमान वेईकल्‍सना अपग्रेड व एक्‍स्‍चेंज करू पाहणाऱ्या संभाव्‍य ग्राहकांशी कनेक्‍ट होण्‍याचा आहे. हा एक-दिवसीय देशव्‍यापी ग्राहक आऊटरिच प्रोग्राम रविवार २३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्‍यात आला आहे.

 

या अद्वितीय ग्राहक-केंद्रित उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत एचएमआयएलचे होल टाईम डायरेक्टर आणि चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. तरूण गर्ग म्‍हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्‍ये आम्‍ही प्रत्‍येक मैल, प्रत्‍येक वळणावर आमच्‍या ग्राहकांच्‍या सेवेसाठी उपलब्‍ध असण्‍याप्रती कटिबद्ध आहोत. ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड’ मोहिमेमधून विश्‍वसनीयता आणि ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाप्रती, तसेच अत्‍याधुनिक स्‍मार्ट गतीशीलता सोल्‍यूशन्‍स व एकत्रित मालकीहक्‍क अनुभव देण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. या दिवसभर राबवल्‍या जाणाऱ्या शिबिराच्‍या २०२५ एडिशनचे आयोजन रविवार २३ मार्च २०२५ रोजी करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून ग्राहकांसाठी अद्वितीय अनुभव निर्माण करण्‍याप्रती आमचे सातत्‍यपूर्ण प्रयत्‍न दिसून येतात. वर्षानुवर्षे ‘ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड’ मोहिम ऑटोमोटिव्‍ह उद्योगामधील लोकप्रिय उपक्रम म्‍हणून उदयास आली आहे, जी विद्यमान व संभाव्‍य ग्राहकांना त्‍यांच्‍यापासून जवळ असलेल्‍या ठिकाणी एकाच छताखाली हृयुंदाईच्‍या अद्वितीय सेल्‍स, सर्विस व प्री-ओन्‍ड कार सेल्‍स ऑफरिंग्‍जचा अनुभव घेण्‍याची संधी देते.”

 

 

 

ग्राहकांच्या ह्युंदाई वेईकल्‍ससाठी कस्‍टमाइज करण्‍यात आलेल्या कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी १८-पॉइण्‍ट तपासणीनंतर कुशल ह्युंदाई टेक्निशियन्‍स त्यांना आगामी सर्विस आवश्‍यकतांबाबत सल्‍ला देतील. विविध सहभागात्‍मक क्रियाकलाप देखील डिझाइन करण्‍यात आले आहेत, जेथे ग्राहकांना पुढील गोष्‍टी जिंकण्‍याची संधी आहे: :

 

§ अॅक्‍सेसरीजवर २० टक्‍के सूट

 

§ व्‍हील अलाइनमेंट व बॅलन्सिंगवर ५० टक्‍के सूट

 

§ इंटीरिअर क्‍लीनिंग व एक्‍स्‍टीरिअर सुधारणेवर ३० टक्‍के सूट

 

§ मेकॅनिकल लेबरवर २० टक्‍के सूट

 

§ अॅण्‍टी-रस्‍ट कोटिंगवर १० टक्‍के सूट

 

§ मोफत ड्राय वॉश सर्विस

 

 

 

विद्यमान व संभाव्‍य ग्राहक देखील त्‍यांच्‍या विद्यमान कारचे मूल्‍यांकन करू शकतात, त्‍यांच्‍या आवडत्‍या ह्युंदाई वेईकल्‍सची टेस्‍ट ड्राइव्‍ह घेऊ शकतात आणि नवीन ह्युंदाई वेईकल बुक करू शकतात. ह्युंदाईच्‍या सुपर डिलाइट मार्च ऑफर्स अंतर्गत ग्राहक नवीन ह्युंदाई वेईकलच्‍या खरेदीवर जवळपास ५५,००० रूपयांच्‍या फायद्यांचा (रोख व एक्‍स्‍चेंज फायद्यांसह) आनंद घेऊ शकतात. तसेच मार्च २०२५ च्‍या अखेरपर्यंत ग्राहकांसाठी ५,००० रूपयांचा अतिरिक्‍त स्‍क्रॅपेज बोनस ऑफर करण्‍यात आला आहे. ह्युंदाई ऑल्‍वेज अराऊंड मोहिमेबाबत अधिक माहितीसाठी ग्राहक त्‍यांच्‍या जवळच्‍या ह्युंदाई डिलरशिप्‍सशी संपर्क साधू शकतात.

 

 

 

अधिक माहितीसाठी, संपर्क साधा:

 

ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड | corporatecommunication@hmil.net

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments