Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयएजीई आणि एएजीएल 2025 ही गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपी विषयावरील परिषद पुण्यात संपन्न

आयएजीई आणि एएजीएल 2025 ही गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपी विषयावरील परिषद पुण्यात संपन्न

पुणे,20 मार्च 2025 :

 

इंडियन असोसिएशन ऑफ गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपिस्ट (आयएजीई) आणि अमेरिकन असोसिएशन ऑफ गायनेकोलॉजिक लॅप्रोस्कोपिस्ट (एएजीएल) यांच्या तर्फे गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपी या विषयावरील वार्षिक परिषद नुकतेच जेडब्ल्यू मॅरिएट पुणे येथे पार पडली. कौशल्य,नवोपक्रम आणि सहकार्याचा मिलाफ असणाऱ्या या कार्यक्रमात भारतभरातून 600 हून अधिक स्त्रीरोग तज्ञ,18 आंतरराष्ट्रीय आणि 250 भारतीय प्राध्यापक उपस्थित होते.

 

 

कमीत कमी छेद असणारी (मिनिमली इनव्हेसिव्ह) स्त्री रोग शस्त्रक्रियेतील नवीनतम कौशल्याबद्दल मार्गदर्शन करणाऱ्या अमेरिकन असोसिएशन ऑफ गायनेकोलॉजिक लॅप्रोस्कोपीचे अध्यक्ष,इटली,फ्रान्स,युरोप,अमेरिका आणि तुर्कीमधील आघाडीच्या तज्ञांचे यजमानपद भूषविण्याचा सन्मान या परिषदेला मिळाला. इनोव्हेट,ऑपरेट,एलिव्हेट या संकल्पनेवर आधारित या सत्रांमध्ये लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया,एंडोमेट्रिओसिस व्यवस्थापन आणि प्रजनन आरोग्याशी संबंधित सेवेतील नवीनतम प्रगती यांचा समावेश होता.

 

 

 

रूबी हॉल क्लिनिकमधील ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजी,आयव्हीएफ ॲन्ड एंडोस्कोपी सेंटर विभागाच्या प्रमुख व फॉग्सीच्या अध्यक्ष आणि परिषदेच्या आयोजन अध्यक्ष डॉ.सुनिता तांदूळवाडकर या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी होत्या.गायनॅकोलॉजिकल एंडोस्कोपी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व असलेल्या डॉ.तांदूळवाडकर यांची उत्कृष्टता आणि शिक्षण -प्रशिक्षणाप्रती प्रती असलेल्या कटिबध्दतेमुळे कमीत कमी छेद असलेल्या प्रक्रियांप्रती शल्यचिकित्सकांच्या दृष्टीकोनात परिवर्तन घडले आहे.त्यांच्या नेतृत्वामुळे ही परिषद केवळ एक वैद्यकीय कार्यक्रम नसून नवोपक्रम,कौशल्य विकास आणि जागतिक सहकार्यासाठी एक गतिमान व्यासपीठ बनले आहे. या परिषदेचे नियोजन आणि अंमलबजावणी डॉ.तांदूळवाडकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ.शैलेश पुणतांबेकर,डॉ.आशिष काळे यांच्या टीममुळे शक्य झाले.

 

 

 

परिषदेच्या यशाबद्दल बोलताना डॉ.तांदूळवाडकर म्हणाल्या की, हा कार्यक्रम स्त्रीरोग चिकित्सेमधील शस्त्रक्रियेच्या सीमा ओलांडण्यासाठी आमच्या वचनबध्दतेचे प्रतिबिंब दर्शविते. प्रतिभावान लोक एकत्र येणे,ज्ञानाची देवाणघेवाण आणि कौशल्यांचा विकसित करताना पाहणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे. तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत जात आहे,तसतसे आपणही केले पाहिजे आणि ही परिषद जीवन बदलणाऱ्या कमीत कमी छेद असलेल्या प्रक्रियांच्या दिशेमध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे.

 

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्राध्यापकांनी जवळपास 38 लाईव्ह शस्त्रक्रियांचे प्रात्याक्षिके सादर केल्याची माहिती डॉ.तांदूळवाडकर यांनी दिली. गॅलेक्सी हॉस्पिटल आणि सिंबायोसिस मेडिकल कॉलेजमध्ये सर्व शस्त्रक्रिया पार पडल्या आणि सर्व प्रतिनिधींसाठी पुण्यातील जेडब्ल्यू मॅरिएट येथे शस्त्रक्रियांचे प्रसारण करण्यात आले.

 

 

 

डॉ.पुणतांबेकर म्हणाले की, या परिषदेत सिंबायोसिस युनिव्हर्सिटीतून थेट शस्त्रक्रिया प्रक्षेपणाद्वारे उपस्थितांना शल्यचिकित्सा तंत्र आणि शारीरिक सूक्ष्मता याबाबत अतुलनीय अंर्तदृष्टी प्रदान करण्यात आली.

 

 

 

2025-26 या वर्षासाठी लातूर येथील डॉ.कल्याण बर्माडे यांची आयएजीईचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि अहमदनगर येथील डॉ.सुजल मुन्शी यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,अशी माहिती डॉ.आशिष काळे यांनी दिली.

 

 

 

या परिषदेमुळे शिक्षण,सहकार्य आणि प्रगतीचा वारसा असलेले पुण्याने वैद्यकीय उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून आपले

स्थान मजबूत केले आहे.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments